शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

माणसाला वादविवादात हरवणारा AI डिबेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:16 IST

डिबेटर नावाचं एआयवर आधारित मशीन आयबीएमने विकसित केलंय. इस्नयलमधल्या सर्वात तज्ज्ञ वादविवादपटू बरोबर या आयबीएम डिबेटरचा वाद कॅलिफोर्नियामध्ये झाला त्यात हा डिबेटर उत्कृष्ट ठरला !

ठळक मुद्देआयबीएम डिबेटरचा वाद कॅलिफोर्नियामध्ये झाला व त्यात आयबीएमचा डिबेटर उत्कृष्ट ठरला !

- डॉ. भूषण केळकर

2010चा फुटबॉल विश्वविजेता कोण असेल हे ‘पॉल’ नावाच्या ऑक्टोपसने अचूक सांगितलं होतं, हे आपण सारे जाणतोच. आता फिफा जसा पुढे सरकतोय तसं आपण पाहतोय की स्पेन-पोतरुगल (3-3), ब्राझील-स्वित्र्झलड (1-1) बरोबरीत व जर्मनी तर मेक्सिकोकडून 1-0 हरलं, हे सगळं सांगायचं कारण की, आपल्या एआयचा वापर करून जी मॉडेल्स (प्रारूपे) तयार केली आहेत त्यांनी स्पेन-जर्मनी-ब्राझील या उतरत्या क्रमाने, फिफा 2018चा वर्ल्डकप विनर असेल असं सांगितलंय. आताच्या फेरीमधल्या धक्कादायक निकालांनी हे प्रेडिक्शन आश्चर्यकारक वाटतंय - पण हातच्या कांकणाला आरसा कशाला? 15 जुलैचं घोडामैदान दूर नाही ! 2010चा पॉल हा खराखुरा ऑक्टोपस होता. पण 2018चा हा एआयचा अनेक हात-पाय असणारा (चांगला) ऑक्टोपस आपल्या-जीवनाची अनेक दालनं स्पर्शून टाकत जाणार आहे. अगदी क्रीडा क्षेत्रसुद्धा!आजचीच बातमी आहे की, आपण आधी जिला भेटलोय ती अ‍ॅमॅझॉनची अ‍ॅलेक्झा आता मॅरिअट या हॉटेलमध्ये सेवा देईल. हाऊस कीपिंगसाठी व ग्राहकांना काय हवं - नको हे पाहण्याचा अतिथ्य व पाहुणचार करण्यासाठी अलेक्झा कार्यरत असेल.अजून एक ताजी बातमी आहे की, आयबीएम डिबेटर नावाचा एआयवर आधारित मशीन आयबीएमने विकसित केलंय. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध ।’ हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आयबीएमने एआयच्या स्वरूपात आणलंय म्हणा ना! इस्नयलमधल्या सर्वात तज्ज्ञ असणार्‍या वादविवादपटूबरोबरचा या आयबीएम डिबेटरचा वाद कॅलिफोर्नियामध्ये झाला व त्यात आयबीएमचा डिबेटर उत्कृष्ट ठरला ! हे वाचून मला तर दिसायला लागलं की आपल्याकडे टीव्हीवर वादविवाद होत असतो त्यात प्रचंड गोंधळ, शेरेबाजी असते. त्याऐवजी जर प्रत्येक पक्षाचे ‘प्रवक्ते’ म्हणून ‘एआय प्रवक्ते’ दिले तर? असो..तर या एआयच्या तांत्रिक गाभ्याला आपण पोहचतो आहोत. मागील भागात आपण सांख्यिकी व एक्सपर्ट सिस्टीम्स हा भाग बघितला आता या भागात मी तुम्हाला फॅझी लॉजिक व न्यूरल नेटवर्कबद्दल थोडी माहिती देतो.फॅझी लॉजिकमध्ये फॅझी हा शब्द आहे. त्याचा अर्थ गडबड गोंधळ असा आहे ! लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नावात फॅझी असलं तरी हे तंत्रज्ञान अचूक आहे. याला फॅझी म्हणतात. याची दोन कारणं पहिलं म्हणजे ज्या गोष्टींचं अचूक मापन अवघड आहे. अशा गोष्टींसाठी हे अत्यंत सुयोग्य आहे. उदा. एखाद्याचं व्यक्तिमत्त्व एखाद्या कामासाठीची योग्यता इ. आपण अनेक विषयांवर टक्क्यांच्या भाषेत सांगू शकतो की, याला 85 टक्के पडले.पण एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्त्व असं टक्क्यात मोजता येत नाही. अजून साधं उदाहरण देतो. एखादा कपडा किती मळाला आहे - एखादा माणूस किती उंच आहे, या गोष्टीसुद्धा सापेक्ष आहेत - उंची मोजता येत असूनही ! मापन करण्यास अवघड/सापेक्ष संज्ञांसाठी फॅझी लॉजिक उत्तम काम करतं. दुसरं कारण म्हणजे ज्या संज्ञांमध्ये वर्गीकरणात सुस्पष्ट ‘कप्पे’ नसतात तिथे फॅझी लॉजिक वापरतात. एखादा माणूस 75 किलो वजनाचा असेल तर तो जाड व 74.5 किलो असले तर बारीक ठरत नाही ! खरं तर तुमच्या लक्षात येईल की जीवनात बहुतांशी संज्ञा या फॅझीमध्येच मोडतात. अनिश्चितता असणार्‍या!न्यूरल नेटवर्क ही मेंदूमध्ये असणारे मज्जासंस्थेचं अनुकरण करणारी संगणकप्रणाली. एक न्यूरॉन (मज्जातंतू) दुसर्‍याबरोबर संवाद करून आपण ज्याला ‘शिकणं’ म्हणतो ते होत राहते. अनेक थर असणारे न्यूरॉक किंवा नोड्स हे असं त्यांना दाखवल्या जाणार्‍या डाटामधून शिकत जातात व ते नियम गणिती भाषेत/सांकेतिक भाषेत संगणक शिकून ते योग्य वेळी वापरू शकतो.  क्रेडिट कार्डचा गैरवापर वेळीच सांगणं यासाठी गेली 40 वर्षे हे तंत्रज्ञान वापरलं गेलंय. यातील अजून विशेष तांत्रिक बाबी आपण पुढील लेखात बघूया.व्हिस्कीची चव ही अत्यंत फॅझी संज्ञा आहे. माझ्या स्कॉटलॅण्डमधील पीएच.डी.चा विषय हाही व्हिस्कीची चव सुधारणे होता ! माझ्या पीएच.डी.त मी जीव ओतून काम केलं, हे सांगणे न लगे.

(लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)