शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कसलं संशोधन आणि कसल्या पिएचड्या?

By admin | Updated: April 11, 2017 18:56 IST

विद्यपिठातील संशोधन. गंमतच वाटते आजकाल हा शब्द ऐकल्यावर. खरंच आपल्या भारतातील विद्यापीठामधे संशोधन चालतं का?

विद्यपिठातील संशोधन. गंमतच वाटते आजकाल हा शब्द ऐकल्यावर. खरंच आपल्या भारतातील विद्यापीठामधे संशोधन चालतं का? खरंच आपण संशोधन करतो का? का नुस्ताच बाजार मांडलाय या संशोधन शब्दाचा.आजकाल प्रत्येक विद्यापीठातुन शेकडो विद्यार्थी , शिक्षक, प्राध्यापक पीएचडी/ डॉक्टरेट पदवी घेऊन बाहेर पडतात. पण खरंच ते संशोधन करतात का? त्यांचे मार्गदर्शक यांचे आप्लिकेशन कुठे आहे याचा पाठपुरावा करतात का? किंवा या संशोधनाचे अ‍ॅप्लिकेशन कुठे आढळून येते का? तर याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल, कमीतकमी विद्यपिठातील संशोधनासाठी तरी नाही हेच उत्तर योग्य!कारण प्राध्यापक हा संशोधन/पीएचडी हे फक्त इन्क्रिमेण्ट आणि प्रमोशन साठीच करतो, त्याचा मुळ पेशा शिकवणे/आहे हे मात्र काहीजण विसरतात. संशोधनापुढे टीचिंग हे शून्य असेच विद्यापीठ मानते, त्यावरच प्राध्यापकाचे महत्त्व विद्यापीठ ठरवते. मग प्राध्यापक तरी काय करणार, तेही लागतात संशोधनाच्या मागे.इंग्रजी मधे संशोधन म्हणजे रीसर्च. ते होतं का?पेड जर्नलला पाठवणे,ते पेपर म्हणून छापुन आनने, बस्स झाले तुमचे संशोधन. प्राध्यापकाच्या नावामागे पेपर वाढणार अन विद्यापीठ पण त्या पेपरचे पॉइंट्स देणार. ,पुढे जाउन हेच पॉइंट्स प्रमोशन साठी उपयोगात येणार. मग काय याचप्रकारे चालतं हे संशोधन. याच संशोधनाला वापरून अजुन कुणीतरी दोन-चार पेपर पब्लिश करणार. प्रथम संशोधन करणाऱ्याची महती वाढनार. मग काय झाला ना तो फेमस.मग काय गूगल वर त्याच्या पेपरचे रिव्ह्यूज अन सिटीशन वाढणार, मग इन्क्र ीमेंट अन प्रमोशन. खरे पाहिले तर त्या संशोधनाचा ना कुठल्या खऱ्या संशोधनासाठी उपयोग ना समाजासाठी उपयोग, फक्त पेपर चा काउंट वाढनार. यामुळे खरा शिक्षक/प्राध्यापक हा शिकवण्यापासून कुठे तरी दूर जाणार.सगळेच असं करतात असं नाही, काही सन्माननीय अपवाद आहेतच. पण संशोधन अशा रीतीनं करणाऱ्यांचं प्रमाण मात्र वाढतं आहे. प्रा. महेश मधुकरराव जानोळकर, अमरावती