शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कायद्यानं अमेरिकेतला वर्णभेद मिटेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:18 IST

अमेरिकेतला कृष्णवंशीय संघर्ष नवीन नाही; पण आजही रंग, केस यावरून भेदभाव होतोच आहे. त्यासाठी नवीन कायदाही आला आहे, मात्र तरीही वर्णभेद सरेल का? प्रश्न आहेच.

-कलीम अजीम 

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याने नुकताच ‘क्राउन अँक्ट’ मंजूर केलाय. प्रस्तावित कायद्यानुसार वेषभूषा व हेअर स्टाइलवरून होणा-या वर्णभेदाला गुन्हा ठरविला गेला आहे. नव्या कायद्यामुळे शाळा, महाविद्यालये तसेच कार्यस्थळी कपडे व केसांच्या नैसर्गिक रचनेवरून भेदभाव केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या बहुचर्चित विधेयकावर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गैविन न्यूसम यांनी हस्ताक्षर केलं. अशाप्रकारचा कायदा करणारं कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिलं राज्य ठरलं आहे. 1 जानेवारी 2020 पासून ‘क्र ाउन अँक्ट’ म्हणजे क्रि एट अ रिस्पेक्टफुल अँण्ड ओपन वर्कप्लेस फॉर नेचुरल हेअर हा कायदा राज्यभर लागू होणार आहे.  अमेरिकी- आफ्रिकी लोक कृष्णवर्णीय (ब्लॅक) असतात. त्यांची शरीरयष्टी धिप्पाड व उंच असते. मुली कमी उंचीच्या असतात. अनेकांचे केस कुरु ळे, लहान, गुंतलेले असतात. या माणसांना दिसण्यावरून श्वेतवंशीय (गो-या) लोकांकडून बराच भेदभाव सहन करावा लागतो. श्वेतवंशीयांकडून त्यांच्यावर वर्णद्वेशी जीवहल्लेही झाले आहेत. 

केसांच्या नैसर्गिक रचनेमुळे दररोज अनेक मुली व महिलांना अमेरिकेत भेदभावाचा सामना करावा लागतो. शाळेत बालकांसोबतही त्यांच्या केसांमुळे दुजाभावाची वागणूक मिळते. काळ्या रंगामुळे सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी, कंपन्या, कारखाने इत्यादी जागी वंश-वर्णभेद केला जातो. कृष्णवर्णीय लोकांना घरे नाकारली जातात. प्रांतीय सरकारकडे येणार्‍या तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता क्राउन अँक्ट करण्यात आला आहे.केवळ आफ्रिकीच नाही, तर भारतीयदेखील अशाप्रकारच्या हल्ल्याचे बळी पडत आहेत. गेल्या वर्षी न्यू जर्सीमध्ये गो-या रेफरीने एका कुस्तीपटूला त्याचे लांब केस कापायला लावले होते. खेळाडूचे केस कात्रीने कापतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. परिणामी जगभरात अमेरिकेची टीका केली गेली.

लॉस एंजिल्सच्या डेमोक्रे ट सीनेटर होली मिशेल यांनी हे विधेयक विधिमंडळात सादर केलं. त्यांचे केसही कुरुळे आहेत. कायदा पारित झाल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘हा मुद्दा आत्मसन्मान आणि खासगी हक्कांचा आहे. या विधेयकामुळे कार्यस्थळी, शाळा व कॉलेजमध्ये वर्णद्वेषी हेट क्राइमला रोखणं शक्य होईल. आमच्याकडे वांशिक व वर्णीय भेदभाव होत नाही असा दावा करणा-या संस्था किंवा लोक  प्रत्यक्षात कृष्णवर्णीय लोकांशी ते असभ्य व असमान वर्तन करतात. त्यांना या कायद्यानं चाप बसेल.’अमेरिकेत ‘ब्लॅक विरु द्ध व्हाइट’ हा संघर्ष तसा फार जुना आहे. वसाहतवादी काळापासून म्हणजे सतराव्या शतकात आफ्रिकी लोकांना अमेरिकेत आणून त्यांना गुलाम केलं जात होतं. एकोणविसाव्या शतकात गुलामगिरी प्रथेविरोधात बंड केलं गेलं. 1861 मध्ये अमेरिकेत गृहयुद्ध सुरू झाले. यातून कृष्णवर्णीय नेतृत्व अब्राहम लिंकन यांचा उदय झाला. लिंकन राष्ट्रपती झाल्यानंतर 1865 साली दास प्रथा संपुष्टात आली.

पुढे बराक ओबामांच्या काळात संशोधन करून वर्णद्वेशाविरोधातील कायदे आणखी कडक करण्यात आले. वर्णद्वेशी भेदभावाविरोधात मानवी अधिकार संघटनांनी अनेक दिशानिर्देश दिले. इतकं  करूनही वांशिक हल्ल्यांवर अमेरिकी सरकार कुठलेच अंकुश लावू शकलं नाही. यावर संतप्त प्रतिक्रिया देत ओबामांनी एकदा म्हटलं होतं की, ‘अमेरिकनांच्या डीएनएमध्ये जातिव्यवस्था व वर्णव्यवस्था आहे.’

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात वर्णद्वेषाच्या घटना घडणे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. मीडिया रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत वर्णभेदी हल्ल्याच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती मिळते. अमेरिका स्वत:ला महासत्ता म्हणून घेते; पण वर्णभेदी गैरकृत्यामुळे त्याची प्रतिमा जगभरात मलिन होत आहे. त्यामुळे हा कायदा आता कितपत काम करतो बघायचं.(कलीम स्वतंत्र पत्रकार आहेत.)kalimazim2@gmail.com