परभणी शहरात १९ हजारांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:15 IST2019-06-15T00:14:05+5:302019-06-15T00:15:07+5:30
शहरातील कडबी मंडी परिसरात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १३ जून रोजी एका पानटपरीवर छापा टाकून १९ हजार ७९६ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

परभणी शहरात १९ हजारांचा गुटखा पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील कडबी मंडी परिसरात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १३ जून रोजी एका पानटपरीवर छापा टाकून १९ हजार ७९६ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
कडबी मंडी भागातील नईम पानटपरीवर प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे १३ जून रोजी छापा टाकण्यात आला. या कारवाईत १९ हजार ७९६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याबाबत अन्न भेसळ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन मोहम्मद मुजाहिद याच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, हनुमंत जक्केवाड, अनिल हिंगोले, बालासाहेब तुपसुंदरे, सय्यद मोईद, हरि खुपसे, सारिका धोत्रे, विशाल वाघमारे, परमेश्वर शिंदे, संजय घुगे यांच्या पथकाने केली.