शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

फायटर

By admin | Updated: December 4, 2015 15:22 IST

रूपा आणि रितू. भर रस्त्यात अ‍ॅसिड हल्ला झाला आणि त्या दोघींचं जगणंच त्यात खाक झालं. तरी मोठ्या हिमतीनं उभं राहत

 - हीनाकौसर खान-पिंजार ( हीना लोकमतच्या पुणे आवृत्तीत बातमीदार/ उपसंपादक आहेत.)

रूपा आणि रितू.
भर रस्त्यात अ‍ॅसिड हल्ला झाला
आणि त्या दोघींचं जगणंच त्यात खाक झालं.
तरी मोठ्या हिमतीनं उभं राहत
त्यांनी या हल्ल्याविरोधात जनजागृतीचे प्रयत्न सुरू केलेत.
वयाच्या ऐन पंचविशीत रंगरूपाची फिकीर न करता
त्या एक मोठी लढाई लढताहेत.
आणि सांगताहेत, 
आम्ही कोणी पीडित नाही,
बिचाऱ्या नाही. 
आम्ही आमच्यावरच्या हल्ल्याविरुद्ध 
शारीरिक, मानसिक लढा देत संघर्ष करतोय.
तोंड लपवत नाही, तर ताठ मानेनं जगतोय. 
आम्हाला दया नको, कुणाची कीवही नको!
त्यापेक्षा साथ द्या, 
आणि आपल्या अवतीभोवती मुलींवर
असे हल्ले होणार नाहीत याची तेवढी काळजी घ्या. 
 
 
 
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्त्रियांना एकत्र आणून 
दरवर्षी एका नव्या चर्चेला व्यासपीठ देणारी 
‘लोकमत विमेन समीट’. 
त्या चर्चेत सहभागी झालेल्या 
अ‍ॅसिड अ‍ॅटॅक फायटर मुलींशी या विशेष गप्पा.
 
अ‍ॅसिड हल्ला झाला,
हे सिद्ध करतेय!
 
 
मी व्हॉलिबॉल खेळाडू होते. व्हॉलिबॉल खेळणं हे माझं पॅशन होतं. त्याही दिवशी मी मैदानावरून व्हॉलिबॉलची प्रॅक्टीस करून घरी परतत होते. सायंकाळची ४-४.३० ची वेळ होती. माझ्या ३९ वर्षांच्या आतेभावानं एकाला सव्वा लाखाची सुपारी देऊन माझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. चेहऱ्यावर अ‍ॅसिड पडताच, मला जळजळ व्हायला लागली आणि क्षणात काहीही दिसणे बंद झाले. नुसताच काळोख दाटला. मी विव्हळत होते, तडफडत रस्त्यावर पडले. रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमा झाली. मात्र कोणीही मदत करायला पुढे आलं नाही. तो मात्र त्याच चौकात एका गाडीत बसून माझी तडफड पाहत होता. थोड्या वेळाने कोणीतरी माझ्या भावाला ही घटना सांगितली आणि मग मला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. या सगळ्यात एक तास गेला आणि तोवर मी बरंच काही गमावलं.
आणि हे सारं का झालं तर माझे वडील, काका आणि आत्यांमध्ये एका घराच्या मालमत्तेवरून वाद सुरू होते. त्या वादविवादाची मी बळी ठरले. त्यात मला असं वाटतं की, त्याच आत्याच्या मुलाला मी बहुधा आवडूू लागले होते. फोन यायचा तेव्हा तो माझ्याशीच बोलायचा. तो माझ्या दुप्पट वयाचा होता. मला नीटसं समजत, उमजतही नव्हतं. अप्रत्यक्षपणे मी आईला एकदा सांगण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र तिलाही तेव्हा ते नीटसं उमगलं नाही. आणि त्यानं माझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकलंच. हल्ल्यानंतर तीन महिन्यांनी जेव्हा मी माझा चेहरा आरशात पाहिला तेव्हा वाटलं, ‘इससे बेहतर तो मै मरही जाती..’ पण नंतर या ट्रॉमातूनही मी बाहेर आले. ज्यानं माझ्यावर अ‍ॅसिड फेकलं तो आज तुरुंगात आहे. मात्र न्यायालयात त्याच्याच समोर उभं राहून मला स्वत:वर झालेला अ‍ॅसिडहल्ला सिद्ध करावा लागतोय. पण मी तेही करतेय! आपण आपली लढाई आपल्यासाठीच लढायची, दुसरं कोण लढणार?