शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवणारा गजाआड

By admin | Updated: July 16, 2017 02:34 IST

परदेशातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या मोहम्मद तारीक खान (२२, रा. मानखुर्द) याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : परदेशातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या मोहम्मद तारीक खान (२२, रा. मानखुर्द) याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.तोे मूळचा बिहारमधील नवादा जिल्ह्याचा रहिवासी आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मोहम्मदकडून पोलिसांनी आतापर्यंत २६ पासपोर्ट, वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांची नियुक्तीपत्रे, व्हिजिटिंगकार्ड आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दरम्यान, मोहम्मद कंपन्यांच्या नावाने पॅम्पलेट छापून ते वितरित करून गरजू लोकांची फसवणूक करायचा, असे पोलिसांनी सांगितले. त्याला पोलिसांनी अटक केली, तेव्हा त्याने एकावर एक असे सात शर्ट, पॅण्ट घातल्याचे दिसून आल्याने पोलीस हैराण झाले. याबाबत, त्याला विचारले असता आपल्याला थंडीताप आल्याचे त्याने सांगितले.काही दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलीस ठाण्यात प्रेरणा कन्सल्टन्सी कंपनीचे मालक प्रकाश बोडके यांनी खानभाई नावाच्या इसमाने आपल्या कंपनीचा लोगो वापरून परदेशात नोकरीचे आमिष दाखवत पाच जणांना लाखोंचा गंडा घातल्याची तक्र ार नोंदवली होती. पोलिसांनी खानभाई नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. या आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नसल्याने पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान होते. या आरोपीला जेरबंद करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, पोलीस उपायुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त अमित काळे, सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रेय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक विलास मोरे, सुरेश पाटील यांचे पथक नेमून शोध सुरू केला. पोलिसांना खानभाईचा मोबाइल नंबर मिळाल्यावर त्या नंबरआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर, या खानभाईच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.मुंबई, नवी मुंबई, कल्याण येथील बेरोजगार तरुणांना दुबई, सौदी, कुवेत येथे नोकरीचे आमिष दाखवून तेथील व्हिसाकरिता किमान ५ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत रक्कम तो उकळत होता. आतापर्यंत त्याने २६ जणांना गंडा घातल्याचे दिघावकर यांनी सांगितले. कल्याण न्यायालयात मोहम्मदला हजर केले असता त्याला न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.मित्राच्या नोकरीतून सुचली फसवणुकीची शक्कलमोहम्मद हा दहावी शिकलेला असून त्याच्या एका मित्राला एका क न्सल्टन्सीतून पैसे भरू न नोकरी लागली आणि तो परदेशात गेला. त्यामुळे आपण बनावट कन्सल्टन्सी काढून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळू आणि नंतर शहरातून पळून जाऊ, अशी शक्कल सुचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.