लीना पांढरे
प्राप्तेषु षोडशे वर्षे म्हणजे सोळाव्या वर्षाच्या उंबरठय़ावर उभं राहिल्यावर प्रत्येकाच्या तनामनाला पंख फुटतात.आभाळ अजून निळभोरं होतं आणि हिरव्यागार गवताची पाती अजून हिरवीगर्द होतात. प्रत्येक क्षण इंद्रधनुचे रंग लेवून येतो.हे फुलायचे आणि झोपाळ्यावाचून झुलायचे दिवस असतात. ही सारी किमया सोळाव्या वर्षाची असते स्वीट सिक्सटीन.दिल की धडकन वाढवणारा, अब पॉव जमीं पर नहीं ठहरते म्हणत प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा हा सुंदर चांदण्यांचा चुरा सांडणारा मदहोश काळ. उन दिनो मे हवां में शहद घुलता है. स्वप्नांचं वय. वाटतं की सूर्य आपल्यासाठीच उगवतो. चंद्र आपल्यासाठीच चांदणं बरसवतो. बरखा आपल्यासाठीच बहार घेऊन येते. प्रत्येक मुलगी स्वप्न बघते परिकथेतील राजकुमाराचं. शुभ्र, डौलदार अश्वावर स्वार होऊन येणा:या राजकुमाराचं. तो येईल आणि आपल्याला फुलांच्या देशात घेऊन जाईल, असं तिला मनोमन वाटू लागतं.तसा राजकुमार कसा असेल?तर तो ऋषी कपूरसारखा, म्हणजे तो सिनेमात जसा लव्हर बॉय होता, जीव ओवाळून टाकायचा, जिच्यावर प्रेम करायचा तिच्यासाठी.ऐंशी-नव्वदच्या दशकांमध्ये तमाम तरुण मुलींच्या मनावर अधिराज्य केलं ते या चॉकलेट हिरोनं. खरं तर त्या काळामध्ये लव्हर बॉय म्हणून हिंदी सिनेसृष्टीवर राज्य होते राजेश खन्नाचं आणि त्यानंतर अँग्री यंग मॅन ‘दे ढीश्ॉव’ करणा:या अमिताभ बच्चनचं. राजेश खन्नाचे सिनेमे म्हणजेही प्रेमकथाच. पण त्याच्या प्रेमकथांना एक कारुण्याची शोकात्म किनार होती.अमिताभ बच्चनच्या कहाण्यांना एक गंभीर करणारा सामाजिक आशय होता. पण या दोन्हीच्यामध्ये चपखल बसणारा चॉकलेट बॉय असेल तर तो ऋषी कपूर. आज आपल्या टेलिव्हिजनवर तरु ण मुलींना रोमेडी हे चॅनल बघायला फार आवडतं. कारण रोमेडीवरती सर्व निव्वळ रोमान्स दर्शवणा:या टीनएजर मुलामुलींच्या उमलत्या प्रेमकथा असतात.थिरकायला लावणारं मादक संगीत असतं. या कथांना कुठलाही गंभीर आशय नसतो. पडद्यावरती त्या कथा घडत असताना नुसते गुलाबी, निळे, जांभळे रंग उधळले जात असतात. कुठं घनगंभीर होऊन आयुष्याचा विचार वगैरे अजिबात करायचा नसतो. वाहणा:या नदीच्या निळ्याशार पाण्यात नुसतं आपल्याला झोकून द्यायचं असतं. स्वत:ला पिसोळीसारखं हलकं करायचं असतं आणि वाहत वाहत जायचं असतं.ऐंशी-नव्वदच्या काळात तरुण होत जाणा:या पिढय़ांसाठी नेमकं हेच घडत होतं ऋषी कपूरच्या सिनेमांमध्ये.त्या स्वप्नांच्या दुनियेत तो तमाम तरुण मुलामुलींना घेऊ जायचा.प्रत्येकीच्या मनातील तो ख्वाबों का शहजादा होता.या राजकुमाराचा सिनेमा पाहताना पडद्यावर दिसणारी नायिका अदृश्य व्हायची आणि तिथे प्रत्येक तरुण मुलगी स्वत:ची कल्पना करायची. मग येणा:या प्रत्येक क्षणाला चांदीचं घुंगुर जडवलं जायचं. हथेलीवरील मेहंदीचे रंग गडद होत जायचे. हळवेपणाने क्षणात डोळ्यात पाणी दाटायचं तर क्षणात जाई जुई मोग:याचं खळाळणारं हसू ओठांमधून उमलायचं. उन दिनों मे तो पसीना भी गुलाब हुआ करता था.मेरा नाम जोकर मधला तो, आपल्या सुंदर शिक्षिकेच्या प्रेमात पडलेला, सोळा वर्षाचा माउथ ऑर्गन वाजवणारा राजू नावाचा तरुण स्वप्नाळू मुलगा. त्याच्या जखमेवर फुंकर घालणारी, त्याला आत्मविश्वास देणारी, त्याला आनंदाने जगायला शिकवणारी त्याची आवडती टीचर मेरी विवाहबद्ध होऊन निघून जाते. राजूला शेवटच्या श्वासार्पयत सांभाळण्यासाठी एक सुगंधी जखम देऊन जाते.सा:या चित्नपटात उंच गेलेले देवदार वृक्ष, हिमाच्छादित पर्वत शिखरे, हिरवीगर्द कुरणं, वळणावळणाच्या वाटा मंगळुवरी कौलांचं भव्य कॉन्व्हेण्ट स्कूल, चर्चमधील निनादणा:या घंटा, निळसर धूर सोडत जाणारी आगगाडी आणि मेरीला गुडबाय करून तिने परत केलेल्या जोकरचा भावाला हातात धरून उभा असणारा निळसर डोळ्यांचा, गोब:या गालांचा, गोरापान राजू.जाने कहॉँ गये वो दिन, कहते थे तेरी राहों मे नजरों को हम बिछायेंगे अशी याद काळजात दडवून ठेवते.हे मिसरूड फुटायचं वेडं वय. आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाते तेव्हा व्याकूळ झालेलं मन, तो पहिलावहिला प्रेमभंग प्रत्येकानेच आपल्या काळजात सांभाळलेला असतो.मला आठवतं, मी सातवी-आठवीत असताना बॉबी झळकला होता. माङया वर्गातल्या मायाने तो माङयासाठी स्पॉन्सर केला होता. शाळेमध्ये रविवारी जादा तास आहेत अशी थाप मारून आम्ही दोघीजणी नदी पल्याडच्या त्या जुन्या, पत्र्याचे छप्पर असणा:या टॉकीजमध्ये भर दुपारी 3 वाजता सिनेमा बघायला गेलो होतो. एक रु पया पाच पैशाचं तिकीट काढून पिटातल्या पोरांबरोबर बसलो होतो. डोक्यावर तापणारे पत्रे, फिरणा:या पंख्यांचा येणारा खडखडाट, खुच्र्यामधून चावणारे ढेकूणं आणि घामेजलेली अंग या सा:याचा क्षणार्धात विसर पडला होता जेव्हा आपल्या जन्मदिनाच्या पार्टीत जिन्यावरून उतरून येत असताना दाराजवळ उभ्या असणा:या लाज:याबुज:या डिंपलला म्हणजे बॉबीला त्या ‘डिब्ब्याने’ पाहिलं होतं. लव अॅट फस्र्ट साइट तिथेच घडून आलं होतं. बॉबी लवकर निघून गेली होती; पण तो तिच्यासाठी सूर आळवत होता, मै शायर तो नही मगर ये हसीं, जब से देखा मैने तुझको, मुझको शायरी आ गई..
( लेखिका प्राध्यापक आहेत.)