शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

अनुष्काची वेलवेट साडी, झेपेल का आपल्याला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 2:26 PM

- श्रुती साठेविराट-अनुष्काचं लग्न तसं जुनं झालं, लागले दोघं संसाराला. पण त्यांनी लग्नात घातले तसे कपडे आपणही घालावे अशी उचल अनेक जिवांनी खाल्लीच. बाकी डिझायनर लेहेंगा घाला न घाला, अनुष्काची एक स्टाईल मात्र आपणही कॉपी करूच शकतो. आणि ती सहज, कुठंही. अनुष्काची बर्गंडी रंगाची वेलवेट साडी आठवा.वेलवेट? असं म्हणत डोळे ...

- श्रुती साठे

विराट-अनुष्काचं लग्न तसं जुनं झालं, लागले दोघं संसाराला. पण त्यांनी लग्नात घातले तसे कपडे आपणही घालावे अशी उचल अनेक जिवांनी खाल्लीच. बाकी डिझायनर लेहेंगा घाला न घाला, अनुष्काची एक स्टाईल मात्र आपणही कॉपी करूच शकतो. आणि ती सहज, कुठंही. अनुष्काची बर्गंडी रंगाची वेलवेट साडी आठवा.वेलवेट? असं म्हणत डोळे मोठे करू नका. वेलवेट पुन्हा चर्चेत आलं आहे. वेलवेट कापड प्रकारामध्ये काळा, बर्गंडी, लाल, हिरवा, ग्रे या रंगांत टॉप्स, ड्रेसेस, साड्या, कुर्ते आणि शाली असे अनेक प्रकार मिळतात. त्यातही एक मोठा बदल म्हणजे वेलवेट हे नुसते पार्टीवेअर न राहता कॅज्युअल आणि इव्हिनिंग वेअर म्हणूनसुद्धा वापरले जाऊ लागले आहेत. त्यामुळे नवीन काही, खास काही या यादीत अनुष्काकृपेनं वेलवेटला स्थान देऊन टाका.

वेलवेट का? आणि कधी?सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडीसाठी योग्य. वेलवेट टॉप्स पार्टी किंवा एखाद्या खास डिनर डेटसाठी एकदम उपयुक्त. हाफ किंवा फुल बाह्यांचे क्रश्ड वेलवेट टॉप्स खूप रिच लूक देऊन जातात. वेलवेट ड्रेसेसमध्ये हाय- लो, मॅक्सी, शॉर्ट- ए लाइन ड्रेस आपल्या आवडीनं करताच येते. वेलवेट टॉप्स आणि ड्रेसेस हे ‘ऑल इन इटसेल्फ’ समजले जातात. म्हणजेच या टॉप्सबरोबर खूप दागिने किंवा मेकअपची गरजच भासत नाही. त्यामुळे कमीत कमी गोष्टीत फॅशनेबल दिसण्याची ही ट्रिक आहे.

वेलवेट जॅकेटएखाद्या पार्टीसाठी पटकन तयार व्हायचं असेल आणि ट्रेण्डी दिसायचं असेल तर वेलवेट जॅकेट हा उत्तम पर्याय आहे. तरुणींकडे तर एखादं क्रश्ड वेलवेट जॅकेट असलेलं कधीही उत्तम.

वेलवेट साडी आणि शालजरदोसी, मरोरी आणि मोत्याची एम्ब्रॉयडरी वेलवेट साडी आणि शाल यावर खास दिसते. गडद रंगांमध्ये मिळणाºया साड्या रात्रीच्या रिसेप्शन किंवा अन्य कार्यक्रमांसाठी वापराव्यात.

वेलवेटचे ब्लाउजसाडी खूप महाग पर्याय. पण प्लेन साडीवर एम्ब्रॉयडरी केलेलं वेलवेट ब्लाउज हा छान व सुटसुटीत पर्याय आहे.

वेलवेट घेताय, पण...वेलवेट चांगल्या प्रतीचं वापरणं अत्यंत आवश्यक आहे. हलक्या प्रतीच्या वेलवेटची चमक, ड्रेप चांगली दिसत नाही आणि घालून पचकाच होण्याचा धोका जास्त.

(श्रुती फॅशन डिझायनर आणि स्टायलिंग एक्सपर्ट आहे.)