शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मूठभर प्रकाश....मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाची वाट चालणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 03:00 IST

मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाची वाट चालणं यालाच तर म्हणतात दिवाळी..यंदा आपल्या मनात हा यशाचा दिवा उजळू दे..

Our greatest weakness lies in giving up. The most certain way to succeed is always to try just one more time.” - Thomas Edison
दिव्याचा शोध लावणारा एडिसन. या मुलाला काहीही येत नाही असं लेबल त्याच्या शिक्षकांनी त्याच्यावर चिकटवलं होतं. ‘स्टुपिड’ अशी पदवीच त्याला शाळेनं बहाल केली होती. काहीच धड जमत नाही म्हणून त्याच्या पहिल्या दोन नोकºया गेल्या. कामावरून काढून टाकलं गेलं त्याला. पुढे दिव्याचा शोध लागला. त्यावेळेस त्यानं सांगितलं की, एक हजारवेळा मी हा दिवा उजळवण्याचा प्रयत्न केला; पण काही जमलं नाही. तेव्हा त्याला कुणी विचारलं की म्हणजे तू हजारवेळा अपयशी ठरला होतास?
त्यावर एडिसन म्हणाला, हजारवेळा अपयश नाही आलं तर या हजार पद्धतीनं हा दिवा लागत नाही हे मला कळलं..
आता सांगा, ज्या जगानं एडिसनला स्टुपिड ठरवलं ते जग, आपल्याला जिनिअस ही पदवी सहज देऊन टाकेल का?
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न.
हजारवेळा अपयश येऊनही आपल्याला हवं ते काम करण्याइतपत पेशन्स आपल्यात आहे का?
आपण रडतोच फार..
किती कारणं सांगतो, हे झालं म्हणून ते झालं आणि ते झालं नाही म्हणून हे झालं नाही..
साधं उशिरा पोहचण्याचं उदाहरण घ्या..
आपलं अपयशच ते, वेळेवर न पोहचण्याचं..
पण आपण पटकन म्हणत नाही की, उशिरा उठलो म्हणून उशीर झाला..
आपण फुटकळ कारणं सांगतो, पाऊस होता, गाड्या लेट, ट्राफिक जाम..
म्हणजे आपल्या अपयशाचं खापर आपण सतत दुसºयाच्या डोक्यावर फोडायला पाहतो..
ज्याला अपयश स्वीकारता येत नाही, तो यश काय स्वीकारणार?
म्हणजे पहा..
प्रश्न काहीही असो, अपयश कशातूनही येवो आपण त्यासाठी जबाबदार घटकांची यादी घेऊनच फिरतो..
असं नाही म्हणत की, चुकलं माझंच काहीतरी, नाही जमलं मला, अंदाज फसला, कुवत कमी पडली, तयारी कमी पडली, क्षमता वाढवायला हवी..
हे नाहीच..
आपण सतत इतरांकडे बोट दाखवतो..
कधी आपले पालक, कधी आर्थिक परिस्थिती, कधी समाज आणि कुणी नाहीच भेटलं तर देव आणि नशीब आहेतच..
त्यांना दोष देऊन मोकळं व्हायचं..
परिणाम?
आपलं अपयश संपत नाही..
आणि मग आपण म्हणतो, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही..
अपयश म्हणजे काही आपल्यावरचा डाग नव्हे..
उलट हारलो म्हणजे निदान आपण त्या खेळात तरी होतो हे सिद्ध होतं..
हरणं वाईट नाहीच; पण त्या अपयशातून आपण किती पटकन उभे राहिलो यावर पुढची जित ठरते..
धोनी सिनेमात एक प्रसंग आहे..
शालेय क्रिकेटच्या काळातला..
युवराज सिंगच्या संघाविरोधात हरण्याचा..
धोनी सांगतो, पता है हम मॅच कहां हारे? बास्केटबॉल कोर्ट पर?
कारण त्याचे सहकारी युवराजचा तामझाम पाहून तिथंच मनोमन पत्करतात की, याच्यापुढे आपला निभाव नाही..
हे धोनीला कळलं म्हणून तो हरला नाही आणि हरला तरी संपला कधीच नाही..
हे उभं राहणं जमेल आपल्याला?
का नाही?
दिवाळी हेच तर सांगते..
मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं
आणि प्रकाशाची वाट चालणं
यालाच तर म्हणतात दिवाळी..
यंदा आपल्या मनात हा यशाचा
दिवा उजळू दे..
हीच प्रार्थना..

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017