शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक अँण्ड व्हाइटचा मोह ऐश्वर्यालाही का आवरता आला नसेल बरं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 03:00 IST

काळ्या पांढर्‍या रंगाचे कपडे कायम ट्रेण्डी वाटतात. हमखास फॅशनचा हा फॉर्म्युलाऐश्वर्याही वापरते.

 

-श्रुती साठे 

सेलिब्रिटीज नेहमीच वेगवेगळे रंग, स्टाइल्स वापरताना दिसतात. त्यांच्या अशा वेगवेगळ्या प्रयोगाचा कळत नकळत आपल्यावर प्रभाव असतो आणि आपणसुद्धा तसे रंग, कपडे वापरण्याचा प्रयत्न करतो; परंतु आपल्यासारखेच सेलेब्स सुद्धा मोनोक्रोम किंवा काळ्या पांढ-या रंगसंगतीचे कपडे आवर्जून वापरताना दिसतात. कुठलाही ऋतूू असतो, कुठलाही फॅशन ट्रेण्ड  असो,  आपल्या हाताशी असणारे  पांढरे, ऑफ व्हाइट आणि काळ्या रंगाचे कपडे नेहमीच हवेहवेसे वाटणारे असतात. 

याला ऐश्वर्यासुद्धा अपवाद नाहीये बरं का? तिच्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी ती काळ्या आणि  पांढ-या रंगाच्या स्टाइल्समध्ये अगदी कम्फर्टेबल दिसली. 

व्हिक्टोरियन स्टाइल पांढर्‍या बेस वर काळी लेस असलेला लेस कॉर्सेट टॉप आणि त्यावर पांढ-या  रंगाचा शर्ट ड्रेस या अनोख्या कॉम्बिनेशनमध्ये ऐश्वर्या खुलून दिसली. छाती आणि  कमरेला टाइट फिट बसणारा कॉर्सेट हे सहसा शेप वेअर म्हणूनसुद्धा ओळखले जाते; परंतु नाजूक लेस, फ्रिल वापरून केलेले कॉर्सेट टॉप वेअरसुद्धा बाजारात उपलब्ध असतात. ऐश्वर्याने हा लूक लेस हिल्सने पूर्ण केला. 

तोच कॉर्सेट टॉप, काळी लेगिंग आणि  त्यावर काळ्या रंगाचा लांब केप यामध्ये ऐश्वर्या सुरेख दिसली. काळ्या रंगाचा केप त्यावर असलेल्या मेटल वर्कमुळे उठून दिसला. 

ही स्टाइल म्हटलं तर सोपी, म्हटलं तर सहज करता येइल.

सो, ट्राय इट.