शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कशाला मुली वाचवता? मरू देत त्यांना...

By admin | Updated: April 26, 2017 17:10 IST

आपल्या देशात बेटी बचाव, बेटी पढाव मोहीम सुरु आहे.पण त्याचा खरंच काय उपयोग?

 - स्वाती सहारे

मुलगी म्हणजे काय? 
मुलगी म्हणजे जन्माला येऊन केलेलं पाप?
आता असं म्हणण्याची वेळ आलीये. 
लोक म्हणतात स्त्रीभृणहत्या थांबवा. 
तिला पोटातच मारु  नका. तिचा जीव वाचवा. 
पण कशासाठी? 
ती जर पोटातच मेली ना तर बरं होईल. 
कारण ती पोटात एकदाच मरेल. 
पण तिला या जगात आल्यावर दररोज मरावे लागेल, क्षणाक्षणाला. 
दररोजची ही होणारी घुसमट, मरमर, भीती हे सगळं अनुभवण्यापेक्षा मरणं बरं. तिला जगात आल्यावर प्रत्येक सेकंदाला आपल्या मनाविरुद्ध करावे लागेल, इच्छा-आकांक्षा काय असतात हे पूर्णपणे विसरून जावे लागेल, तिचं अस्तित्व काय आहे हे तिला पूर्णत: विसरावे लागेल, आणि तुम्ही म्हणता की तिचा जीव वाचवा. ..
 स्पर्धा कुठलीही असो, अगदी ऑलिम्पिक असो.
आज सगळ्या क्षेत्रात मुली  बाजी  मारत आहेत. 
..पण माहित नाही का कुठे ना कुठे तरी त्या स्वतः शीच  लढताहेत आणि  ती बाजी मात्र हरताहेत..
आणि जिंकली  जरी तर काय मिळतं तिला?
 छेडछाड, बलात्कार, शारीरिक आणि मानिसक त्रास , अ‍ॅसीड अटॅक?
दररोज वर्तमानपत्नात यातली एक ना एक बातमी असतेच. .
शाळेत गेल्यावर आपण शिकतो की, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.. मग काही काळाने आपण हे कसं काय विसरून जातो. .?
का हे थांबत नाही ?
याला कोण जबाबदार आहे?
आपला समाज ज्याने स्त्रियांसाठी कडक नियम बनवून ठेवले आहेत?
सातच्या आत घरात, काय कपडे घालायचे?
कोणती कामे करायची. 
काय करायचं आणि काय नाही? 
सगळी बंधने तिच्यावर लादली गेली आणि आताही लादली जात आहेत.  पण मग पुरूषांसाठी असे नियम या समाजाने का बनवले नाहीत. 
का तिला वेगळी वागणूक दिली जाते?  आपल्या देशात बेटी बचाव, बेटी पढाव मोहीम सुरु आहे.
पण त्याचा खरंच काय उपयोग?
 बदल हवा आहे. पण तो कोण करणार?  सुरूवात स्वात:पासून करा. एकदा तरी.