शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरची ट्रॅफिक कंट्रोल करणारी पॅरिसमधली एअर टॅक्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:06 IST

रस्त्यावर ट्राफिक जाम होतंय, म्हणून आता पॅरिसमध्ये थेड उडायचाच पर्याय समोर येतोय!

- प्रसाद ताम्हणकर 

 

पॅरिसमध्ये 2024 साली होणा-या ऑलिम्पिकसाठी येणा-या परदेशी स्पर्धकांना आणि दर्शकांना एअर टॅक्सीने प्रवासाचा अनोखा अनुभव मिळणार आहे. पॅरिस सरकार, एअरबस कंपनी आणि एअरपोर्ट्स दे पॅरिस हे संयुक्तपणे या एअरबॉर्न टॅक्सीच्या प्रोजेक्टवरती काम करत आहेत.

गेल्या आठवड्यात पॅरिस येथे झालेल्या ‘पॅरिस एअर शो’चे निमित्त साधून या एअरबॉर्न एअर टॅक्सीची संकल्पना माध्यमांसमोर ठेवण्यात आली. ऑलिम्पिकसारखा जागतिक सोहळा हे अशाप्रकारच्या भविष्यातील गाड्यांना व्हर्टिकल टेक ऑफ आणि लॅण्डिंग बनविण्याची सुसंधी असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पुढील काळात वाहतुकीचा ताण आणि येणा-या  समस्या यांचा विचार करून एअरबॉर्न टॅक्सीसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात येणार आहे. 18 महिन्यांत या जागेची बांधणी करण्याचे आणि पायाभूत सुविधा उभ्या करण्याचं उद्दिष्टं असून, त्यासाठी 10 मिलियन युरो एवढा प्रचंड खर्च अपेक्षित आहे.

प्रत्येक सहा मिनिटाला एक टॅक्सी उड्डाण करू शकेल अशा क्षमतेच्या या सुविधा असणार आहेत. या जोडीलाच सध्याच्या हेलिकॉप्टर कॅरिडोरचीदेखील चाचणी केली जाणार आहे. या एअरबॉर्न टॅक्सीच्या उत्पादनावरती काम करत असलेल्या उत्पादकांकडे या आधीच दोन प्रकारची प्रोटोटाइप मॉडेल्स तयार आहेत. सिंगल सीटर वहाना आणि चारसीटर ’सिटी एअर बस’ अशी त्यांची नावे आहेत.

हा प्रकल्प फक्त सार्वजनिक वाहतुकीवरचा तोडगा नसून, प्रदूषणमुक्ती आणि हवाई वाहतुकीला एक वेगळी दिशा देणारा प्रकल्पदेखील असणार आहे. अर्थात, या एअरबॉर्न टॅक्सीच्या बॅटरीची र्मयादा, दोन हवाई टॅक्सीची हवेत टक्कर टाळण्यासाठी बनवावी लागणारी  यंत्नणा अशा काही प्रमुख अडचणींवरती देखील उत्पादकांना मात करावी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, नागरिक या सेवेला कितपत आपलेसे करतात आणि प्रतिसाद देतात हे पाहावे लागणार आहे. तसेच ही सेवा सुरू होण्याआधी हवाई वाहतुकीच्या नियमांचा पुन्हा एकदा आढावा घेऊन, काही काटेकोर नियम पुन्हा आखावे लागणार आहेत, तसेच हवाई वाहतुकीची पूर्ण रूपरेषाच नव्याने ठरवावी लागणार आहे.

(लेखक तंत्रज्ञानविषय लेखन करणारे पत्रकार आहेत.)

prasad.tamhankar@gmail.com