शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

कोरोना लस आणि तरुण मुलं- जगभरात  नेमकी  काय  चर्चा  आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 5:18 PM

कोविड-19चा संसर्ग आता तरुणांनाही मोठय़ा प्रमाणात होत असल्याचं शास्रज्ञांचं म्हणणं आहे. काहीजण म्हणतात की, तरुणांना वाचवणं हा प्राधान्यक्रम हवा काही म्हणतात की, तरुणांनीच लस संशोधनात व्हॉलेन्टिअर म्हणून पुढं यावं.

कलीम अजीम 

जागतिक आरोग्य संस्थेचा याच आठवडय़ात एक अहवाल प्रसिद्ध झाला. जगभरातील तरु णाईच्या चिंतेत भर टाकणारा हा अहवाल आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सुरु वातीच्या चार महिन्यांच्या तुलनेत या गेल्या 60 दिवसांत कोविडमुळे बाधित होणा:यांत तरुण सर्वाधिक आहेत.24 फेब्रुवारी ते 12 जुलैदरम्यान 60 लाख बाधितांची आकडेवारी पाहता असं दिसतं की साधारण  15-24 वर्षे वयोगटातील तरुण बाधितांचे प्रमाण आता 4.5 टक्के होतं ते वाढून आता 15 टक्क्यांर्पयत गेलं आहे.दुसरीकडे शास्रज्ञांनी जाहीर केलं आहे की, तरुणांना संसर्ग वाढला असला तरी त्यानं त्याचं फार काही नुकसान होईल अशी शक्यता कमी आहे.उल्लेखनीय म्हणजे मागेही शास्रज्ञांनी हेच मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर अनेक तरु णांनी व्हॅक्सिनच्या परीक्षणासाठी व्हॉलिन्टिअर म्हणून आपली नावं नोंदवली होती; परंतु तरीही तरुणांची संसर्गाची वाढती संख्या ही काही सुखद गोष्ट नव्हे.3क् जुलै रोजी न्यू यॉर्कटाइम्समध्ये प्रकाशित झालेला एक लेखही यासंदर्भात काही माहिती देतो.  व्हॅण्डर्बिल्ट युनिव्हर्सिटीतून निवृत्त झालेले बायोमेडिकल शास्रज्ञ लॅरी चर्चिल यांनी शोधनिबंध सादर केला आहे. त्यानुसार तरु णांना संक्रमणापासून वाचवणं हा समाज आणि शासनाचा प्राधान्यक्रम असला पाहिजे, असं ते म्हणतात.त्यांच्या मते, वृद्धांच्या तुलनेततरु णांना लागण होणो अतिहानिकारक आहे. आपल्या निबंधात त्यांनी काही संसर्ग झालेल्या वृद्धांची निवेदनं नोंदवली आहेत. तरु णांना कोविडपासून वाचवणं अधिक हितकारक असल्याचे कोरोनाबाधितांनी म्हटलं आहे. त्याआधारे चर्चिल मांडणी करतात की, वृद्धांनी आपलं आयुष्य जगले आहे, तेव्हा तरु णांना वाचवणं प्राध्यान्यक्र म असला पाहिजे. हे मत नैतिकतेच्या चौकटीत बसत नाही असा न्यू यार्क टाइम्सचा सूर आहे. त्यासाठी काही विश्लेषणही मांडण्यात आलेलं आहे. मानवी हक्क संघटनांनीदेखील यासंदर्भात आपल्या हरकती दाखल केल्या आहेत.चर्चिल यांचा हा निबंध प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर सखोल भाष्य करतो. त्यांनाही वाटतं की तरु णांनी परीक्षण मोहिमेत अधिक सहभाग नोंदवावा. जागतिक आरोग्य संघटनेने व्हॅक्सिन व परीक्षणासंदर्भात नवी माहिती प्रसारित केली आहे. संघटनेच्या एक मुख्य वैज्ञानिक असलेल्या सौम्या स्वामीनाथन यांनी लसनिर्मितीच्या प्रक्रियेविषयी बुलेटिन दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडे सुरू असलेल्या लसविकासाच्या मोहिमेत 2क्क् उमेदवारांनी सहभाग नोंदवल्याचं त्या सांगतात. अल जङिारा म्हणते, की या परीक्षण मोहिमेत बहुतेक तरु ण वॉलिन्टेअर आहेत.कोविडवर लस शोधण्याच्या प्रक्रियेत जगभरात गती आलेली आहे. रिपोर्ट सांगतात की चालू महिन्यात काहींचे अंतिम निष्कर्ष येऊ शकतात. रशियानंतर अमेरिकानेदेखील व्हॅॅक्सिन शोधल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात 15 जुलैला न्यू यॉर्क टाइम्समध्ये बातमी प्रकाशित झाली. अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ आणि ‘मोडेरना इंक लॅब’मध्ये डॉ. फाउची आणि त्यांच्या सहका:याने ह व्हॅक्सिन विकसित करण्यात आले आहे. तरु ण मुलांवर ही परीक्षण मोहीम राबवण्यात आली. टेस्टसाठी स्वत:हून अनेक नवयुवक वॉलेन्टिअर्स पुढे आल्याचे मीडिया रिपोर्ट सांगतात. चालू महिन्यात व्हॅक्सिनची महत्त्वाची परीक्षणं होतील. तब्बल 3क् हजार जणांवर ही टेस्ट केली जाईल. यात बहुतेक वृद्धांचा समावेश प्रथमच केला जात आहे. शास्रज्ञांनी आवाहन केलं आहे की, जास्तीत जास्त तरु ण वॉलेन्टिअर्सनी या परीक्षण मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा.

 रशियाने प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन सुरू केले आहे. चालू आठवडय़ात व्हॅक्सिनच्या पेटेंटसाठी रशिया अर्ज करणार आहे. रशियन न्यूज एजन्सी ‘स्पुतनिक’ने यासंदर्भात अधिकृत रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्याच्या मते, ‘इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी’च्या प्रयत्नामुळे हे मेडिसिन तयार झाले. भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटने व्हॅक्सिन तयार केल्याचा दावा केला आहे.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायङोशनच्या मते प्रतिबंधात्मक व्हॅक्सिन वेळेत आलं नाही तर कोविड धोक्याची अतिउच्चपातळी गाठू शकतो. कोविडसंदर्भातली संघटनेचे बहुतेक आडाखे पूर्णत्वाकडे जात आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये भारतात संक्र मणाची लाट येईल हे भाकितही खरंच ठरतं आहे.सद्य:स्थितीत भारतात तरु णाच्या संसर्गाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. ‘स्टे होम’ आणि ‘बी सेफ’ हे दोन मंत्र मात्र आपल्याला स्वत:लाच अंगी घोटून घ्यावा लागणार आहेत.

 

कलीम अजीम(कलीम मुक्त पत्रकार आहेत)