शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
4
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
5
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
6
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
7
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
8
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
9
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
10
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
11
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
12
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
13
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
14
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
15
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
16
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
17
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
18
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
19
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
20
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

विमान बनवणारा अमोल

By admin | Updated: April 12, 2017 16:19 IST

घराच्या गच्चीत बनवलेल्या विमानापासून ते विमाननिर्मिती प्रकल्पापर्यंतचाध्यास घेतलेला मेक इन इंडियाचा एक प्रतिनिधी

 आपण स्वत:च विमान तयार करावं आणि तसं ते करता येऊ शकतं असं कधी वाटलं नेमकं..?

- पायलट व्हायचं शिक्षण घ्यायला मी अमेरिकेत गेलो होतो. १८ वर्षांचा वगैरे असेन मी तेव्हा. तिथं मला समजलं की अमेरिकेत अनेक तरुण मुलं, कुटुंब कस्टमाईज्ड फ्लाइंग मशीन अ‍ॅसेम्बल करतात. १९४४ सालची ही गोष्ट. त्याकाळी दररोज साधारण २६३ विमानं लोक तिथं तयार करत होती. तिथं मला प्रेरणा मिळाली. वाटलं, आपल्या भारतात अजून स्वत:ची विमाननिर्मिती होत नाही, हे कसं? एकही विमान तयार केलं जाऊ नये याचा मला धक्का बसला. आपल्याकडची आणि तिथली तफावत पावलापावलावर जाणवत होती. वाटलं, आपल्या देशात काय कमी आहे? कौशल्य आणि इतर सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत. मग आजही आपल्याला प्रत्येक विमान आयात का करावं लागतं?हे सारे प्रश्न मला छळत होते. मग वाटलं, आपणच का विमान तयार करू नये..पण हे विमान उडवणं, तयार करणं, पायलट होणं हे सारं कधीपासून सुरू झालं..?- लहानपणीच मी ठरवलं होतं की पायलटच व्हायचं ! आणि तेच मी झालो. अ. भी. गोरेगावकर या गोरेगावच्या शाळेत शिक्षण झालं. आणि पाटकर कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. बारावीनंतर मी पायलट होण्यासाठी अमेरिकेत गेलो.म्हणजे तुम्ही एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग किंवा विमान बनवण्यासाठी आवश्यक असं शिक्षण घेतलेलं नाही?- मी पायलट झालो. पायलट होण्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पायलट म्हणून काम करण्यासाठी ठरावीक तास/वेळ विमान चालविण्याचा सराव आवश्यक असतो. माझ्यासोबत तेव्हा अमेरिकेत पायलटचं प्रशिक्षण घेणारे तिघं व मी मिळून एक विमान विकत घेतलं होतं. या विमानाची देखभालही आम्हीच करायचो. त्यावेळी विमानाशी अधिक जवळीक वाढली आणि आपणही विमान बनवू शकतो असं वाटू लागलं. विचाराला सुरुवात अशी झाली.

 

मुख्य म्हणजे आपल्याला काहीतरी उत्तम हवं आणि ते परिपूर्ण करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं शिक्षण तुम्हाला घ्यावंच लागतं, हे मला अजिबात पटत नाही. काहीतरी उत्तम काम करण्यासाठी ध्यास लागतो. आजवर वर्षाला लाखो लोक एरोनॉटिक इंजिनिअर झाले, मग त्यांना भारतात आपलं स्वत:चं विमान बनवावंसं का नाही वाटलं? मला वाटतं डिग्रीपेक्षा ध्यास महत्त्वाचा.आपण विमान बनवणं, आपल्या देशात विमाननिर्मिती होणं हे विचार सतत मनात येत. मग मी भारतात आल्यावर आम्ही राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवरच काम सुरू केलं. आणि तिथं मी माझं पहिलं सहा सिटर विमान बनवण्याचं काम सुरू केलं. विमान बनवण्याचा ध्यास एकीकडे आणि पायलटची नोकरी एकीकडे असा प्रवास सुरू झाला तर..?- हो. मी सध्या जेट एअरवेजमध्ये पायलट म्हणून काम करतो. मी ट्रेनिंगही देतो. पूर्वी माझ्याकडे ३५० पायलट काम करत होते. या साऱ्यात कुटुंबाची, पालकांची साथ कशी होती?- आमचं मूळ गाव सातारा. पण माझा जन्म आणि शिक्षण मुंबईतच झालं. आमचं आजही एकत्र कुटुंब आहे. आम्ही १९ जण एकत्र राहतो. या सर्वांची मला महत्त्वाची साथ लाभली.वडिलांनी आॅर्गनिक केमिस्ट्रीमध्ये प्रोफेसरशिप केल्यानंतर बॅँक आॅफ इंडियात नोकरी केली. ते ठिकठिकाणी अर्थशास्त्र या विषयावर लिहितात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘द प्रॉब्लेम आॅफ रुपी’ या पुस्तकाचं मराठी भाषांतर त्यांनी केलं आहे. आईदेखील एमएपर्यंत शिकली आहे. त्यामुळे घरच्यांची साथ तर होतीच..घराच्या गच्चीवर विमान तयार करणं हेच फार आश्चर्यकारक वाटतं. ते कसं जमवलं, त्यात आल्या अडचणींचा कसा सामना केला?- खरं तर पावलापावलावर अडचणी आल्या. जागेची अडचण होती. म्हणून आमच्या मुंबईतील चारकोपमधील राहत्या इमारतीच्या गच्चीवरच सुरुवात केली. त्याबरोबर आर्थिक अडचणीही खूप होत्या. पण माझ्या संपूर्ण कुटुंबाने मला खूप मदत केली. घरातल्या सगळ्या माणसांनी मी विमान तयार करत असताना मला मदत म्हणून पडेल ते काम केलं. विमानाचं इंजिन घ्यायला मला पैसे हवे होते. अखेर ट्रायल बेसिससाठी लागणारं इंजिन मिळालं. पण पैशाचं काय? आईशी बोलणं सुरू होतं. आई म्हणाली मी देते तुला पैसे. त्यावेळी तिने मला पैसे दिले. पण मला आता समजलं की तिनं मंगळसूत्र गहाण ठेवून हे पैसे दिले होते. हळवे करणारे, शिकवणारे असे अनेक प्रसंग, क्षण आजवर या प्रवासात वाट्याला आले असतील ना?- गच्चीवर विमान बनवलं खरं पण ते खाली कसं उतरवणार हा प्रश्न होता. गच्चीत विमान तयार करणं वेडेपणा होता असं वाटू लागलं. मग त्यासाठी आम्ही क्रेन तयार केली. ती इमारतीच्या लिफ्टला जॉईन केली. पाच मजल्याची इमारत आणि सहाव्या मजल्यावरील गच्चीवरून ते खाली आणायचं होतं. विमानाचा मधला भाग क्रेनच्या जवळ राहील अशा पद्धतीने ते विमान क्रे नला लटकवलं. दोन मजले जेव्हा उतरले मधला भाग हवेत लटकत होता. खाली आणि वर खूप माणसं होती. अचानक क्रेन तुटेल अशी परिस्थिती तयार झाली. आता विमान पडतेय की काय अशी भीती होती. तसं झालं असतं तर माझी इतक्या वर्षांची मेहनत फुकट जाणार होती. त्या विमानावर केलेली मेहनत, वेळ, आर्थिक खर्च सारं काही व्यर्थ झालं असतं. पण क्रेनच्या साहाय्यानं विमान खाली उतरलं आणि जमलं सारं..तुमच्या विमान कंपनीचं नाव TAC005  असं कळलं, या नावाचा अर्थ काय?TAC हे आमच्या कंपनीचं नाव आहे. थ्रस्टेड एअरक्राफ्ट कंपनी असं पूर्ण नाव. आणि त्याचं पाचवं मॉडेल म्हणजे 005.आणि या विमान निर्मितीसाठी शासन तुम्हाला काही एकर जमीन देणार आहे अशा बातम्याही वाचल्या, त्या कामाला कशी गती आली आहे आता? - मी तयार केलेलं विमान गेल्यावर्षी फेब्रुवारीत मेक इन इंडिया या प्रदर्शनात मांडलं होतं. या विमानाला माध्यमांनी खूप प्रसिद्धी दिली. मुख्यमंत्र्यांनी विमान कारखाना तयार करण्यासाठी मला पालघरला १५७ एकर जमीन देणार असल्याचं सांगितलं होतं. पालघर येथे ही जमीन आहे. आमची विमान कंपनी खासगी असल्याने सरकार नियमानुसार ही जमीन देऊ शकत नाही. म्हणून ही जमीन एमआयडीसीमध्ये आणून मग या कंपनीसाठी भाडेतत्त्वावर ती जागा देण्यात येणार असल्याचे मला सांगण्यात आले. याबरोबरच या विमानाचा कारखाना सुरू करण्यासाठी DGCA (Directorate General of Civil Aviation) यांची परवानगी असणं गरजेचं आहे. यासाठी खूप मोठा कालावधी लागू शकतो. पण यासंदर्भात पंतप्रधानांशी बोलून लवकरात लवकर परवानगी देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सध्या या विमानाच्या टेस्ट धुळ्यात एमआयडीसीच्या जागेत सुरू आहेत.आता तुम्हाला इतर राज्यांतून नाही, तर जगभरातून विमाननिर्मिती प्रस्ताव येत आहेत असं समजलं..- हो. चंद्रावर जाणारा पहिला माणून नील आर्मस्ट्रॉँगला ज्या कंपनीने त्याला पहिला संदेश पोहोचवला त्या ‘रॉकवेल कॉलीन्स’ या संदेशवहन कंपनीने आमची रेडिओ सिस्टम घ्या म्हणून प्रस्ताव पाठवलाय. याचबरोबर ‘रोल्स रॉइस’ या कंपनीने इंजिन घ्या म्हणून प्रस्ताव पाठवलाय. ही कंपनी बोइंग, एअरबस, एॅटोनोवा या विमानं बनवण्याऱ्या महत्त्वाच्या कंपन्यांना इंजिन पुरवते. रोल्स रॉइसने प्रस्ताव पाठवल्यानं ‘प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी’ या कंपनीनंदेखील इंजिनासाठी प्रस्ताव पाठवला आहे. जगभरातूनदेखील प्रस्ताव येतात. कुवेतच्या राजघराण्याने ‘आमच्या देशात तुमचं तंत्रज्ञान आणा, आम्ही खर्च करतो’ असा प्रस्ताव दिलाय. गुजरात, पश्चिम बंगाल, चंद्राबाबू नायडू यांच्याकडूनही आमच्या राज्यात या म्हणून प्रस्ताव आलेत. पण मला महाराष्ट्रातच ही कंपनी उभारायची आहे.हे एक स्वप्न पूर्ण होताना दिसतं आहे, आता पुढे काय असं काही आहे मनात?- भारताला विमाननिर्मिती उद्योग क्र मांक एकचा देश झालेला पाहणं हे माझं स्वप्न आहे. राज्यातील रिजनल कनेक्टिव्हिटी मला वाढवायची आहे. जागेचा प्रश्न सुटल्यावर एका वर्षात आपलं १९ सीटर प्रोटोटाइप विमान तयार होईल आणि त्यानंतर वर्षापासून आपण वाटेल तेवढी विमाने बनवू शकू असं माझं स्वप्न आहे.मुलाखत - सोनाली कल्पना विठ्ठल शिंदे(लेखिका महाराष्ट्र-१ या वृत्तवाहिनीत वार्ताहर आहेत.)