शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्क फ्रॉम होमच्या काळात ऑफिस पॉलिटिक्स होत नाही? - कोण म्हणतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:54 IST

WFH आणि राजकारण

ठळक मुद्देसावध राहा.

- नीला देवस्थळी

ऑफिसला जाणं कमी होऊन आता वर्क फ्रॉम होम वाढलं आहे.आपण ऑफिसातच जात नाही, त्यामुळे कुणाची भेट नाही, त्यामुळे ऑफिस गॉसिप नाही, राजकारण नाही, साहेबाच्या मागेपुढे करणं नाही, असं कुणाला वाटत असेल तर तो भाबडा समज मनातून काढून टाका.कारण उलट घरून काम करताना बॉसला आपलं काम दिसणं, आपल्या कामाचं क्रेडिट आपल्यालाच मिळणं, इतरांनी ते न ढापणं हेही पहायला हवं.अधिक बोलकी माणसं इतरांचं क्रेडिटही घेऊन जातात आणि काही माणसं घरी रात्रंदिवस कामच करतात असंही होऊ शकतं.त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्सचा एक नवीन चेहराही आता दिसतो आहे, त्याविषयीही कोरोनाकाळात लोक विचार करत आहेत.हे मान्य केलं की, आपण ऑफिस पॉलिटिक्स करणार नाही, मात्र तरी आपल्याला कुणी छळलं तर?आपल्या कामाचं क्रेडिट हिरावलं, आपलं काम साहेबाला न दिसणं, त्यानं आपल्यालाच झापणं, चुका होणं किंवा काढणं, आपल्याविषयी कुणीतरी काहीतरी भलतंच पसरवणं, हे सारं होऊच शकतं, त्यामुळे सावध राहा.आणि काही गोष्टींचं भान राखा आणि त्याविषयी सजगही राहा. 

* समजदार को इशारा काफी है, हे लक्षात ठेवून जर कुणी तुमच्या कामाचं परस्पर क्रेडिट घेत असेल तर ऑफिसच्या झूम मीटिंगवर, व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपण काय काम केलं, त्यातला आपला सहभाग हे स्पष्ट आणि सकारात्मक भाषेत लिहा.* आपण जे काम केलं, ते लोक पाहतीलच असं न म्हणता, ते काम इतरांपुढे मांडायला शिका. * केवळ सतत ऑनलाइन अलर्ट न राहता, बॉसला ऑनलाइन न दिसता, आपलं कामही चोख करा. त्यात चुका होणं याकाळात परवडणारं नाही.*ऑफिसच्या ग्रुपवर कोण काय म्हणतं, याचं अन्यत्र ग्रुपवर, पर्सनलवर गॉसिप करू नका.* फोनवर, मेसेजवर काहीही महत्त्वाचं शेअर करू नका, फार जवळचा मित्र असला तरी तो कलीग आहे याचं भान सोडू नका.* घरून काम करताना ऑफिसच्या कामातून तास दोन तास ब्रेक घेतला तर तसं स्पष्ट बॉसला कळवा, त्या दिवशीचं काम त्याच दिवशी करा.*सहका:यांशी उत्तम मैत्री असणं हे चांगलंच, मात्र तरीही ते सहकारी आहेत, शाळकरी वयातले मित्र नाहीत, हे विसरू नका.