शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

दिवाळी नंतर बोअर होतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 4:41 PM

दिवाळी धडाक्यात साजरी होते. रुटिनही सुरू होतं. पण मग कंटाळा, थकवा, आळस डोकं वर काढतात. इतकी सुट्टी मिळून, इतकं सेलिब्रेशन होऊनसुद्धा ‘बोअर’ होणं’ थांबत नाही. का?

ठळक मुद्दे नव्यानं वेगळं काय मजेदार घडणार आयुष्यात आणि सततच कसं घडत राहणार?

- प्राची पाठक

‘दिवाळीची काय खरेदी?’, ‘सुटीत कुठे जाणार फिरायला?’, ‘काय मग यंदाच्या दिवाळीला काय स्पेशल?’,  ‘पुढच्या दिवाळीर्पयत तरी करा लग्न, उडवून टाका बार.’,  ‘या दिवाळीत तरी वाढणार का पॅकेज?’ या आणि अशा स्वरूपाच्या असंख्य प्रश्नांनी आपण घेरलेलो असतो. एकीकडे आपल्यालासुद्धा सणावारी काहीतरी ग्रेट घडावं असं वाटत असतं आणि दुसरीकडे इतरांचे असे प्रश्न. कोणी या दिवाळीत काय भन्नाट गोष्ट केली, याच्या चर्चा आजूबाजूला होत असतात. बाजारात नवनवीन प्रॉडक्ट्स आलेले असतात. डिस्काउण्ट, व्हरायटी, ऑफर्स, खरेदीची रेलचेल आणि नुसती स्पर्धा. सगळे काहीतरी मिळवण्यासाठी धावताय. इतरांपेक्षा वेगळे असे काहीतरी हवेच आहे प्रत्येकाला.त्यात आताशा सोशल मीडियाचं प्रेशर. सगळे आपले हॅपी हॅपी नटले-सजले फोटो टाकतात सगळीकडे. ‘मी भारी’, ‘आम्ही आणखीन भारी’ अशी ही धावपळ. इतरांना सारखं काहीतरी दाखवायचं आहे. आपणही या स्पर्धेतल्या कशाला बळी पडलेलो असतो. काही जिद्दीने नाकारलेले असते. इतरांच्या सेलिब्रेशनचे ताणतणाव कळत-नकळत आपल्यावर प्रभाव टाकत असतात. कोणी नुकतेच नोकरीला लागलेले असते आणि आपण मनात आशा लावून बसलेलो असतो. कोणी सुट्टीत झकास ट्रीपला जातात. महागडे टूर्स बुक करतात. कोणी एखादा कोर्स करतात. आपल्याला तो परवडत नसतो, त्याबद्दल नाही म्हटले तरी किंचित वाईट वाटत असते. कधी आपल्याला तशी आवडच नसते. पण ‘तो/ती बघ कसे मार्गाला लागले. तुम्ही बसा आळसात लोळत’, असे सल्ले अंगावर भिरकावले जातात. त्यात घरात साफसफाई, खरेदी, फराळ बनवण्याची धावपळ. येणारे जाणारे. थकवा तर येतोच. दिवाळी तर आनंदात पार पडते. सेल्फीचा क्लिकक्लिकाट होतो. ग्रुप फोटो निघतात. पाटर्य़ा, भेटीगाठी, फराळाचे राउण्ड्स सगळं साग्रसंगीत पार पडतं. आपल्या मनातली हुरहूर त्यात दडपली जाते. पण एकदा का दिवाळी संपली की जणू रबराचा ताण सोडल्यासारखे सैरभैर व्हायला होतं. समोर एकदम काहीच दिसत नसतं धमाकेदार. रुटिन सुरू करायचा कंटाळा आलेला असतो. फेस्टिव्ह मूड जाता जात नसतो. थोडा आळस साठतो. आधी कशाच्या तरी निमित्ताने ‘हे करू की ते करू’ प्लॅन्स बनवणार्‍या आपल्या शरीर-मनाला पुढचं नेमकं  असं टार्गेटच मिळत नाही. मग कंटाळा, थकवा, आळस डोकं वर काढतात. इतकी सुट्टी मिळून, इतकं सेलिब्रेशन होऊनसुद्धा ‘बोअर’ होणं ेथांबत नाही. आणखीन चेंज हवाच आहे, असं वाटत राहतं. परत नव्यानं वेगळं काय मजेदार घडणार आयुष्यात आणि सततच कसं घडत राहणार? दिवाळीनंतर अशी फेज अनेकांच्या वाटय़ाला येते. कळत नाही करायचं काय.त्यावर हे काहीसे साधेसोपे उपाय.1. एकतर अशावेळी आपलं रुटिन चटकन सुरू करायचा प्रय} करायचा. आपली सणासुदीची उत्सुकतादेखील घालवायची नाही आणि एकदम ताण सुटल्यासारखं आळशीसुद्धा व्हायचं नाही.2. गाडीचं कसं सव्र्हिसिंग करतो, देखभाल करतो आणि मग जोमाने ती वापरतो, तसंच शरीर मनाचं सव्र्हिसिंग फेस्टिव्ह मूडमध्ये झालेलं आहे, असे समजायचं. यापुढे तर आणखीन झकास गिअर टाकत, तजेलदार होत पुढचे प्लॅन्स बनवायचे आहेत, हे स्वतर्‍ला बजावायचं.3. रुटिनमधला असा आनंददायी असा कोणताही ब्रेक नव्याने आयुष्याला सामोरे जायला वापरून घेतला पाहिजे. दिवाळी येणार, येणार करत जो उत्साह मनात होता, तोच उत्साह दिवाळी सरल्यावरदेखील टिकवता आला पाहिजे. फारतर, थोडा थकवा जाणवेल नव्याने रुटिन सुरू करायला. त्यात फराळाची हाय कॅलरी मेजवानी झोडलेली असते. त्यानंही एक जडपणा आलेला असतो. म्हणूनच, आपला सणावाराचा ताण एकदम सुटणार आहे/सुटला आहे आणि त्याचा वेगळा आळस आपल्यात भरून राहणार आहे, हे आधीच स्वतर्‍ला सांगून ठेवायचं.4. छोटे छोटे का होईना, नवीन प्लॅन्स दिवाळीनंतरच्या काळात आखून ठेवायचे. व्यायाम सुरू करायचा. त्यानुसार अगदी शंभर टक्के जमलं नाही, तरी हळूहळू काम सुरू करायचं. उत्साहाने डोंगर चढलेली गाडी डोंगर उतरल्यावर पायथ्याशी पडीक ठेवायची नाही. हळूहळू पुढचे प्रवास आखायला सुरू करायचे. त्या दिशेने जात राहायचं. पुन्हा नव्यानं आणि  जोरदार प्रवास करण्यासाठी. असं केल्यानं दिवाळीचा थकवा तर जाणवणार नाहीच, उलट नवा उत्साह येईल पुढच्या प्रगतीसाठी. ट्राय तर करा..