शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

‘एचआर’चं काम यंत्र करु लागली तर एचआरवाले काय करतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:46 IST

एचआर ही गोष्ट नव्या काळात फार महत्त्वाची. पण इंडस्ट्री 4.0 मुळे एचआरची 50 टक्के कामं आता यंत्रच करू लागलीत; पण मग एचआरवाले काय करतील?

ठळक मुद्देइंडस्ट्री 4.0 मुळे, संस्था-निरपेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष बनणार आहे. लॉँगटर्मपेक्षा हिअर अ‍ॅण्ड नाऊ बनणार आहे.

-डॉ. भूषण केळकर

आजच्या संवादात आपण इंडस्ट्री 4.0 ह्यूमन रिसोर्सेस किंवा मानव संसाधन म्हणजेच ज्याला ‘एचआर’  असं संबोधलं जातं त्यातले परिणाम व पुढील दिशा बघणार आहोत. तपासणार आहोत. एचआर ही गोष्ट तरुण वाचकांसाठी दोन अर्थानं महत्त्वाची आहे. एक म्हणजे जी लोकं नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी  व आता काम करत असतील त्यांनासुद्धा. एचआर महत्त्वाचा. दुसरं म्हणजे ज्यांना एचआर या विषयातच करिअर करायचंय अशा एमबीएच्या विद्याथ्र्याना वा मानसशास्त्राच्या विद्याथ्र्यासाठीही हा विषय महत्त्वाचा आहे.इंडस्ट्री 4.0 च्या बिग डाटा, एआय, बॉट्स आणि या चार महत्त्वाच्या घटकांचा एचआरवर परिणाम होतोय व तो वाढतो आहे. संख्यात्मक भाषेत त्यातील आकडेवारी बघू. एचआरमध्ये प्रामुख्याने रिकूट्रिंग म्हणजे हायरिंग म्हणजे नोकरभरती येतं. दुसरं म्हणणे असलेल्या मनुष्यबळाच्या कामाचं मूल्यमापन, परफॉर्मन्स अ‍ॅपरायसल येतं.तिसरं म्हणजे दैनंदिन समस्या निवारण-माहिती देणं इत्यादी ऑपरेशनचा भाग येतो. यामध्ये पगार ठरवणं, भत्ते ठरवणं व कंपनीचे सांस्कृतिक/मनोरंजन व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम ठरवणंसुद्धा येतं. तर अशा एचआरच्या तीन महत्त्वाच्या भागांमधील इंडस्ट्री 4.0 चा आताचा प्रभाव पाहा. पहिल्या म्हणजे रिक्रूटमेंट/हायरिंग या क्षेत्रात एआयचा परिणाम होऊन 55 टक्के कामं ही माणसांपेक्षा यंत्रं करत आहेत. दुसर्‍या भागात म्हणजे मनुष्यबळ मूल्यमापन व तद्नुषंगिक शिक्षण देणं यात 20 टक्के भाग तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं होतं आणि तिसर्‍या भागात म्हणजे दैनंदिन समस्या निवारणात तर 80 टक्के कामं ही चॉटबॉट्स एआय करत आहेत.साधं बघा आत्ताच्या काळात नोकरी शोधण्यासाठी रिझ्यूम किंवा बायोडाटा लिहिण्याचे दिवस संपत आलेत. जगात 93 टक्के नोकर्‍यांचे कॉल/मुलाखतीची आमंत्रण्ां  ही लिंकडीनवरून येत आहेत. 67 टक्के हे फेसबुकवरून येत आहेत. नजीकच्या काळात तुमच्या लिंकडीन वा फेसबुकवरील म्हणजेच समाजमाध्यमातील तुमच्या वावरावरून तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता विलक्षण वेगाने वाढेल. पूर्वीचा साचेबद्ध सीव्ही हा कालबाह्य होतोय आणि आजकाल व्हिडीओ रिझ्यूम हे चलनी नाणे झालंय!नुसतं एवढंच नाही तर त्यापुढे जाऊन, नुसतेच जॉब प्रिस्क्रिप्शन आणि उमेदवार यांची सांगड घालून देऊन ही यंत्रणा थांबत नाही, तर पुढील मुलाखत व कौशल्य तपासणीसुद्धा स्वतर्‍च करते! डीप लर्निगद्वारा. एकूण काय तर ज्याला साचेबद्ध कामं म्हणू शकू ती एचआरमधील कामं यंत्र आणि  एआय करणार आहेत.  जी कामं इंडस्ट्री 4.0 करू शकणार नाही. निदान नजीकच्या भविष्यात, त्यात येतात ट्रान्सफॉर्मेशनल  म्हणजे परिवर्तनात्मक कामं इंडस्ट्री 4.0 च्या तंत्रज्ञानानं घोडय़ाला पाण्यार्पयत नेता येईल; पण घोडय़ाला पाणी पिण्यासाठी उद्युक्त करता नाही येणार!आजच्या तरुण पिढीची (म्हणजे तुम्ही सर्व वाचक!) ही खासियत आहे की त्यांना इन्स्टण्ट ग्राटिफिकेशन हवंय आणि त्यांची गरज ही तत्काल आनंदाची आहे. हेच बघा ना, येल विद्यापीठामध्ये हॅपीनेसवर एक कोर्स जाहीर झाला ज्याच्यात मेडिटेशन, योग, प्राणायाम व माइण्डफुलनेस अशा अनुकूल गोष्टी शिकवतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पूर्ण युनिव्हर्सिटीतील 1/4 विद्याथ्र्यानी त्या कोर्सला रजिस्टर केलं व मग रजिस्ट्रेशन बंद करावं लागलं. याचं कारण आजच्या पिढीला तणावाचं नियोजन अत्यावश्यक वाटतं. कारण मुळात ताण-तणाव नियोजन अत्यावश्यक वाटतं कारण मुळात ताण-तणाव, स्पर्धा आणि म्हणून तद्नुषंगिक प्रश्न वाढलेत. यापुढील एचआरची दिशा ही असेल, बाकी सर्व एआय बघून घेईल!यापुढचं एचआर हे इंडस्ट्री 4.0 मुळे, संस्था-निरपेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष बनणार आहे. लॉँगटर्मपेक्षा हिअर अ‍ॅण्ड नाऊ बनणार आहे. त्याला संस्कृतमध्ये छान शब्द आहे. ‘अधुना इव’ अधुना म्हणजे आताचा हा क्षण-तोच काय तो खरा! आणि म्हणून यापुढचं एचआर हे असेल ‘अधुना इव’ -अधुनैव!!