शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

...वेगळाच रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:42 IST

तिच्या एकाही मित्राला मेसेज, फोन, साधं बोलूही न देणं, सगळ्या केलेल्या गोष्टींच्या नोंदी त्याला देणं, एखादा मैत्रिणीसोबत फोटो का काढला, कुठं काढला असल्या प्रश्नांसाठी बांधील राहाणं. हे कपडे घाल, ते घालू नको. हे कर - ते करू नको, याच्याशी बोल - बोलू नको आणि त्याच्या रूमवर गेलं तर तिथेही सुखाने न राहू देणं, नाजूक क्षणांचे व्हिडीओ काढणं .. हे सगळं काय चाललंय?

- श्रुती मधुदीप

1... आणि तिने पुन्हा एकदा त्याच्या रूममध्ये पाऊल ठेवलं. नेहमीसारखंच हृदय धडधडू लागलं तिचं. पुढचा क्षण काय आणि कसा येईल आणि ती कशी सामोरी जाईल त्याला, ते तिला कळत नव्हतं. तरी ती स्वत:ला धीर देत होती. रूममध्ये खूप पसारा होता. त्याच्या आणि त्याच्या रूममेट्सच्या कपड्यातून दुर्गंधी येत होती. काल-परवाचे बाहेरून आणलेले खाण्याचे पार्सल्स नीट कचाऱ्याच्या डब्यात टाकलेसुद्धा नव्हते. अर्थात तिच्यासाठी हे सगळं सवयीचं झालं होतं. त्याच्या रूमवर काही पहिल्यांदा येत नव्हती ती. घरातलं अतिस्वच्छतेचं वातावरण आणि इथे अतिअस्वच्छता याची सवय होत होती तिला. पण दररोज त्याच्या रूमवर येताना, रूममध्ये पाऊल टाकतानाची अस्वस्थता, घालमेल ती कुणाला सांगू शकत नव्हती. अगदी तिच्या सगळ्यात लाडक्या मैत्रिणीला-जानूलादेखील नाही. जान्हवीने तिला त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये जाण्यापूर्वीच सांगितलं होतं - ‘तो तुझ्या कितीही मागे लागलेला असला तरी तो तुझ्यासाठी नाहीय, हे लक्षात घे हं. किती वाईट नजर वाटते त्याची.’ तिने हे ऐकलं; पण माहीत नाही का, तिने त्यालाच होकार दिला. खरं तर कॉलेजमधले कितीतरी लोक तिच्या केसांवर, फिगरवर नव्हे नव्हे असण्यावरसुद्धा फिदा होते; पण तिला मात्र यालाच होकार द्यावास वाटला. ‘मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे.’ असं म्हणून एकदा ती भेटायला आली नाही तर ब्लेडने कापून घेतलं. त्याने तिच्या नावाचं इनिशियल लेटर, स्वत:च्या हातावर. दुसºया दिवशी हे पाहून, त्याचा हात हातात घेऊन हमसून हमसून रडली ती. आणि अचानक जवळ येऊन त्यांनी किस केलं एकमेकांना. सगळं वाटणारं दु:ख, प्रेम या एका किसमधून व्यक्त झालंय असं वाटलं तिला !इतक्यात तो तिच्या कानाशी ओरडलाच, ‘ए आवर जरा.. चल ते बघ किती गदंगी आलीय रूममध्ये’ आणि तिने रूम आवरायला सुरु वात केली. घरात तिच्या मनाला वाटलं की तासन् तास आवरायची ती घर; पण त्यावेळी कुणी आॅर्डर करायचं नसायचं; पण इथे मात्र स्वत:च्या बॉयफ्रेण्डच्या आॅर्डरमुळे आवरायला लागत होतं. तिने फार विचार न करता रूम आवरायला घेतली आणि तिला तिच्या हातावर पडलेले चट्टे दिसले. तिला मागच्या दोन-तीन दिवसांची आठवण येऊन शहारायला झालं. आपण इथे काय करतोय, याचं उत्तर तिला सापडत नव्हतं. स्वत:चं यांत्रिकीकरण करवून घेऊन आपण इथे आलोय असं वाटलं तिला. किंवा आपल्याला वाटणाºया प्रेमाचं आकलनच होत नाहीय आपल्याला असं वाटलं तिला. आणि तिच्या लक्षात आलं, खरं तर या सगळ्यापल्याड आपल्याला भीती वाटतेय. प्रचंड भीती ! म्हणून आपण इथे येतो. त्याने कुठल्याही भाषेत आपल्याला काहीही सांगो आपण ते ऐकतो. सगळं सोडून निघून जावं असं वाटलं तिला; पण हातावरचे चट्टे भीतीची जाणीव करून देऊ लागले. स्वत:च्या वडिलांचंसुद्धा कधीमधीच ऐकणारी ती ती इतकी सरेंडर का झाली होती परिस्थितीला? त्याला? कोण जाणे. इतक्यात तो तिच्याजवळ आला. त्याने तिचे एक-एक कपडे काढायला सुरु वात केली. तिने डोळे मिटून घेतले. आणि...2... आणि ती त्याच्या रूमच्या बाहेर पडली त्याला काहीही न कळवता. लवकारत लवकर घरी पोचावं असं वाटलं तिला; पण हातावर-शरीरावर उमटलेल्या या नव्या चट्ट्यांचं काय करायचं, घरी कुणी विचारलं तर तिला प्रचंड रडू कोसळलं; पण रडण्यासाठीची स्पेस या शहरातल्या रस्त्यांवर नाही, हे तिला समजेचना. पुन्हा पुन्हा तिच्यासोबत सेक्स करत असताना त्याने तिच्या अंगावर दिलेले चट्टे, ‘नको नको’ म्हणत असतानाही काढलेले व्हिडीओ याने ती वेड्यात जमा झाली होती. जवळ यायला, किस करायला, सेक्स करायलादेखील तिची ना नव्हती; पण ..इतक्यात ‘जानू इज कॉलिंग’ असं फोनवर उमटलं. तिने धीराने फोन उचलला.‘हॅलो अगं आहेस कुठं?’‘मी घरी चाललेय गं..’‘कुठून?’‘अं कॉलेजवरून’‘अगं हे काय ! मला सांगितलंपण नाहीस. तू तिकडेच थांब. मी येतेय. किती दिवस झाले आपण छान भेटलो नाही.’‘अगं नको. ऐक ना’इतक्यात फोन कट झाला होता.3.जान्हवी आली आणि तिला पाहून ती हरखून गेली. काय करावं आपण, ते तिला कळेचना. कुठून आणि काय विचारावं !‘अगं’ जान्हवीने बोलायला सुरु वात केली.‘‘श्शा’ असं म्हणून जान्हवीच्या गळ्यात पडली ती. आणि आजूबाजूच्या लोकांना कळेल इतकं हमसून हमसून रडू लागली. त्याचं तिच्या एकाही मित्राला मेसेज, फोन, साधं बोलूही न देणं, सगळ्या केलेल्या गोष्टींच्या नोंदी त्याला देणं, मी फोनवर कुणाशी आणि काय बोलतेय हे सतत कॉन्फर्न्स कॉलवर राहून चेक करणं, एखादा मैत्रिणीसोबत काढलेलादेखील फोटो का काढला, कुठं काढला असल्या प्रश्नांसाठी आपण बांधील राहाणं. हे कपडे घाल, ते घालू नको. हे कर - ते करू नको, याच्याशी बोल-बोलू नको, रस्त्यावरून चालताना चुकून एखाद्या मुलावर नजर पडली तर जाब विचारणारा तो ! आणि रूमवर गेलं तर तिथेही सुखाने न राहू देणारा!जान्हवीच्या मिठीत तिला हे सगळं आठवलं. आणि आपण चेकमेट झालोय असं वाटलं तिला.जान्हवीने तिला मिठीतून बाहेर काढत तिच्याकडे प्रश्नार्थक बघितलं.‘काय झालंय? तू का रडतेयस इतकी? आणि इतकी वीक का वाटतेयस ? काही झालंय का? काय झालंय?’ जान्हवीने विचारलं.काही काळ स्तब्धता गेली आणि ती म्हणाली,‘जानू ! तुझी खूप गरज आहे. समजून घेशील ना मला?’‘हो अगं पण झालंय काय?’ती काहीच बोलली नाही. कितीतरी रडू तिच्या आतमध्ये दबून होतं.‘आत्ता निघते. बोलू.’ असं म्हणून ती पाठमोरी झाली. तिच्या रस्त्याने ती चालू लागली. बहुतेक वेगळाच रस्ता तिला खुणावू लागला होता. dancershrutu@gmail.com