शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

लसीअभावी जिल्ह्यातील १०३ केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:17 IST

१ मेपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी सुरू केलेले लसीकरण मागच्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहे. सध्या ४५ ...

१ मेपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी सुरू केलेले लसीकरण मागच्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहे. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच लसीकरण केले जात आहे. मात्र, या नागरिकांसाठी देखील जिल्ह्यात लस उपलब्ध नाही. त्यामुळे गुरुवारी १०३ लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. परभणी शहरातील महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रासह ग्रामीण भागातील काही केंद्र अशा एकूण ४७ केंद्रांवर दिवसभरात लसीकरण सत्र चालविण्यात आले. राज्य शासनाने यापूर्वीच १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठीचे लसीकरण बंद केले आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यातही दुसरा डोस असलेल्या नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित नागरिकांना लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गुरुवारी दिवसभरात ४३१७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

परभणीत आज नऊ केंद्रांवर सत्र

१४ मे रोजी महानगरपालिकेच्या वतीने ९ केंद्रांवर सत्र चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. शहरातील इनायतनगर, साखला प्‍लॉट, वर्मा नगर, दर्गा रोड, जायकवाडी, शंकरनगर, खंडोबा बाजार, खानापूर या मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण होणार आहे. त्याचप्रमाणे नानलपेठ भागातील बालविद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणीही केंद्र सुरू केले आहे.