अतिप्रगत जनुकीयविज्ञान विवाहसंस्थेतला अडसर ठरेल का?

By Admin | Updated: July 21, 2016 12:45 IST2016-07-21T12:26:29+5:302016-07-21T12:45:26+5:30

भविष्य जाणून घेणे किंवा पुढे काय होणार हे माहित करून घेण्यात मानवाला नेहमीच रस राहिलेला आहे. असे पूर्वज्ञान फायद्याचे किती आणि तोट्याचे किती यावर विचारवंतांमध्ये नेहमी चर्चा होत असते.

Will most advanced genetics be found in the marriages? | अतिप्रगत जनुकीयविज्ञान विवाहसंस्थेतला अडसर ठरेल का?

अतिप्रगत जनुकीयविज्ञान विवाहसंस्थेतला अडसर ठरेल का?

 - मयूर देवकर

भविष्य जाणून घेणे किंवा पुढे काय होणार हे माहित करून घेण्यात मानवाला नेहमीच रस राहिलेला आहे. असे पूर्वज्ञान फायद्याचे किती आणि तोट्याचे किती यावर विचारवंतांमध्ये नेहमी चर्चा होत असते. या चर्चेला आता आणखी एक नवा आयाम प्राप्त होताना दिसत आहे. 

पुलित्झर प्राईज विजेते लेखक सिद्धार्थ मुखर्जी यांचे दुसरे पुस्तक ‘द जीन : अ‍ॅन इंटिमेट हिस्ट्री’ नुकतेच प्रकाशित झाले. जनुकीयविज्ञानाचा इतिहास त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. जनुके म्हणजे काय? मानवाच्या विकासात त्यांचा वाटा काय? मानवी अस्तित्त्वाचे भविष्य काय? अशा अनेक गोष्टींचा त्यांनी मागोवा घेतला आहे. अनुवंशिकशास्त्र किंवा जननशास्त्राच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवाला होणाऱ्या लाभांसोबतच काही गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

मुखर्जी म्हणतात, कल्पना करा की पेशींची तपासणी केल्यावर असे आढळून आले की, तुमच्या होणाऱ्या बाळाला न्युरोडिजनेरेटिव्ह डिसिज् (मेंदूतील चेतापेशींचा आजार) होण्याची शक्यता आहे. अशावेळी तुमच्या लग्नावर, नातेसंबंधावर या माहितीचा कसा परिणाम होईल? तुम्ही कशा पद्धतीने रिअ‍ॅक्ट होणार? यामुळे आपला एकेमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार का? 

जनुकीय पूर्वज्ञानाचा आपल्या विवाहसंस्थेवर होणाऱ्या परिणामांवर विचार केला असता हा मुद्दा किती गंभीर आहे हे कळेल. खरंच किती अवघड होऊन बसेल जर एखाद्या व्यक्तीला कळले की, त्याच्या जनुकांमुळे त्याला होणारे मूल आजारांनी ग्रस्त असेल तर? सकारात्मकदृष्ट्या पहायचे झाले तर भविष्यात काय होणार हे आपल्याला आधीच कळाले तर आपण त्यावर तोडगा म्हणून आतापासूनच उपाय करू शकू. परंतु प्रश्न उपाय किंवा तोडगा काढण्याचा नाहीए. प्रश्न आहे तो नातेसंबंधावर पडणाऱ्या फरकाचा.
जोडीदार निवडताना एकमेकांविषयी सत्यता माहित असणे गरजेचे आहे. मग जर मला माहित आहे की, माझ्या कुटुंबामध्ये आनुवंशिक आजार आहे. तो मी होणाऱ्या जोडीदाराला सांगणार का? होणाऱ्या बाळाला दुर्धर आजार होण्याची ४०-५० टक्के शक्यता आहे. मग या शक्यतेवर आपले नाते अवलंबून असणार का? बाळाला जन्म द्यायचा की नाही हा निर्णय घेताना काय विचार करणार? 
पुस्तकात मुखर्जींनी लिहिले आहे की, माझ्या पत्नीला जेव्हा मी कुटुंबातील अनुवंशिक आजराबद्दल सांगितले तो क्षण खरंच खूप अवघड आणि निर्णायक होता. अशा कबुलीमुळे माझ्या नात्यावर काय परिणाम होणार याचे निश्चित असे उत्तर माझ्याकडे नव्हते. पण न सांगणे मला पटत नव्हते.
एखाद्या अनाथ मुलाची जनुकीय मॅपिंग केली असता क ळाले की, त्याला एखादा आजार होण्याची शक्यता आहे तेव्हा त्याला कोणी दत्तक घेईल का? असे असंख्य प्रश्न आणि जर-तरच्या गोष्टी भविष्यात आपल्या समोर उभ्या राहणार आहेत. यावर मुखर्जी म्हणतात की, सर्व पूर्वज्ञान झिडकारून आपण दुर्लक्ष क रण्याचा पर्याय स्वीकारू शकतो. पण आता मात्र तसे करणे शक्य नाही.
 

Web Title: Will most advanced genetics be found in the marriages?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.