सावधान ! तुम्ही कोरोनाचा ऑनलाइन ट्रॅपमध्ये तर नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 06:00 IST2020-04-16T06:00:00+5:302020-04-16T06:00:07+5:30
ऑनलाइन काम करताय, व्यवहार करताय; पण ऑनलाइन फिशिंगच्या जाळ्यात अडकू नका.

सावधान ! तुम्ही कोरोनाचा ऑनलाइन ट्रॅपमध्ये तर नाही ?
आवेज काझी
देशभरात लॉकडाउन आहे. सगळे घरात बसलेत. काहीजण वर्क फ्रॉम करत आहेत. बहुतांश काम ऑनलाइन सुरूआहे.
त्यासाठी इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. मात्र त्यामुळे सायबर गुन्हे करणा:यांनीही डोकं वर काढलं आहे.
कोरोना व्हायरससंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने सायबर गुन्हे दाखल करून, त्यांचा तपास सुरूआहे.
मात्र आपण फसवले जाणार नाही, याची काळजी आपण वापरकत्र्यानीच घेणंही गरजेचं आहे.
सायबर गुन्हेगार फिशिंग वेबसाइट्स, मालवेअर अॅप्लिकेशन्स, फ्रॉड कॉल्स मॅसेजेस, स्पॅम्स, फेक मॅलिशिअस लिंक्स, स्कॅमिंग अशी तंत्र वापरत असल्याचं दिसतं.
1. त्यातलाच अत्यंत कॉमन प्रकार म्हणजे चुकीच्या लिंक्स पाठवून त्यावर यूजर्सला लॉगइन करायला भाग पाडलं जातं.
त्यातून यूजर्सचा ई-मेल आयडी, पासवर्ड चोरी करणं, गोपनीय माहिती मिळवणं, ती वापरून आर्थिक व्यवहार करणं असे प्रकार सर्रास घडत असतात.
2. सगळ्यांनाच वाटतं की कोरोनासंदर्भात आपण अपडेट राहावं. त्यासाठी अनेकजण अॅप्स डाउनलोड करतात. मात्र बनावट कोरोना व्हायरस अॅप्सद्वारे यूजर्सला एखादं अॅप्लिकेशन इन्सटॉल करण्यासाठी भाग पाडलं जातं. ते आपण इन्स्टॉल करतोय हे अनेकदा लक्षातही येत नाही.
मात्र त्यातून बायनरी फाइल्स यूजरच्या मोबाइल किंवा डिव्हाइसमध्ये इन्सर्ट केले जातात. त्या डिव्हाइसमधील माहिती चोरून ऑनलाइन गैरव्यवहार केले जातात. त्यामुळे गरज नसेल तर अनावश्यक अॅप्स याकाळात डाउनलोड करूनका. बॅँक मॅनेजर, विमा ऑफिसमधून बोलतोय अशा फोन कॉल्सना उत्तरं देऊ नका.
3. रिमोट लोकेशन तसंच डार्कवेबचा आधार घेऊन हॅकर्सनी सध्या अनेक गुन्हे करत आहेत. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन व्यवहार कराल तेव्हा अत्यंत सावध, सावकाश आणि नेहमी करता तोच करा. अनावश्यक गोष्टी टाळा.
4. सध्या अजून एक मोठी गोष्ट म्हणजे अफवा पसरवणं. अफवा, खोटय़ा बातम्या, भडकाऊ भाषण, समाजाची शांतता - एकोपा भंग व्हावी म्हणून फॉरवर्ड चेनमध्ये ढकललेला मजकूर आपल्यार्पयत आलाच तर तो फॉरवर्ड करू नका.
5. एखाद्या धर्माविषयी फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक व्हिडीओ, टेलिग्रामव्दारे जी माहिती आपल्यार्पयत येईल, ती खातरजमा नसेल तर पुढे ढकलू नका. व्हायरल करू नका.
अशी चुकीची माहिती पसरवली म्हणून भादंवि कलम 5क्5 (2), सहकलम कलम 52 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2क्क्5 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो.
6. कुणी अफवा पसरवत असेल तर ते थांबवण्यासाठी पुढाकार घ्या. स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती द्या.
किंवा http://www.cybercrime.gov.in इथंही माहिती नोंदवता येईल.
7. कोविड-19 बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक 14 मार्च 2020 रोजी अधिसूचना जाहीर केलेली आहे. त्यानुसार कोणतीही व्यक्ती/ संस्था कोरोना विषाणूबाबत खोटय़ा बातम्या अगर अफवा पसरवताना आढळल्यास त्यांना साथरोग प्रतिबंध कायदा, 1897च्या कलम क्3 अन्वये नमूद केल्याप्रमाणो जबाबदार धरले जाईल. असे कृत्य भारतीय दंड संहिता, 186क्च्या कलम 188 अन्वये दंडनीय अपराध आहे. याखेरीज आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
त्यामुळे चुकीची माहिती, अपप्रचार करू नका.
8. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिन्सची आता ही जबाबदारी आहे की,
ग्रुपचे सदस्य काय टाकतात. काही अफवा तर फॉरवर्ड करत नाहीत ना? एक संदेश एकावेळी एकाच व्यक्तीला आता फॉरवर्ड करण्यात येणार आहे. त्यामुळे अफवांना अटकाव होईल. मात्र व्हॉट्सअॅप अॅडमिननेही सतर्क राहण्याची गरज आहे.
(लेखक लातूर येथे पोलीस उप-निरीक्षक असून, सायबर गुन्हे अभ्यासक आहेत.)