परभणी जिल्ह्यात दिल्या १० हजार नवीन वीज जोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:16 IST2021-04-05T04:16:08+5:302021-04-05T04:16:08+5:30
परभणी : जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील ९ हजार ९१४ वीज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात नवीन वीज जोडण्यात देण्यात ...

परभणी जिल्ह्यात दिल्या १० हजार नवीन वीज जोडण्या
परभणी : जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील ९ हजार ९१४ वीज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात नवीन वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वीज वितरणकडून ग्राहकांची गैरसोय दूर करून दिलासा दिला आहे.
कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासह वीज बिल वसुली, नवीन वीज जोडण्या देण्याचे काम सुरूच आहे. परभणी जिल्ह्यात उच्च, लघु दाब वर्गवारीमधील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषी या गटातील वीज ग्राहकांनी वीज वितरण कंपनीकडे नवीन वीज जोडण्या देण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सातत्याने संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर होत असलयाने या वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणला अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढून ग्राहकांना वीज जोडण्या देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर नियोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील नवीन वीज जोडण्यांचे प्रस्ताव दाखल केलेल्या ९ हजार ९१४ वीज ग्राहकांना कोरेानाच्या काळात नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे या ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या वतीने दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे.