मावसभावानं त्याला सांगितलं, अरे, रनिंग करत जा, चांगले पैसे मिळतात! म्हणून मग तो धावायला लागला. मोलमजुरी करत जगला, गेल्याच महिन्यात एक मॅरेथॉन तो जिंकला. त्यापैशातून आईच्या डोळ्यांचं तेवढं आॅपरेशन झालं.. ...
ती बुलडाणा जिल्ह्यातल्या एका खेड्यातली. तिचे आई-वडील शेतमजुरी करतात. धावण्याच्या ओढीनं नाशिकला आली. आणि आत्ता ती चीनला निघालीय.. परवा होणाºया एशियन क्रॉस कंट्रीसाठी! ...
लहानपणी धावताना ती पडली, त्यावेळी फक्त खरचटलं होतं. नंतर अॅसिडनं अंग जळालं. अपेंडिक्सचं आॅपरेशन झालं. पायाला फ्रॅक्चर झालं. बसचा पत्रा अडकून पाय फाटला, १८ टाके पडले. तिनं हार मानली नाही. ...
नाशिकचा जुना लौकिक सामाजिक चळवळींचा, साहित्यिक कर्तृत्वाचा, कांदा-द्राक्षांचा आणि नंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाइनसाठीचा! त्यात आता एक नवी ओळख जोडली जाते आहे. ...
स्पर्धा परीक्षांच्या ‘तयारीत’ मीही होतो, मात्र सहावेळा अपयश आलं. एका बाजूला मी माझ्या विषयातही शिक्षण सुरूच ठेवलं. आता पीएच.डी.साठी पोलंडला आलोय.. त्या प्रवासाची गोष्ट... ...