शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आपला तो पपी, रस्त्यावरचा तो कुत्रा?

By admin | Updated: April 5, 2017 18:14 IST

खूप दिवसांपासून एक गोष्ट खटकत होती, कदाचित लिहून मनातील वेदना १०० ग्रॅम कमी होतील.कुत्रा पाळण्याची श्रीमंतांची जुनी सवय आता मध्यमवर्गीय व इतरांनाही लागली आहे.

ब्रॅण्डेड श्वान पाळण्याच्या एक फॅडवर एक सवालखूप दिवसांपासून एक गोष्ट खटकत होती, कदाचित लिहून मनातील वेदना १०० ग्रॅम कमी होतील.कुत्रा पाळण्याची श्रीमंतांची जुनी सवय आता मध्यमवर्गीय व इतरांनाही लागली आहे. कुत्रा पाळून आम्ही समस्त पृथ्वीतलावरील प्राणी मात्रांवर भुतदया करत आहोत असा काहींचा समज. कुत्रा पाळण्यात काही गैर नाही हो पण आपली पद्धत चुकीची आहे का, त्यामागचा विचार चुकीचा आहे का हे जरा आपण पहायला हवं.कुत्राच पाळायचाय तर तो ब्रॅण्डेड का? म्हणजे लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड, बूलडॉग, वगैरे वगैरे. तो काय फोन, टिव्ही. किंवा बाईक आहे काय? एक जिवंत प्राणी आहे. खरी आधाराची गरज रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लांना आहे. कुत्रीने नुकत्याच जन्माला घातलेल्या ५-६ पिलांमधून घ्याना एक-एक पिल्लू सगळेजण, काय फरक पडेल?काही जणांचा तर इतका राग येतो की संध्याकाळी आपल्या ब्रॅण्डेड कुत्र्याला फिरायला घेऊन जाताना जर चुकून त्याच्याजवळ कुणी रस्त्यावरचा कुत्रा आला तर त्याला इतक्या जोरात हातातील काठी किंवा दगड मारतात की त्याच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून मान विव्हळतं. यालाच म्हणतात का श्वानप्रेम? चाळीतही कुत्रा पाळण्याचं नवीन ट्रेंड. घरात रूसुन बसलेल्या आपल्या ब्रँडेड कुत्र्याला १ तासापासून खाऊन घे पप्पी, माय बच्चा, काय झालं? असं म्हणणारा दारात शिळ्या भाकरीच्या तुकडयासाठी आलेल्या रस्त्यावरच्या कुत्र्याला इतक्या जोरात चप्पल मारु न ओरडतो की त्याच्या घरात पुन्हा जाण्याची स्वत:ची इच्छा मरते. एरव्ही छटाकभर पाली आणि झुरळांना घाबरणाऱ्या काही नखरेबाज मुली ५-५ फूट उंच आणि अंगावर पोतंभर केस असणाऱ्या आपल्या ‘पपीची पापी’ कोणत्या बहादूरीच्या गोळ्या खाऊन घेतात कळत नाही.मित्रांनो, माझी ही पोस्ट लाईक, शेअर केली नाही तरी चालेल, पण जरा विचार तर करा यावर? - राम पंडित