शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

तीन पिढय़ांची गोष्ट सांगतोय मुंबईचा डबेवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:52 IST

माझे आजोबा मुंबईत आले आणि मेहुण्यांच्या मदतीला डबे पोहोचवण्याच्या व्यवसायात उतरले. त्यानंतर आमच्या तीन पिढय़ांत हा व्यवसाय कसा बदलत गेला त्याची ही गोष्ट

- सुभाष गंगाराम तळेकर

साधारणतर्‍ विसाव्या शतकाचे पहिले दशक. माझे आजोबा लक्ष्मण तळेकर साधारणतर्‍ दहा/बारा वर्षाचे असतील. ते लहान असतानाच त्यांचे वडील  वारले. मोठय़ा बहिणीचे लग्न झाले होते. घरात अठराविसे  दारिद्रय़ व मागे चार भावंडांचा सांभाळ अशा स्थितीत गाव गडद, ता.खेड जि. पुणे येथे दिवस काढत होते.गावात उपासमारीत दिवस काढण्यापेक्षा मुंबईत रोजगारासाठी गेलेले बरे असे म्हणून लक्ष्मण तळेकर यांनी साधारणतर्‍ 1915 च्या दरम्यान मुंबई गाठली. त्यांची मोठी बहीण ताई मुंबईत खेतवाडीत राहायला होती व तिचे यजमान तुकाराम वनाजी गडदे त्यावेळी मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवायचे काम करत होते.लक्ष्मण आपले दाजी तुकाराम यांना जेवणाचे डबे पोहोचवण्याच्या व्यवसायात मदत करू लागला. जसजसा मुंबईचा विकास होत गेला तसतसा मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवण्याचा व्यवसाय वाढत गेला. दरम्यानच्या काळात तुकाराम गडदे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे जेवणाचे डबे पोहोचवण्याच्या व्यवसायाचा सर्व भार लक्ष्मण यांच्या खांद्यावर आला.लक्ष्मण डबे पोहोचवण्याचं काम उत्तमरीत्या करत असल्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढला. आता व्यवसायात जम बसू लागला होता. दरम्यानच्या काळात लग्न झाले नवरी मुलगी सखू ही मामाची मुलगी होती. मुंबई सेण्ट्रलला द्वारकादास जीवराज चाळीत संसार थाटला. व्यवसायाला माणसं कमी पडू लागली तसे भावंडांना मुंबईत कामासाठी बोलावलं. सोबत काम करण्यासाठी  सखूबाई होती. इमाने इतबारे व्यवसाय केला व्यवसाय इतका वाढला की 35 कामगार आजोबांकडे काम करत होते. आता आजोबा मुकादम झाले होते. गावाकडील ज्या लोकांना रोजगार नव्हता त्यांना ते आधार वाटायचे. थेट मुंबईला येऊन लक्ष्मण तळेकरकडे कामाला राहायचे. त्यांची राहायची व खाण्याची सोय आजी करायची. त्याकाळी चाळीतील जागा अपुरी होती; पण मनातील जागा मोठी असल्यामुळे कधी अडचण, गैरसोय झाली नाही. अशाप्रकारे गावाकडील लोकांना त्यांनी रोजगार दिला.

लक्ष्मण तळेकर यांना दोन मुलगे मोठा गंगाराम व दुसरा काशीनाथ. वडिलांच्या माघारी गंगाराम यांनी व्यवसाय सांभाळला. गंगाराम तळेकर यांच्याकडे नेतृत्व-वक्तृत्वगुण होते. नेतृत्वगुणामुळे ते डबेवाले संघटनेचे नेते झाले. जवळ जवळ पन्नास र्वष ते संघटनेचे नेते होते. त्यांच्या काळात त्यांनी संघटनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. डबेवाले संघटनेचे नाव सर्वत्न झाले. ते उत्तम व्याख्यान देत असतं. आयआयटी, आयआयएम यासारख्या व अनेक संस्था, कार्पोरेट कंपन्या यांना वडील मॅनेजमेण्टची व्याख्याने देत असतं. वडिलांना कार्पोरेट जगतात मॅनेजमेण्ट गुरु म्हणून मान मिळाला. त्यांचे 2014  ला जेव्हा निधन झाले तेव्हा सर्व मीडियामध्ये मथळा होता. मॅनेजमेण्ट गुरु गंगाराम तळेकर यांचे निधन. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी गंगाराम तळेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता.त्यांच्या पश्चात त्यांनी स्थापन केलेल्या मुंबई डबेवाला असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे व देश-विदेशात मॅनेजमेण्ट या विषयावर व्याख्यानं देत आहे.आमच्या तीन पिढय़ांचा हा प्रवास एका स्थलांतरानं केला, त्या वन वे तिकिटची ही गोष्ट.

अध्यक्ष ,मुंबई डबेवाला असोसिएशन