हॅकिंग टाळायचंय?
By Admin | Updated: September 18, 2014 19:36 IST2014-09-18T19:36:50+5:302014-09-18T19:36:50+5:30
चांगल्या ब्रॅँडचा वेबकॅमला वेबकॅम कंट्रोल करण्यासाठी त्याला स्वत:चे फर्मवेअर असते. ते फर्मवेअर वेबकॅम कंपन्याकडून वेळोवेळी अपडेट केले जाते

हॅकिंग टाळायचंय?
>स्कॅन अपडेट
१) वेबकॅमचे फर्मवेअर अपडेट करा
चांगल्या ब्रॅँडचा वेबकॅमला वेबकॅम कंट्रोल करण्यासाठी त्याला स्वत:चे फर्मवेअर असते. ते फर्मवेअर वेबकॅम कंपन्याकडून वेळोवेळी अपडेट केले जाते असे फर्मवेअरचे अपडेट उपलब्ध झाल्यास ते त्वरित अपडेट करावे म्हणजे वेबकॅममध्ये काही ‘बग’ असल्यास वेबकॅम कंपन्या नवीन फर्मवेअरच्या माध्यमातून तो बग काढण्याचा प्रयत्न करतात.
२) रूटीन मॅलवेअर स्कॅन :
हॅकर्स मालवेअर्सच्या माध्यमातून तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉपमध्ये प्रवेश करतात. तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉपचे नियमित मॅलवेअर स्कॅनिंग करणं उत्तम. त्यासाठी अनेक मालवेअर रिमूव्हल प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. त्यासाठी चांगला प्रोग्राम म्हणजे मालवेअरबाइटस.
३) वेबकॅमचा स्टीकर :
शेवटचा आणि महत्वाचा मार्ग म्हणजे लॅपटॉप वेबकॅमला काम नसेल तेव्हा स्टीकर लावून झाकून ठेवणं उत्तम. वेबकॅमचा वापर करायचा तेव्हाच वेबकॅमचं स्टीकर काढायचं आणि काम झाले कीपरत स्टीकर लावून झाकून ठेवायचं. कॉम्प्युटर असेल तर त्याचा वेबकॅम काम नसेल तेव्हा बाजुला काढून ठेवणंही सोयीचं ठरावं.