शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

मातीशी घट्ट नातं असणा-या  टेनिसच्या ग्लॅमरस विश्वाच्या राजाची अर्थात राफाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 2:52 PM

राफेल नदाल हा कराटे किड नाही टेनिस किड आहे. खरं तर त्याला क्ले किड म्हणणं योग्य ठरेल. कारण माती आणि त्याच्यात खास बॉँडिंग आहे.

- अभिजित पानसे

‘कराटे किड’ या जॅकी चॅनच्या जगप्रसिद्ध सिनेमात एक दृश्य आहे.मिस्टर हान हा कराटेगुरु 12 वर्षाच्या ड्रे पार्करला कराटे शिकवायला सुरुवात करण्याआधी सांगतो की, जॅकेट जमिनीवर टाकायचं, खुर्चीवर टांगायचं, स्माइल करायचं, परत घालायचं.आपल्याला कराटे शिकायचं आहे आणि हे काय भलतंच शिक्षक शिकवतोय असं म्हणत तो मुलगा वैतागतो.पण इलाज नसतो, ते उत्तम जमेर्पयत त्याला ते करावंच लागतं. सातत्य आणि सकारात्मक वृत्तीचं हे ट्रेनिंग जॅकेट घालणं-टाकणं यातून नकळत सुरूहोतं.कराटे किड सिनेमा आठवला तो राफेल नदालच्या निमित्ताने. त्यानं फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली तेव्हा वाटलं हा मुलगाही तर असाच घडला आहे, कष्ट आणि सातत्यातून.राफेल नदाल हा कराटे किड नाही टेनिस किड आहे. खरं तर त्याला क्ले किड म्हणणं योग्य ठरेल. कारण माती आणि त्याच्यात खास बॉँडिंग आहे.राफेल नदालच्या काकांनी त्याला बालवयातच टेनिस शिकवताना त्याच्यावर माणुसकीचेही संस्कार केले. राफलने त्याच्या आत्मचरित्रात सांगितलंय की, त्याचे काका म्हणजेच त्याचे कोच अत्यंत कडक, शिस्तप्रिय होते.यामुळेच यशाची हवा राफेलच्या डोक्यात गेली नाही. पाय जमिनीवर राहिले. राफेलची नाळ मातीशी पक्की राहिली. या मातीनेच त्याला यशाचं सोनं प्राप्त करून दिलं. टेनिसमधील एकूण चार मोठय़ा टुर्नामेंट या ग्रँड स्लॅम असतात. नव्या वर्षाच्या सुरु वातीला ऑस्ट्रेलियन ओपन जी कडक प्रांगणात खेळली जाते, त्यानंतर मातीच्या प्रांगणात खेळली जाते ती फ्रेंच ओपन स्पर्धा, त्यानंतर साधारणत: जून-जुलैमध्ये गवताच्या कोर्टावर विम्बल्डन स्पर्धा होते व ऑगस्ट -सप्टेंबरमध्ये यूएस ओपन स्पर्धा होते. 

लाल मातीच्या प्रांगणात म्हणजे क्ले कोर्टावर खेळल्या जाणा-या फ्रेंच ओपनचा बादशहा कोण तर याचं उत्तर एकच स्पेनचा राफेल नदाल.त्याला डाव्या हाताने खेळताना बघणं डोळ्यांना ट्रीट असते. तो शारीरिक प्रचंड मेहनत करतोच; पण त्याची सशक्त बाजू आहे त्याची मानसिकता.टेनिस इतिहासात सगळ्यात जास्त जखमी झालेला खेळाडू कोणी असेल तर तो राफेल नदाल.पण दरवेळी आपल्या अडचणींवर मात करून जोरदार मुसंडी मारणाराही नदालच आहे. नदालचा नादच खुळा.करिअर भरात येत असतानाच गुणसूत्नांमुळे येणा:या व्याधीमुळे त्याच्या पायांमध्ये त्रास सुरू झाले. विशीतच त्याचं करिअर संपायची वेळ आली, कारण अशा व्याधीसोबत तो टेनिस खेळणं अशक्य आहे त्याला सांगितलं गेलं. राफेलने प्रचंड मेहनत घेऊन व सशक्त मानसिकतेच्या भरवशावर याही अडचणींवर मात केली.टेनिसच्या ग्लॅमरस विश्वाचा तो राजा असून, तो अत्यंत नम्र व कुटुंबवत्सल आहे. स्पर्धा आटोपली की तो स्पेनमधील मायोर्क  बेटावर आपल्या बायको व आईवडिलांसोबत, मोठय़ा  कुटुंबासोबत झगमगाटापासून दूर राहातो; पण राफेलचा भारताशी विशेष संबंध आहे हे बहुतेकांना माहीत नाही. 2010 साली आपल्या आईसोबत नादालने राफा नदाल फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. याचं एक केंद्र आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे आहे. भारतातील पीडित, वंचित मुलांसाठी शिक्षण केंद्र उभारलं आहे. येथे गरीब मुलांना टेनिस प्रशिक्षणासमवेत इतर शिक्षण दिलं जातं. त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी व योग्य पोषण केलं जातं. त्याचे पाय मातीतून कधी सुटले नाहीत, म्हणून ती माती त्याला भरभरून यशाचा आशीर्वाद देत राहाते.

( अभिजित ब्लॉगर आहे.)