शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

तरुण लव्हस्टोरीत कोण आहेत आजचे सुपरव्हिलन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 7:00 AM

प्रेम करायला कुठली कागदपत्रं लागत नाहीत की दाखला लागत नाही. दोन लोकांचा मामला. ते दोन जीव बिचारे फुलपाखरासारखे बागडत असतात. पण काही कडवट लोक असतात, दुनियेत कुणाचं चांगलं झालेलं न बघवण्यासाठीच या लोकांचा जन्म झालेला असतो. ते तयारच असतात या फुलपाखरांना झोडपण्यासाठी.

ठळक मुद्देत्या सार्‍यांना पुरून उरतं, एवढय़ा सार्‍या आघाडय़ांवर लढून यशस्वी ठरलेल्यांबद्दल नितांत आदर वाटतो. खरंच!

-श्रेणिक नरदे

प्रेम ही आंधळी गोष्ट असल्याने ती कधीही, कुणावरही होऊ शकते, प्रेम करायला कुठली कागदपत्रं लागत नाहीत की दाखला लागत नाही. हा दोन लोकांचा मामला असतो. मग ते दोन जीव बिचारे फुलपाखरासारखे बागडत असतात. फुलांसारखे भिडत असतात. काही चांगले लोक असतात ते निरागसपणे या फुलांकडे, फुलपाखरांकडे बघत असतात, मात्र काही कडवट लोक असतात. दुनियेत काही कुणाचं चांगलं झालेलं न बघवण्यासाठीच या लोकांचा जन्म झालेला असतो. असे काही लोक या फुलपाखरांना झोडपण्यासाठी हाताच्या बाह्या सरसावून बसलेले असतात.या अशा देखण्या प्रवृत्तीचे लोक कोण असतात ? त्यांच्या कलागुणांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. आपलं प्रेम जुळणं. हे आधी आपल्याला कळतं आणि आपल्या आधी आपल्या दोस्त, मित्रमैत्रिणींना कळतं. कधीकधी या लोकांनीच आपल्याला खांद्यावर बसवून किंवा उचलून प्रेमात पाडलेलं असतं. म्हणजे प्रेमात माणूस पडत असतो पडत असताना हे लोक धक्का मारतात आणि पाडतात मग आपण प्रेमात पडतो. आता यांचं सगळं त्यातल्या त्यात बरं चाललेलं असताना या बिचार्‍यांना कुठून तरी कसला तर त्रास व्हायला सुरुवात होते. मग ते आरे ते सगळं खरं हाय पण तिची हिश्ट्री काढली का हिश्ट्री ? असा एवढाच प्रश्न विचारून अंडीतून बाहेर आलेला बारीक साप सोडून देतात. हा साप बारीक जरी असला तरी तो वळवळतो. आणि हा किंवा ही तिची/त्याची हिश्ट्री काढतात. मग हा पूर्ण सव्र्हे असतो. त्यांच्या घराशेजारचा दोस्त, मैत्रिणींना विचार, त्यांच्या पाहुण्यांना विचार, त्यांच्या जुन्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना विचारून कुठं काही इतिहासात एखादी ऐतिहासिक घडामोड घडलीय का याचा आढावा घेण्यासंबधी आपले जवळचे मित्रमैत्रिणी प्रेरणा देत असतात आणि यातून शंका, संशयकल्लोळ अशा टाइपचं वातावरण निर्मिती करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आताच्या काळात प्रेम हे केवळ दोन लोकांचं कधीही नसतं. हे जर खोटं वाटत असेल तर कुठलाही शिनमा काढून बघा गाण्यात दोघं न नाचता अख्खा गाव नाचत असतो त्या प्रेमवीरांबरोबर.   घर, कॉलेज, शिक्षक, नातेवाईक याआधी आपल्या दिवटय़ा मित्रमैत्रिणींनाच हे कळलेलं असतं. तिथूनच या ष्टोर्‍या लिक होतात. आपल्याला वाटतं कुणाला काहीच माहीत नाही पण अख्ख्या दुनियेला आपली कथा माहिती झालेली असते आणि याचं सारं श्रेय आपल्या मित्रमैत्रिणींना जातं. आपण सारे लोक भारतातले बांधवबिंधव असतो. पहिली ते दहावी रोज सकाळी आपण भारतमातेची लेकरं प्रतिज्ञा घेत असतो. मग नंतरून आपल्याला जातधर्म वगैरे श्रेष्ठ असल्याची जाणीव होते. त्या श्रेष्ठ असण्यानसण्यातून आंतरजातीयधर्मीय जे लोक प्रेम करत असतात त्यांना प्रचंड त्रास होतो. त्या दोघांना आपल्या जातिधर्माविषयी काही आक्षेप नसताना दुनियेला मात्र असतो. प्रियकराच्या, प्रेयसीच्या जातीवरून दोस्त लोक टोमणे मारण्याचा सपाटा लावतात. ही गोष्ट अशी न तशी घरादारापर्यंत पोहचते. आता अलीकडे चांगले मोबाइल आल्यानं त्यात छान फोटो काढता येतात. कुठूनतरी फोटो काढून ते गावभर फिरवण्याचा अतिरेकी इंट्रेस्टही काही लोकांना असतो. ही प्रवृत्ती आणि काही दिवसांपूर्वी जालन्यातील एका जोडप्याला मारहाण करणार्‍या लोकांची प्रवृत्ती यात काडीचाही फरक नसतो. तोड देंगे बदण का कोना कोनाजहाँ दिखेंगे बाबू शोना असा मजकूर असलेले आणि जोडप्यांना पळवून पळवून मारणारे काही व्हिडीओही व्हॅलेंटाइन सप्ताहात व्हायरल झाले. तसं अनेकांना पळवून लावलंच त्यांनी या ही व्हॅलेंटाइन्सला. ही दहशतीच्या प्रवृत्तीची अनेक उदाहरणं आपण बघतोय. एकतर सार्‍या सार्वजनिक जागांवर लोकांचा कायमचा जागता पहारा असतो, निर्मनुष्य आणि वर्दळ नसलेली ठिकाणं कमी असतात. यासाठी बहुतांशी लोक हे बाहेर फिरायला जात असतात. तिथं काही टोळकी येतात, ते या दोघांना पकडतात, त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात. हातात लाठय़ाकाठय़ा घेऊन हे लोक कुठल्या संस्कृतीचे नेमकं रक्षण करतात हे न उलगडलेलं कोडंच. ही अशी जी जमात असते, मुळात या लोकांना कुणी हिंग लावून विचारत नसतं. त्या निराशेतून हे लोक दुसर्‍या जोडप्यांशी कितीतरी क्रुरतेनं वागत असल्याचं पाहायला मिळतं. याहून भयानक गोष्ट म्हणजे या जमातीला समाजाचाही पाठिंबा असतो. ही खरी शरमेची बाब असते. मध्यंतरी एक बातमी वाचायला मिळाली, एका उद्यानात प्रेमीयुगुल येऊन बसतात म्हणून तिथल्या बाकडय़ांवर जळकं ऑइल कुणीतरी आणून टाकलंत. आता पूर्वीच्या प्रमाणात कुठेतरी थोडाफार समंजसपणा समाजात येऊ लागला हे दिसताच अशा काही बातम्या येतात ज्यातून काळजाचा थरकाप उडतो अक्षरशर्‍. दोनचार दिवसांपूर्वी आलेली अशीच एक बातमी. एका मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने तिच्या कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. ती आत्महत्या ही प्रत्यक्षदर्शनी जरी दिसत असली तरी ती अप्रत्यक्षपणे समाजाने केलेली हत्याच आहे हे नाकारून चालणार नाही. आपल्या कुटुंबातील मुलीने पळून जाऊन लग्न करणं ही गोष्ट नक्कीच आत्महत्या करण्याइतपत मोठ्ठी नव्हती. पण समाजाने जो त्यांच्या कुटुंबीयांवर सामाजिक दबाव टाकलाय त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल मजबुरीने उचललं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे सारे प्रकार बघितल्यानंतर यात त्या प्रेम या भावनेचा दोष तरी नेमका काय असा प्रश्न पडतो. इथली जातव्यवस्था, अर्थव्यवस्था, वर्णव्यवस्था यांनी आपल्या समाजाभोवती एक अदृश्य नैतिकतेचं कुंपण टाकून त्यात सर्वांना जखडून ठेवण्याचा उद्योग केला आहे. या सर्व गोष्टींना माणसाचा अडाणीपणा जबाबदार आहे. जोवर साक्षर, सुशिक्षित यांच्या पलीकडे जाऊन आपला समाज संवेदनशील होईल तेव्हाच काहीतरी भल्याचं होईल. तोवर आहेतच, प्यार के दुश्मन हजार काय लाख!त्या सार्‍यांना पुरून उरतं, एवढय़ा सार्‍या आघाडय़ांवर लढून यशस्वी ठरलेल्यांबद्दल नितांत आदर वाटतो. खरंच!

( श्रेणिक प्रगतशील शेतकरी आणि लेखक आहे.)