शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

ग्रीन ह्युमर सांगणारा एक दातांचा डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 16:01 IST

त्याला वन्यप्राणीही आवडायचे आणि चित्रकलाही. पण झाला तो डेण्टिस्ट. मात्र आवड हाका मारत होती, मग एका टप्प्यावर त्यानं चित्रकला आणि वन्यजीव दोघांचा हात धरत एक नवीन करिअरच घडवलं.

ठळक मुद्देवन्यप्राण्यांची चित्रं आणि व्यंगचित्रं यासाठी प्रसिद्ध असणार्‍या रोहन चक्रवर्तीसह एक सहल..

- ओंकार करंबेळकर

तुम्हाला कधी असं वाटतं, आपल्याला आवडतं भलतंच, आपण शिकलो भलतंच. पण असं वाटणारे असे आपण एकटेच नसतो. मात्र नुस्तं वाटणं आणि आपल्याला जे आवडतं तेच झोकून देऊन करणं यात फरक आहे. मात्र हे बोलायला जितकं सोपं आहे, तितकं ते करणं अवघड. ज्याच्यात जिद्द अफाट तेच हे करू शकतो. आणि तसं करणारे म्हणून अपवाद ठरतात.  गेली काही वर्षे इंटरनेटवर एका व्यंगचित्रकारानं धमाल उडवून दिली आहे. पर्यावरणावर भाष्य करणारी, पर्यावरणीय समस्या दाखवणारी त्याची काटरून्स आणि प्राण्यांची माहिती देणारी सुटी चित्रं, जंगलांचे नकाशे याच्यावर वन्यजीव अभ्यासकांच्या अक्षरशर्‍ उडय़ा पडत आहेत. या हरफन मौला मुलाचं नाव आहे रोहन चक्रवर्ती. त्याचं झालं असं या मुलाला चित्रकला आणि वन्यजीव अशी एकाचवेळी दोनदोन विषयांची आवड होती. मग काय या साहेबांनी दोन्ही विषयांना एकत्र करून त्यातून स्वतर्‍ वेगळं करिअर तयार केलं आणि आपल्याला आवडतं ते काम आता तो मनापासून करतोय.    लहानपणापासून रोहन आणि त्याचा भाऊ रोहित यांना जंगलामध्ये भटकायची संधी मिळाली. त्यांच्या आजोबांना वन्यजीवांची विशेष आवड होती. त्यामुळे अगदी तीन वर्षाचे असल्यापासून या दोन्ही भावांना जंगलात जाता यायचं, पशू-पक्ष्यांची नावं माहिती झाली आणि प्राण्यांना पाहिल्यावर नावंही सांगता यायची. रोहन तर आजोबांना जंगलाचा विश्वकोशच म्हणतो. रोहनने नंतर डेण्टिस्ट होण्यासाठी डेण्टल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण, शिक्षण घेतानाच त्याच्या लक्षात आलं आपण काही हे काम आयुष्यभर करू शकणार नाही. वेदनेने त्रस्त असणार्‍या लोकांच्या जबडय़ात हात घालून दातांच्या समस्या दूर करायच्या हे काम आपलं नाही, हे त्याला जाणवलं. मग काय पदवी मिळवल्यावर प्रॅक्टिस वगैरे न करता त्यानं सरळ अ‍ॅनिमेशनचं काम सुरू केलं. बंगळुरूमधल्या एका फिल्म स्टुडिओसाठी तो अ‍ॅनिमेशन करू लागला.

चित्रकलेबद्दल असणारी आवड त्याला येथे कामाला आली. त्याच्या करिअरमध्ये अशा उडय़ा मारण्याच्या निर्णयामागे त्याचे आई-बाबा उभे राहिले. त्यांनी त्याला साथ दिली. रोहनबरोबर त्याचा भाऊसुद्धा वन्यजीव क्षेत्रातच कार्यरत आहे. रोहनने पर्यावरणीय व्यंगचित्रकलेला निवडलं तर रोहितने चक्क वटवाघळांना.  रोहित वटवाघळांचा अभ्यासक आहे.    अ‍ॅनिमेशनच्या कलेमध्ये गती आल्यानंतर रोहननं पर्यावरण व वन्यजीवांच्या विषयावर कार्टून्स  काढायला सुरुवात केली. ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक बिट्ट सहगल यांच्या सँक्च्युरी एशिया या वन्यजीव मासिकात प्रसिद्ध झालं. त्यानंतर रोहनने मग वेगात आगेकूच सुरू केली. वन्यजीव आणि पर्यावरण विषयालाच वाहिलेली ही कार्टून्स इतर प्रकाशकांनाही आवडली आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये त्याची चित्रं, व्यंगचित्रं प्रसिद्ध होऊ लागली. मग त्यानं व्यंगचित्रांसाठी ग्रीन ह्युमर नावानं एक कंपनी आणि वेबसाइट सुरू केली. या वेबसाइटवर तो त्याची चित्रं आणि प्राणी-पक्ष्यांची कार्टून्स  छापलेल्या वस्तू विकतो. काटरून्स काढण्यासाठी प्राणी-पक्षीच का निवडले असं विचारल्यावर तो म्हणतो, राजकीय नेत्यांवर सर्वच व्यंगचित्रकार चित्रं काढतात; पण मला ते जमलं नसतं, त्या विषयात मला गती नाही. त्यातून मला निसर्गाची आवड व्यंगचित्रांइतकीच होती. त्यामुळे मी निसर्ग हाच विषय निवडला. जगभरातल्या प्रसिद्धी माध्यमांत जंगलं आणि पर्यावरण हा विषय नेहमी आधी यावा असं मला वाटतं.    सध्या रोहनकडे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या कामासाठी विनंती करतात. प्रत्येक आठवडय़ाला तो एक क़्रमिक स्ट्रीप प्रसिद्ध करतो. भारतातल्या व देशाबाहेरील जंगलांचे चित्रमय नकाशेही तो काढतो. या नकाशांना भरपूर मागणी आहे. (उदा र्‍ कान्हा जंगल, कर्नाटकातील वन्यजीवांचा चित्रमय नकाशा). डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियासाठी त्यानं केलेलं द ग्रेट इंडियन नेचर ट्रेल हे कॉमिक बुक 22 जून रोजी प्रसिद्ध होत आहे, तर डब्ल्यूडब्ल्यूएफ हाँगकाँगसाठी त्यानं चित्रमय सागरी नकाशे तयार करायला घेतले आहेत. त्यानं प्राण्यांची काढलेली कार्टून्स आणि टी-शर्ट, घडय़ाळे, कॉफीमगवर छापलेले काटरून्स सगळ्यांनाच आवडली. या आगळ्यावेगळ्या कल्पनेवर रोहनने स्वतर्‍चं एक यशस्वी करिअर उभं केलं आहे. तो म्हणतो, या कामातून मिळत असलेल्या समाधानाचा विचार केला तर दुसरी कोणतीच गोष्ट इतका आनंद मला देऊ शकणार नाही असं दिसतं. किंबहुना प्राणी आणि व्यंगचित्रं या पलीकडे आता माझ्या मनात दुसरे विचारच येत नाहीत इतकं या विषयावर माझं प्रेम आहे.    येत्या काळामध्ये रोहन त्याची सर्व व्यंगचित्रं एकत्र करून पुस्तक प्रसिद्ध करण्याच्या विचारात आहे. रोहन म्हणतो, तुम्ही जर इतर कोणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत राहिलात तर तुमच्यामधील सुप्त गुणांचा, शक्तींचा पूर्ण वापर कधीच होणार नाही.  हे मला ज्या दिवशी लक्षात आलं त्याच दिवशी मी ग्रीन ह्युमरच्या कामाला सुरुवात केली.