शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

BLACK - पावसाळ्यात काळ्या रंगाची फॅशनेबल जादू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 1:48 PM

काळा रंग कुणालाही शोभूनच दिसतो; पण बर्‍याच जणांना काळा रंग आवडत नाही. 

ठळक मुद्देपावसाळा कलरफुल होऊ शकतो!

- निकिता महाजन

तुमच्याकडे काळ्या रंगाचा ड्रेस आहे का? हल्ली पाहा तमाम सेलिब्रिटी अनेकदा पाटर्य़ाना, फंक्शनला काळा ड्रेस घालतात. काहीतर आपलं स्टाइल स्टेटमेण्ट उघडं पडू नये, कुठं कोणता रंग शोभेल याचा खल करत राहू नये यासाठीही सर्रास काळे कपडे घालतात. रात्रीच्या कार्यक्रमात हल्ली कापरेरेटमध्येही सर्रास काळ्या रंगाचे कपडे घातले जातात.आपण सामान्य माणसंच फक्त काळं पटकन घालत नाही. सणवाराला नाही, उत्सवाला नाही, कुणाच्या लग्नात तर नाहीच नाही. उगीच कुणाला वाटेल की हे काय निषेधाचे झेंडे म्हणूनही काळे कपडे टाळले जातात.त्यात अनेक मुलींना आणि आता मुलांनाही आपल्या काळ्या-सावळ्या रंगाचा भयानक न्यूनगंड असतो. त्यामुळे काळे कपडे घालून आपण फारच काळे दिसू अशी विचित्र आणि अत्यंत चुकीची भिती अनेकांच्या मनात असते. खरं तर तसं काही नाही. तो एक गैरसमजच म्हणायला हवा.काळा रंग कुणालाही शोभूनच दिसतो; पण बर्‍याच जणांना काळा रंग आवडत नाही. त्यातूनच एक समज करून घेतला जातो की पावसात तर काळे कपडे नकोच. जसे पांढरे नको. चिखल उडण्याची भीती. डाग निघत नाही. तसंच काळे नको. उगीच कुंद हवा. डल वातावरण त्यात काळ्या कपडय़ांनी उदास वाटतं असाही गैरसमज अनेकजण वर्षानुवर्षे पोसतात. पावसाळ्यात चमकदार रंगांचे कपडे घालावेत असं म्हणतात ते खरंही आहे; पण म्हणून काळा रंग वापरूच नये असं काही नाही. पावसाळा नुकताच सुरू झाला आहे, या पावसाळ्यात काळ्या रंगाची आणि काळ्या-पांढर्‍या-पिवळ्या रंगांची मिक्स मॅच जादू तुम्हाला एक फ्रेश लूक देऊ शकते. कॉण्ट्रास्ट मॅचिंग हल्ली चर्चेत आहे. स्ट्रीट फॅशन ते सेलिब्रिटी फॅशन सगळीकडे कॉण्ट्रास्ट कलर वापरले जातात. त्यामुळे पावसाळ्यात कपडे न वाळणे, एकच ड्रेस मिक्स मॅच करणे, लेअरिंग करणे यासाठी काळ्या रंगाचा हात धरून कॉण्ट्रास्ट मॅचिंग करून पाहा. पावसाळ्यातही स्टायलिश रंगांचं इंद्रधनू छान बहरून येईल.

1) काळी ब्लॅक पॅण्ट, लेगिन्स, सलवार असं काहीही घातलं तरी त्याच्यावरचा एक ब्राइट कुर्ता किंवा एकदम मोठं, कलरफुल मण्यामण्याचं गळ्यातलं किंवा मोठं कानातलं तुमचं लूक बदलू शकतं.2) लेअरचा एक ट्रेण्ड आहे.  शर्ट, शर्टवर श्रग, जॅकेट, लॉँग जॅकेट, स्ट्रोल असं लेअरिंग आणि एक ब्राइट रंग, एक काळा, एक पिवळा, केशरी असं केलं तरी फ्रेश वाटू शकतं.3) काळ्या रंगाच्या चपला आणि पायात कलरफुल अ‍ॅँकलेट हे कॉम्बिनेशन उत्तम.4) तेच बांगडय़ा किंवा ब्रेसलेटचंही. काळ्या रंगाची सलवार आणि कलरफुल बांगडय़ा, एखादा फेंट प्लेन कुर्ता हे उत्तम दिसतं.5) काळ्या छत्र्या, त्यावर आपलं नाव पेंटनं कलर करणं हे तर सगळ्यात भारी.