शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बॉण्ड पूर्ण न करता 10,683 तरुण डॉक्टर्स गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 4:14 PM

पदवी अभ्यासक्रमाचे 9373, पदव्युत्तर अभ्यासक्र माचे 1300 आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्र माचे 1क् असे एकूण 10,683 डॉक्टरांनी आपली बंधपत्रित सेवा (बॉण्ड) पूर्ण केली नसल्याचं आकडेवारी सांगते. ही आकडेवारीही दोन वर्षापूर्वीची आहे. आता कोरोना काळात तरी शासन या डॉक्टरांना सेवा द्यायला भाग पाडणार की नाही?

ठळक मुद्देआता कोरोना संकटकाळात तरी यासंदर्भात कार्यवाही व्हायला हवी

- डॉ. विठ्ठल साळवे, 

आज राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचं काम अहोरात्र करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आशा, अंगणवाडीसेविका, रुग्णालयात काम करणारा इतर कर्मचारी वर्ग, पोलीस, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी व महानगरपालिका व नगरपालिका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांना मानाचा मुजरा. हे सारेच कोविडकाळात खूप छान काम करत आहेत. पण प्रश्न खूप मोठा आहे आणि आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे.मागच्या वर्षी नायर रु ग्णालयात एका निवासी डॉक्टरने आत्महत्या केली होती त्यावेळेस मी काही माहिती मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका येथे माहितीच्या अधिकाराचा अर्ज केला होता ज्याच्या उत्तरात केइएम रुग्णालय, नायर रुग्णालय ते कस्तुरबा रुग्णालय येथील डॉक्टरांच्या रिक्त पदांची संख्या समोर आली होती. ही रिक्त पदे अनेक वर्षे दुर्लक्ष झाल्यामुळे निर्माण झालेली आहेत आणि तीन महिन्याच्या कंत्नाटी नियुक्तीने सुटणारा नाही. जी अवस्था बृहन्मुंबई महापालिका रुग्णालयाची आहे तीच अवस्था महाराष्ट्र राज्यातील इतर महानगरपालिका रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयाची आहेत. (या संबंधीचा सर्व कार्यालयीन माहिती माहितीच्या अधिकारातून आमच्याकडे उपलब्ध आहे.)वैद्यकीय महाविद्यालयात थोडीफार बरी अवस्था आहे. पण सर्व दवाखाने, आरोग्य केंद्र व सरकारी रु ग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांची रिक्त पदे एका आठवडय़ात, एका महिन्यात किंवा एका वर्षात नाही भरता येणार त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन योग्य ती प्रशासकीय पावले उचलावी लागतील. कोविड-19च्या तीन स्तरातील रुग्णालयांमधील डॉक्टरांची गरज आणि कोविड रुग्णाच्या उपचारासाठी शासकीय यंत्नणोला डॉक्टरांची नितांत गरज आहे.गेल्या महिन्याभराच्या कामातून उपलब्ध डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण वाढतोय. त्यासाठी अनेक महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने तात्पुरती नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण त्यालाही पुरेसा प्रतिसाद मिळत नाही, असे अनेक बातम्यातून लक्षात येतंय. तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या 4 मे 2020  परिपत्नकानुसार मुंबईतील सर्व खासगी डॉक्टरांना 15 दिवसांच कोविड रुग्णालयातील सेवा बंधनकारक करण्यात आलेली आहे; पण या प्रक्रि येला वेळ लागेल. म्हणून कनिष्ठ डॉक्टर (ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदे) आणि महानगरपालिका व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कोविड-19साठीच्या तात्पुरत्या नेमणुका या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  रु ग्णालयातून उत्तीर्ण होणा:या आणि शासकीय सेवा देणो आवश्यक असणा:या डॉक्टरांच्या माध्यमातून भरण्यात याव्यात. माजी वैद्यकीय शिक्षणमंत्नी गिरीश महाजन यांनी तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना दिलेली पाच वर्षाची आकडेवारी लक्षात घेता पदवी अभ्यासक्रमाचे 9373 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 1300 आणि अतिविशेषोपचार  अभ्यासक्र माचे दहा उमेदवार असे एकूण 10,683 उमेदवारांनी बंधपत्रित सेवा केली नसल्याचे स्पष्ट दिसते आहे.ही आकडेवारी 2 ते 3 वर्षापूर्वीची आहे, आता त्यासंख्येत भर पडलेली असणार हे नक्की.आजची स्थिती काय आहे याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे इतके डॉक्टर जर उपलब्ध आहेत तर कोविड आणि नॉनकोविड म्हणजेच कोरोनाही अन्य आजारांवर उपचारासाठीही या डॉक्टरांचा मोठा उपयोग आरोग्य सेवेसाठी व्हायला हवा.या कामासाठी मुख्यमंत्नी सचिवालयाने 21 ऑक्टोबर  2016 आणि 6 एप्रिल 2017च्या कार्यालयीन पत्नानुसार एक पारदर्शक (ऑनलाइन) प्रक्रिया महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल)च्या तांत्रिक सहकार्याने, वैद्यकीय शिक्षण  विभागाने आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून व्हायला हवी होती; पण सरकारी लालफीतशाहीमुळे ही ऑनलाइन प्रक्रि या प्रलंबित राहिली, पुढे सुरूच होऊ शकली नाही.  आता कोरोना संकटकाळात तरी यासंदर्भात कार्यवाही व्हायला हवी1. मुख्यमंत्नी सचिवालय किंवा  मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या देखरेखीत ऑनलाइन प्रक्रि या तात्काळ सुरू  करण्यात यावी.2. दहा हजारहून अधिक डॉक्टर ज्यांनी शासकीय सेवेची अट पूर्ण केलेली नाही त्यांचा उपयोग करून महापालिका रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व स्तराची रु ग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येतील रिक्त पदे भरण्यात यावी. 3. या प्रक्रियेसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नगर विकास विभाग (महानगरपालिका रुग्णालये) यांचा समन्वय अत्यावश्यक आहे. 4. या सर्व प्रक्रि येत महाराष्ट्र शासनाची तांत्रिक मदत करण्याची माझी तयारी आहे. गेली नऊ वर्षे मी या प्रक्रियेच्या पाठपुराव्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी माझा वेळ आणि पैसा वापरला आहे. कोरोना काळात तरी या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं आणि महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था मजबूत करावी, अशी आशा आहे.

(डॉ. विठ्ठल शहीद हॉस्पिटल छत्तीसगड येथे वैद्यकीय अधिकारी असून, सार्वजनिक आरोग्य याविषयात कार्यरत आहेत.)