शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

Say NO : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात तुम्ही त्याच चुका करताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 13:09 IST

पाऊस आणि कॉलेजच्या नव्या वर्षाची सुरुवात दोन्ही एकाचवेळी फेर धरतात. दरवर्षी वाटतं, यंदा पाऊसही एन्जॉय करणार आणि लूकही बदलणार. मात्र घडत काही नाही कारण ज्याला, गेट द राइट अ‍ॅटिटय़ूड असं म्हणतात, तेच आपण करत नाही. ते कसं करणार?

ठळक मुद्देहे पावसाळी व्रत केलं नाही तर तुम्ही आऊटडेटेड ठराल.

-निकिता बॅनर्जी

पाऊस आणि कॉलेज. एकाचवेळी सुरू होतात. दरवर्षी वाटतं, यंदा नव्यानं सुरुवात करायची. भरभरून पाऊस जगायचा आणि कॉलेजमध्ये जाताना पावसासोबत बदलून टाकायचा आपला लूक. मात्र अनेकदा हे जमत नाही. त्याचं कारण असं की आपलं प्लॅनिंग मोठं शानदार आणि जबरदस्त असतं, प्रत्यक्षात घोळ होतो तो अंमलबजावणीचाच. लोकशाही देशात, आपलं सरकार जसं करतं तसंच आपणही. प्लॅनिंग उत्तम, अंमलबजावणी आणि सातत्याची बोंब. सरकारचं जाऊदेत, निदान आपण तरी फार मोठे क्रांतिकारी बदल स्वतर्‍त एका रात्री करण्याचे स्वपA पाहण्यापेक्षा अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टी करू. अगदी छोटय़ा. वाचताना वाटेल की, हे काय सहज जमेल. तर ते सहज जमावं असंच आहे, फक्त ते नियमित जमवलं तर आपला लूकच नाही तर पर्सनॅलिटीही जरा वेगळी भासेल. इंग्रजीत म्हणतात ना, गेट द राइट अ‍ॅटिटय़ूड. तसंच. राइट अ‍ॅटिटय़ूड तेवढा हवा.तर यंदा या पावसाळ्यात आपण 5 गोष्टी करायच्याच नाहीत असं ठरवू. पावसाळा संपेर्पयत अगदी व्रत घेतल्यासारखं आपण हा ‘नो’ मोड ऑन ठेवू.

Say NO

या पाच गोष्टींना पावसाळ्यात आणि कॉलेज सुरू होताना एकदम ‘नाही असं स्पष्ट ठणकावून सांगा. म्हणा, नो मिन्स नो.तसं केलं तर आपोआप आपण गर्दीत उठून दिसू + आपलं आरोग्यही उत्तम राहील.

1) नो जीन्स.

पहिलं नाव आपल्या निळ्या-काळ्या जीन्सचंच घ्यावं लागेल. जीन्सशिवाय तर आपलं पान हलत नाही. आपण कुठंही जायचं असो जीन्स घालतो. पण पावसाळ्यात घालू नका. कॉलेजला जाताना जिन्स घ्यायचीच म्हणून घरी भांडू नका. ती खरेदी हिवाळ्यात करू. आता कॉटन पॅण्ट्स, स्कर्ट किंवा सरळ पारंपरिक सलवार घालणं उत्तम. पावसाळ्यात जीन्स भिजल्या की लवकर वाळत नाही. त्यात गारवा. वर्गात ओल्या जीन्स घालून का बसा. म्हणूनच जीन्स नको. त्यामुळे पावसाळ्यात होणारे त्वचाविकारही आपण टाळू शकू.

2) नो हाय हिल्स

कॉलेजात जायचं तर टाक टाक आवाजात हिल्स घालूनच जायला हवं हा एक गैरसमज आहे. उलट हिल्सची फॅशनच सध्या कालबाह्य आहे. ते न घालणं उत्तम. यंदाच्या पावसाळ्यात  फुटबॉल फीवर आहे. यामुळे अनेक देशांच्या टीमच्या जर्सी रंगाच्या क्रॉक्स बाजारात उपलब्ध आहेत. एकदम कलरफुल रबरी चपला. किंवा गमबूटही सगळीकडे मिळतात. आता तर रंगीबेरंगीही मिळतात त्यामुळे हिल्सला नाही म्हणा आणि हे घाला. फायदे दोन, आपण ट्रेण्डी होतो हे एक, दुसरं म्हणजे पावसापाण्यात पडण्याची भीती नाही.

3) नो लेदर

लेदरच्या महागडय़ा पर्स घेण्याची अनेकांना हुक्की येते. पावसाळ्यात ती बाजूला ठेवणं उत्तम. एकतर प्लॅस्टिकबंदी, त्यामुळे आतल्या वस्तू तुम्ही प्लॅस्टिकमध्ये ठेवू शकत नाही. त्यात या बॅग भिजल्या तर आतलं सामान भिजतं. त्यामुळे सरळ वॉटरप्रूफ बॅगपॅक घ्या. त्या युनिसेक्स असतात. त्यामुळे कुणी कुठल्याही रंगाची घेतली तर चालते. बॅगला नकार आणि सॅकचा स्वीकार हा उत्तम पर्याय.

4) नो-काळी छत्री

काळी छत्री वापरण्याचा जमाना कधीच गेला. आता आपली छत्री हेच आपलं स्टाइल स्टेटमेण्ट ठरतंय. त्यामुळे मस्त कलरफुल छत्री आणा. जमल्यास आपणच आपली छत्री रंगवा. ती वापरा. बदलतं तुमचं स्टाइल रॅँकिंग लगेच.

5) नो गिजमो शो ऑफ

हे गिजमो शो ऑफ प्रकरण नक्की काय असं वाटू शकेल कुणालाही. पण नावावर जाऊ नका. एकूणच आपल्याकडचे गॅजेट्स शो ऑफ करत हिंडणं हे हल्ली सर्रास दिसतं. त्यामुळे जिथं जाऊ तिथं गॅजेट आणि अ‍ॅपविषयी अनेकजण बोलतात. त्यात पावसात गॅजेट्स भिजले की झालाच कार्यक्रम. त्यामुळे उगीच या पावसाळ्यात हा गिजमो शो ऑफ टाळलेलाच बरा.

 

काय घाला? काय टाळा?

*या पावसाळ्यात जमेल तितके ब्राइट आणि बोल्ड रंगाचे कपडे वापरा.* छत्री, जॅकेट, चपला हे सारे रंगीबेरंगी, जमल्यास फ्लोरोसण्ट वापरायला हवं.* प्लीप फ्लॉप/रबरी स्लिपर अजिबात वापरू नयेत.* त्याऐवजी कलरफुल क्रॉक्स वापरणं उत्तम.

यंदाच्या पावसाळ्यात  जरुर वापरावेत असे रंग.

हल्ली अमुक रंग पुरुषांचा, तमुक बायकांचा असं काही उरलेलं नाही. त्यामुळे युनिसेक्स कलर सगळेच वापरू शकतात. अगदी पिंकही मुलं वापरू शकतात. त्यामुळे अमुक रंग कसा वापरायचा हे डोक्यातून काढून टाका.1) पिवळा- आणि पिवळ्या रंगाच्या सर्व छटा.2) कुंकू रंग. म्हणजे कुंकवाचा असतो तो रंग3) गुलाबी रंगाच्या सर्व छटा4) सी ग्रीन कलरच्या सर्व प्रसन्न छटा