शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवणार्‍या प्रीती झिंटाच्या उत्साहाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 7:54 AM

ती संघाची मालकीण, संघ बारा वर्षात कधी जिंकला नाही; पण म्हणून ती संघाचा हात सोडत नाही.

- अभिजित पानसे

भारताने 2011चा वर्ल्ड कप  जिंकल्यानंतर प्रीती झिंटाला पत्रकारांनी विचारलं होतं, ‘तुला काय वाटतं यावर्षी तुझी किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएल संघ जिंकेल का?’प्रीती झिंटा नेहमीच्या उत्साहात म्हणाली, आयपीएल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब इथे महत्त्वाची नाही. आज भारतानं वर्ल्ड कप जिंकला आहे. हा खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आयपीएल वगैरे तर चालूच राहील.’   बारा वर्षांपासून आयपीएल सुरू आहे, प्रेक्षक आपापल्या आवडीप्रमाणे या बदललेल्या क्रिकेटचे, बाजारीकरण व्हर्जन 3.0,  क्रि केट लीगमधील संघांना पाठिंबा देतात. कोणाचा आवडता खेळाडू कोणत्या टीममध्ये खेळतो म्हणून, कोणता खेळाडू कॅप्टन आहे म्हणून, तर बहुतेक आपापल्या आवडीच्या शहरांप्रमाणे संघांना पाठिंबा देतात.प्रेक्षकांच्या या मानसिक, भावनिक पाठिंब्याच्या विविध पॅरामिटर्समध्ये त्या त्या संघाचा मालक कोण आहे हे पॅरामिटर क्वचितच असतं. कारण शेवटी सगळा खेळ हा प्रेक्षकांचा त्या त्या खेळाशी, खेळाडूशी, शहराशी, मनोरंजनाशी भावनिकरीत्या रिलेट होण्याचा आहे.

प्रीती झिंटा पंजाब किंग्ज इलेव्हन या संघाच्या तीन मालकांपैकी एक आहे.गेल्या बारा वर्षात प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबनं एकदाही आयपीएल जिंकलं नाहीये. 2014 मध्येच एकदा किंग्ज इलेव्हन फायनलमध्ये पोहोचले. अन्यथा दरवर्षी किंग्ज इलेव्हन पंजाब संघ गुणतक्त्यात कायमच तळात असतो.मात्र प्रीती झिंटाची आपल्या संघाशी बांधिलकी किंचितही कमी झाली नाही. ती दरवर्षी तिच्या संघाच्या बहुतेक सर्वसामन्यात हजर राहण्याचा प्रयत्न करते. प्रामाणिकपणे आपल्या संघाला प्रेरित करते. 

राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात पूर्वी शिल्पा शेट्टी कधी कधी हजर असायची. तिचा नवरा त्या संघाचा मालक आहे. मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी, त्यांची पत्नी निता अंबानी सामन्यात हजर असतात. मग प्रीती झिंटाच्या हजर असण्यामध्ये काय विशेष! या तिघींमध्येही  फरक नक्कीच आहे. प्रीती झिंटा तिच्या संघाची सरळसोट मालक आहे. ती त्यामागील आर्थिक गणितामध्ये पूर्णपणे गुंतली असते. खेळाडूंचा लिलावात ती हजर असते शिवाय सक्रियपणे त्यात भाग घेते. तिने स्वत: कमावलेल्या पैशांतून ती किंग्ज इलेव्हन संघाची एक मालकीण आहे.यावर्षी आयपीएल भारतात न खेळली जाता युनायटेड स्टेट्स ऑफ एमिरेट्समध्ये भरीवली गेली आहे. यावेळी ना निता अंबानी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी यूएइला जाऊन संघ जिंकावा म्हणून प्रार्थना करत आहेत ना त्यांची आई. शिल्पा शेट्टीनं नव्याचे नऊ दिवस आटोपल्यावर राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात हजेरी लावणं कधीच सोडलंय.पण प्रीती झिंटा मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी यूएईमध्ये आली आहे. किंग्ज इलेव्हनच्या प्रत्येक सामन्यात ती हजर असते. एका अस्सल क्रि केट फॅनप्रमाणे मैदानावरील परिस्थितीनुसार ती उत्स्फूर्तपणे स्वत:ला व्यक्त करते. 

यावर्षी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हनचा खेळ सुमार दर्जाचा झाला. ते प्ले ऑफ्समधून बाहेर आहेत हे जवळपास पक्कं होत असतानाच किंग्ज इलेव्हन पंजाबनं अद्भुत मुसंडी मारली आणि सलग पाच सामने जिंकले. यामुळे सध्या त्यांची प्लेऑफमध्ये खेळण्याची शक्यता वाढली आहे.त्याचं श्रेय खेळाडूंना असलं तरी प्रीतीचंही आहेच. प्रीती झिंटानं सामन्यादरम्यान प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी कोरोनाच्या सर्व चाचण्या करून एक आठवडा विलगीकरणात घालवला. ती आपल्या टीमसोबत ठाम उभी आहे.2008मध्ये तत्कालीन बॉय फ्रेण्ड नेस वाडियासोबत संघ तिनं विकत घेतला. पुढे दोघांमधील संबंध बिघडले, नातं तुटलं; पण तिचं किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी मनापासून असलेली इन्व्हेस्टमेण्ट अजूनही तशीच आहे. मात्र व्यक्तिगत सारं बाजूला ठेवून ती पक्की बिझनेस वुमन म्हणून टीमसोबत आहे. आयपीएल नावाचा हा खेळ रांगडा आणि क्रूर असला तरी प्रीती झिंटासारखा त्यात उत्स्फूर्त तरीही ठाम वावर आश्वासक आहे.

( अभिजित ब्लॉगर आहे.)