शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोडॅक कॅमेर्‍याचं जे झालं ते तुमचं होतंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 17:23 IST

पूर्वीचा कॅमेरा आठवतो. आपण फोटो काढणार मग प्रिण्ट करून आणणार. तो का आउटडेटेड झाला? नवीन तंत्रज्ञान आलं म्हणूनही आणि स्वत: बदलला नाही म्हणूनही!

ठळक मुद्दे ‘कोडॅक’ या शब्दाचा अर्थ आउटडेटेड असा झालाय. आपलं करिअर ‘कोडॅक मोमेंट’सारखं सुंदर हवं, पण ‘कोडॅक’ नको!

- डॉ. भूषण केळकर

रॉजर फेडरर    हरला. विम्बल्डनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने पराभव केला आणि इंग्लंडमधील फुटबॉल चाहत्यांनी उत्साहानं फटाके फोडले! तुम्हाला वाचताना लागली नसेल तशी मला हे वाक्य लिहितानासुद्धा संगती लागत नाहीए!! कुठे टेनिस, कुठे फुटबॉल!!1966 मध्ये पण म्हणे असाच विम्बल्डनच्या गतविजेत्याचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला होता, आणि त्यानंतर लगेच झालेल्या स्पर्धेत इंग्लंडने फुटबॉलमध्ये विश्वचषक उंचावला होता. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होण्याच्या आशेनं इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये फेडररच्या पराभवानं आनंदाची लहर पसरली. म्हणून तर त्यांनी फटाके फोडले.तसं झालं मात्र नाही, क्रोएशियाने इंग्लंडचा पराभव केलाच; पण एआयनेही भाकित केलेले ब्राझिल, स्पेन, जर्मनी हे जगज्जेते स्पर्धेबाहेर गेले. रोनाल्डोचा पोतुरुगाल आणि मेस्सीचा अर्जेटिना अपयशी ठरला. आणि हा लेख वाचाल तेव्हा जिंकणार्‍याचं नाव फ्रान्स किंवा क्रोएशियापैकी एक असेल हे नक्की.तंत्रज्ञानाची आणि तद्नुषंगिक शासकीय प्रगतीची इतक्या वेगाने वाढ होते आहे की आतार्पयत अनाकलनीय व आश्चर्यजनक घटना यापुढे वेगाने घडणार आहेत. अशाच प्रकारे!स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड आपल्याला सतत जाणीव करून देत असतात की ‘मागील कामगिरीवरून आगामी यशाची व वृद्धीची हमी नाही आणि म्हणूनच स्वतर्‍च्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी!’स्टॉक मार्केटमधील हे वाक्य इंडस्ट्रीला तितकच लागू आहे म्हणाना! तीन वर्षापूर्वी मी एका अमेरिकन आयटी कंपनीच्या  बंगलोरस्थित संशोधन केंद्रासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम करायला गेलो होतो. त्या कंपनीच्या ज्या कोअर ग्रुपशी मी दिवसभर सल्ला मसलत केली त्या सहा जणांत एक समाजशास्त्रज्ञ, दोन मानसशास्त्रज्ञ आणि तीन आयटीमधील तंत्रज्ञ होते. दहा वर्षापूर्वी अशी कल्पनाही करता आली नसती की जगातल्या तंत्रज्ञानातील अग्रगण्य अमेरिकन कंपनीच्या संशोधनात 50 टक्के वाटा हा समाजशास्त्र व मानसशास्त्र बजावेल! इंडस्ट्री 4.0 मध्ये हे प्रकर्षानं घडतंय हे तर खरंच!उत्क्रांतीवादाच्या संदर्भात असं एक वाक्य सांगितलं जातं की ‘सर्वात बलिष्ठ वा सर्वात हुशार हेच यशस्वी होतात असं नाही, तर जे सर्वात चपळपणे स्वतर्‍ला बदलू शकतात त्यांना टिकून राहणं सर्वाधिक शक्य होतं’ हे वाक्य चाल्र्स डार्विनच्या नावावर खपवलं जातं. या वाक्याचा योजक/जनक हा विवाद्य आहे; परंतु हे वाक्य सर्वार्थानं खरं आहे!इंडस्ट्री 4.0 मधील व्याप्ती आणि वेग पाहता आपल्याला सर्वाना, विशेषतर्‍ विद्यार्थी आणि शिक्षकांना आपल्या शिक्षणातील ‘चपळता’ व ‘सतत नवीन शिकण्याची पद्धत’ हे स्वीकारावंच लागणार आहे. ज्यांना कण्टिन्यूअस लर्निग - निरंतर शिक्षण म्हणतात त्यांची अंमलबजावणी करणं अत्यावश्यक ठरतं आहे. मुळातच शिक्षण पद्धती ही 3 आरकडून 3 आयकडे जाते आहे. रीडिंग, रायटिंग, आर्थिमॅटिक या 3 आरकडून जगभरातील शिक्षण पद्धती ही इण्टरडिसीप्लीनरी, इंटिग्रेटेड आणि इण्डिव्हिज्युअलाईज्ड अशा 3 आयकडे जात आहे.इंडस्ट्री 4.0 मध्ये टिकून राहणं आणि त्यावर स्वार होऊन यशस्वी होणं यासाठी खरं तर आपल्या सर्वानाच या नव्या सूत्राची जाणीव ठेवायला हवी आणि त्यावर काम करायला हवं.मी लहान असताना कोडॅक कंपनीचे कॅमेरे व फिल्म होत्या. फोटो म्हणजे ‘कोडॅक’ हे जणू समीकरण होतं. इतकं की एखादा सुंदर प्रसंग, चित्र इ. म्हणजे ‘कोडॅक मोमेंट’ अशी संज्ञा रुढ झाली होती. आता डिजिटल फोटो तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये घेता, शेअर करता, डिलीटसुद्धा करता! ‘कोडॅक’ या शब्दाचा अर्थ आउटडेटेड असा झालाय. आपलं करिअर ‘कोडॅक मोमेंट’सारखं सुंदर हवं, पण ‘कोडॅक’ नको!

**

अगदी सहज करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे लर्निग हाऊ टू लर्न या नावाचा केवळ नऊ तासांचा कोर्स शिका. हा कोर्स सर्वाना विनामूल्य उपलब्ध आहे. coursera.org या वेबसाइटवर तो उपलब्ध आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि मॅकमास्टर युनिव्हर्सिटीने तो तयार केला आहे. याशिवाय अनेक गोष्टी आपण सहज करू शकू. त्या मी पुढील लेखात सांगीनच.