शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

देशातलं पहिलं टेक-डीअँडिक्शन सेंटर

By admin | Updated: June 19, 2014 21:35 IST

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्स (निम्हांस) ही देशातल्या सर्वात मोठी मानसिक विकार उपचार संस्था. वेगवेगळी व्यसनं, मानसिक व्याधी यावर या संस्थेत उपचार केले जातात. पण या संस्थेत आपल्या मुलांना मारुनमुटकून घेऊन येणार्‍या पालकांचा राबता वाढला आणि त्यातून त्यांना हे डीअँडिक्शन सेंटर सुरू करावं लागलं.

डॉ. अमित मालविय
बंगळुरूमध्ये मागच्याच महिन्यात देशातलं पहिलं ‘टेक-डीअँडिक्शन सेंटर’ सुरू झालं.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्स (निम्हांस) ही देशातल्या सर्वात मोठी मानसिक विकार उपचार संस्था. वेगवेगळी व्यसनं, मानसिक व्याधी यावर या संस्थेत उपचार केले जातात. पण या संस्थेत आपल्या मुलांना मारुनमुटकून घेऊन येणार्‍या पालकांचा राबता वाढला आणि त्यातून त्यांना हे डीअँडिक्शन सेंटर सुरू करावं लागलं.
आपली मुलं तासन्तास सोशल नेटवर्किंग साईट्सवर असतात, तासन्तास चॅटिंग करतात, फोनवर बोलतात, मोबाइल गेम्स खेळतात हे सांगणार्‍या पालकांनी शेवटी डॉक्टरांची मदत मागितली. त्याचदरम्यान बंगळुरूमध्ये एका तेरा वर्षाच्या मुलीनं आत्महत्त्या केली. आईनं फेसबुक वापरायला बंदी केल्याचा राग येऊन या मुलीनं स्वत:चा जीव घेतला. अनेक पालक त्यानं जास्तच हादरले. इथं काम करणार्‍या मानसोपचत्र तज्ज्ञांना या सार्‍याचा अंदाज होताच कारण किशोरवयीन मुलांमध्ये ज्या तीव्रतेनं इंटरनेट अँडिक्शनचं प्रमाण कसं वाढतंय याचा ते अभ्यास करत होतेच. 
व्यसनी माणसू ज्या टोकाच्या पद्धतीनं रिअँक्ट करतो, तसंच ही मुलं रिअँक्ट करतील आणि ते घातक आहे, त्यांना योग्य मदत मिळून पुरेशी जनजागृती करणं आवश्यक आहे, असं लक्षात आल्यानंच हे टेक-डीअँडिक्शन सेंटर सुरू झालं.
आणि आजच्या घडीला मोठय़ा प्रमाणात तरुण आणि टीनएजर मुलं या केंद्रात उपचार घेत आहेत.
 
भावी डॉक्टरांना इंटरनेटचा आजार
इंदौरमध्ये मेडिकल स्टुडण्टच्या एका सर्व्हेक्षणाचा निष्कर्ष
इंटरनेट अँडिक्शन डिसऑर्डर. कुणाला गाठू शकते ही व्याधी?
- रिकामटेकड्यांना.?
ज्यांना काहीच काम नाही, अभ्यासात गती नाही, मन कशात रमत नाही.असे तरुण लवकर अँडिक्ट होत असावेत.
असा आपला एक समज आहे. प्रत्यक्षात तसं आहे का?
समाज ज्या तरुणांना हुशार समजतो, जी मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात, त्यांची मोठी स्वप्न असतात.त्या मुलांनाही या व्याधीनं ग्रासलं तर? मुख्य म्हणजे त्यांना होऊ शकतं असं अँडिक्शन?
भोपाळमधल्या डॉक्टरांच्या एका ग्रुपला भेटलं तर या प्रश्नाचं उत्तर चटकन मिळेल. भोपाळमधल्या चिरायू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कम्युनिटी मेडिसिनचा एक विभाग आहे. त्या विभागातल्या डॉक्टरांसह इंदौरमधल्या काही डॉक्टरांनी आणि डॉक्टरकीचं प्रशिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीने मिळून मेडिकल कॉलेजात शिकणार्‍या मुलामुलींच्याच इंटरनेट वर्तनाचा अभ्यास केला. त्या अभ्यासावर आधारित त्यांचा रिपोर्ट नुकताच नॅशनल र्जनल ऑफ कम्युनिटी मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेला आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या, सदैव अभ्यासाचं ओझं वाहणार्‍या विद्यार्थ्यांना इंटरनेट वापर किती आहे आणि तो वापर अँडिक्टिव्ह आहे का? याबाबतचं हे संशोधन.
ते संशोधन करणारे चिरायू मेडिकल कॉलेजमधले असिस्टण्ट प्रोफेसर डॉ. अमित मालविय सांगतात, ‘आम्ही सलग सहा महिने या मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करत होतो. त्यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी थेट बोलून, प्रश्न विचारून आम्ही माहिती संकलित करत होतो. अपेक्षेप्रमाणं इंटरनेट मॅराथॉन वापराचं प्रमाण तर होतंच, मात्र त्या वापरातून शंभरपैकी ८0 जण हे इंटरनेट अँडिक्ट होतील की काय? असं वाटावं इतका दीर्घ वापर ते इंटरनेटचा करताना आढळले. त्यातून त्यांच्या वर्तनातही जाणवण्याइतपत बदल आम्हाला दिसून आला.’
 
वर्तनबदल काय दिसले?
१   आपण नेटचा वापर किती काळ केला याचं या मुलांना भानच राहत नाही. सलग चार-चार तास नेटवर बसणारे अनेक जण. त्यातून त्यांना फटीग येणे, डोके दुखणे, डोळे चुरचुरणे, पाठदुखी असे किरकोळ आजारही सुरू झालेले दिसतात.
२   कॉलेजमधलं किंवा कॅम्पसजवळचं इंटरनेट बंद असलं, वीज नसली की ही मुलं हायपर व्हायची. ते आनंदानं गप्पा मारताहेत, हसताहेत हे चित्र कमी दिसू लागलं आणि ते चिडचिड करायचे, इरीटेट झालेले असायचे. निराश व्हायचे, बरंच काम पडलंय, नेट नाही तर कसं होणार म्हणत तक्रार करायचे.
३   या मुलांचा समंजसपणा, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करण्याची वृत्तीही कमी झालेली दिसली. आमच्या कॉलेजात कॉम्प्युटरच चांगले नाहीत, त्यावरचे सॉफ्टवेअरच अपडेटेड नाही, कॉम्प्युटर लॅब जास्त वेळ वापरायची परवानगी द्यायला हवी. अशा तक्रारी ही मुलं करत. पण या वरवरच्या तक्रारी, मुळात कितीही काळ नेट वापरलं तरी त्यांचं मन भरत नसे, अजून हवं ही भावना प्रबळ असे हे त्यातून प्रकर्षानं दिसलं.
४   या मुलांची अभ्यासातली प्रगती तुलनेने घसरलेली होतीच, पण त्यांचं बाहेर फिरणं, लोकांशी बोलणं, जुन्या मित्रांकडे मैफली जमवणं हेही कमी झालेलं दिसलं. सदैव चिडचिड त्यांचा पिछा काही सोडत नव्हती.
 
. जिंदगी ऑफलाइन भी है.!
‘‘या मुलांना भेटून, बोलून आम्ही त्यांना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होतो की, 
जिंदगी सिर्फ ऑनलाइन रहनेमें नही है, वो ऑफलाइन भी है और जादा सुंदर है.
पण या मुलांना इंटरनेटच्या जगात जी मजा येते, 
ती असली आयुष्यात येत नाही हाच खरा प्रश्न होता. 
खरंखुरं आयुष्य इंटरेस्टिंग करायचं कुणी या प्रश्नाचं उत्तर मात्र ते स्वत: शोधत नाहीत, 
हीच अडचण आहे.’’
 
(लेखक हे असिस्टण्ट प्रोफेसर, कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेण्ट, चिरायू मेडिकल कॉलेज, भोपाल येथे कार्यरत आहेत. )