शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

जगा पोटभर....आपल्या शरीराचंच भरणपोषण नसेल तर आपल्या मनाचं काय पोषण होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 2:00 AM

आपल्या शरीराचंच भरणपोषण नसेल तर आपल्या मनाचं काय पोषण होणार? आणि कशा लढणार आपण स्वत:साठी निवडलेल्या लढाया? आणि जिंकणार कशा?

You don't need a silver fork to eat good food."हे वाक्य वाचून कुणाला तरी पटकन वाटेल की, काय हे यांना खायचं येऊन पडलंय. प्रेरणादायी विचारांच्या रांगेत खाणंपिणं कुठं येतं का?- येतं!आणि हेच आपल्याला कळत नाही, आणि आपलं दिवसाचं गणित दिवसेंदिवस बिघडत जातं.आपलं स्वत:वर नसतंच प्रेम. पण खाण्यावरही नसतं आणि भुकेवरही!पोटात भुकेचा यज्ञ भडभडून पेटलेला असताना आपण त्यात आहुती कसली देतो?चहाची.कुरकुरे, वेफर्स किंवा वडापावची!आणि त्यानं भूक तर भागत नाहीच, पोट बिघडतं आणि त्याच्या रेट्यानं मनही भिरभिरायला लागतं हे आपल्या लक्षातही येत नाही..आणि जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आपल्या शरीरानं आपल्याशी असहकार पुकारलेला असतो..शरीराचे अनेक विकार हे पोट साफ नसल्यानं होतात..आणि पोट साफ होत नाही कारण अनेकदा आपण खातच नाही किंवा योग्य पदार्थ, योग्य प्रमाणात, योग्यवेळी, नियमित खात नाही..एक साधं उदाहरण घ्या..आपण सकाळी उशिरा उठतो, कसंबसं आवरतो, घोटभर चहा पितो आणि जातो कॉलेजला..पोट रिकामंच...मग चिडचिड होते. वर्गात लक्ष लागत नाही. भांडणं होतात.. मूड जातो. उदास वाटतो..याला कारण काय तर नास्ता न करणं..त्यानं रक्तातली साखर कमी होते आणि आपला मूड बिघडतंच जातो..पोटभर नास्ता करून, मस्त शांतचित्तानं कॉलेजला जा..तो दिवस वेगळा वाटेल..गोष्टी छोट्याच असतात. पण आपण त्या कॉम्प्लिकेट करतो..बिघडवून टाकतो..आणि मग त्याचा टोल आपल्या शरीराला भरावा लागतो..भुके पेट भजन नहीं होता,ते सैन्य पायावर नाही, पोटावर चालतंया वाक्यापासूनची फिलॉसॉफी समजून घ्या. आणि मग स्वत:ला विचारा की, आपण काय खातोय..आपल्याला आउटडेटेड वाटते आपली पारंपरिक बाजरीची, ज्वारीची, कळण्याची नि नागलीची भाकरी..नको वाटतात पातळ पालेभाज्या, डाळीसाळी, उसळींचं तर वावडंच..कोशिंबिरी आणि आमट्या तर फारच मागास..जे पदार्थ आईनं मायेनं शिजवले, त्या पदार्थात आपण शंभर चुका काढतो आणि म्हणतो हे काय जुनाट करता तुम्ही..मग आपण निवडतो काय?पॅक्ड फूड. प्रोसेस्ड फूड. दोन मिन्टात तयार होणारं जंक फूड.रात्रीची पोळी आपल्याला शिळी वाटते आणि सहा सहा महिने पॅक्ड करून ठेवलेलं अन्न चटकदार लागतं, यात किती विरोधाभास आहे?एरव्ही जिथंतिथं लॉजिक शोधतो आपण?आणि उसळी, शेवगा आणि सोयाबीन नाकारत प्रोटीन पावडरचे भपके मारतो..विचार करून पहा.नक्की चुकतंय कुठं आपलं?आपल्या शरीराचंच भरणपोषण नसेल तर आपल्या मनाचं काय पोेषण होणार?आणि कशा लढणार आपण स्वत:साठी निवडलेल्या लढाया?आणि जिंकणार कशा?या दिवाळीत घरच्या फराळावर मस्त ताव मारा..खा बिनधास्त चकल्या-करंज्या आणि जगा पोटभर..उगीच कशाला करायची स्वत:ची उपासमार?नाही का..

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017