शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

सोमवारचं 'माहिती व्रत' करून तर पहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 7:00 AM

हे लोकशाहीचं काम आहे, ते एका चकरेत नाही झालं तर पुन्हा पुन्हा करा, पण व्रत सोडू नका. कसलं व्रत?

-    मिलिंद थत्ते 

माहिती अधिकाराचा वापर नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात सुरू केल्यावर शासनाच्या असं लक्षात आले की शेकडय़ांनी अर्ज पडून राहताहेत. प्रलंबित अपिलांची संख्याही मोठी आहे. पुणे महानगरपालिकेत माहिती अधिकार कार्यकत्र्याचा रेटा आणि तत्कालीन अधिकार्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद यातून एक चांगली व्यवस्था तयार झाली. दर सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळात नागरिकांनी थेट महानगरपालिकेच्या कार्यालयात यावे, कोणते अभिलेख/ फायल्स पहायच्या आहेत ते लिहून द्यावे व त्यांना लगेच तिथेच फायल्स दाखविण्यात येतील. त्यातली जी पाने त्यांना झेरॉक्स करून पाहिजेत ती सांगावीत व प्रतिपान दोन रु पये भरून ती घेऊन जावीत, अशी व्यवस्था महापालिकेने केली. त्यामुळे नागरिकांनाही वेळेवर माहिती मिळू शकली व अधिकार्‍यांच्या मागचा प्रलंबित प्रकरणांचा तापही कमी झाला. यावरून शिकून शासनाने 26 नोव्हेंबर 2018ला असा जी.आर. काढला की सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये अशाप्रकारे सोमवारी 3 ते 5 यावेळात तत्काळ माहिती देण्यात यावी. सोमवारी सुटी असली तर मंगळवारी हेच काम करावे. तर मग घ्या हे सोमवारचे व्रत! कोणत्याही सरकारी आफिसात किंवा ग्रामपंचायतीत किंवा शासनाचे अनुदान वा शासकीय भूखंडप्राप्त कोणत्याही कार्यालयात जा. हा खाली दिलेला अर्ज साध्या कागदावर लिहा आणि हातात माहिती घेऊनच या. (हा अर्ज नमुन्यापुरता आहे. तुम्ही बदल करू शकता) आणि बरं का, हे व्रत आहे! हे पुन्हा पुन्हा करावे लागेल. तेव्हा लोकशाहीचा भोळासांब प्रसन्न होईल. पहिल्याच वेळी जाल आणि माहिती मिळेल असं होणार नाही; पण पुन्हा पुन्हा हे करा आणि नोकरशाहीला सवय लावा - लोकांना उत्तरदायी असण्याची. पण हे करताना उतू नका, मातू नका, घेतला वसा.. !