थांबलो नाही म्हणून जगलो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST2018-09-06T07:00:00+5:302018-09-06T07:00:00+5:30

गाव सोडलं, संकटं आली, फसवणूक झाली; पण संघर्ष थांबवला नाही.

Did not stop, so live ... | थांबलो नाही म्हणून जगलो...

थांबलो नाही म्हणून जगलो...

ठळक मुद्देनवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. त्यातून आपण शिकत जातो.

विठ्ठल देवकर

मी सोलापूर जिल्ह्यातल्या लऊळ या छोटय़ाशा गावचा. घरची परिस्थिती खूपच हालाखाची जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून वडिलांसोबत आठवडा बाजारात चुना  (पान  तंबाकू खायचा) विकायला जायचो. उन्हाळी आणि दिवाळी सुटय़ांमध्ये वडिलांना मदत करायला, चुनखडी गोळा करायला जायचो. अशा परिस्थितीत शिकलो, दहावी झालो.
 आम्ही दोघं भाऊ. मी धाकटा. आईला नेहमी वाटायचं माझ्या एकातरी पोरानं शिकलं पाहिजे. त्यात भावकीचा खूप त्नास. मग वडिलांनी ठरवलं पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी टाकायचं. म्हणून अकरावी-बारावीसाठी अकलूजला शिकायला पाठवलं. पहिलं वर्ष खडतर गेलं; परंतु प्रसंगांना एकटय़ानं धीरानं तोंड देत गेलो. बळ मिळत गेलं. नंतर मागे वळून पाहिलं नाही. बारामतीमध्ये बीएस्सी, कम्प्युटर सायन्स केलं.
एमएस्सी करायला पुण्यात आलो. त्याच काळात एका मित्नानं सांगितलं तुला कसबा पेठमध्ये रूम मिळवून देतो; पण एका महिन्याचं भाडं इस्टेट एजंटला द्यावं लागेल. नंतर कळलं तो त्याचा मोठा भाऊ होता, इस्टेट एजंट पण नव्हता. त्यांनी मला फसवलं. फार वाईट वाटलं. त्याच काळात फार वाईट दिवस अनुभवले. पण त्यातूनही शिकलो, तरलोच.
आता मी एका नामांकित बहुराष्टीय कंपनीत उत्तम पदावर काम करतो आहे. अजून पुण्यात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला भेटणारी सगळीच माणसं चांगली असतात असं नाही. नवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. त्यातून आपण शिकत जातो. संघर्ष करतो आणि त्याला मेहनतीची जोड देतो. प्रवास सुरूच ठेवतो.

 

Web Title: Did not stop, so live ...