शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवीच्या जोरावर स्पाकर््स एफसीची आगेकूच

By admin | Updated: April 20, 2017 04:24 IST

१२ वर्षीय जान्हवी शेट्टीच्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर स्पाकर््स एफसी संघाने फुटबॉल क्लब आॅफ मुंबईकर संघाचा ५-१ असा धुव्वा उडवून महिला फुटबॉल

मुंबई : १२ वर्षीय जान्हवी शेट्टीच्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर स्पाकर््स एफसी संघाने फुटबॉल क्लब आॅफ मुंबईकर संघाचा ५-१ असा धुव्वा उडवून महिला फुटबॉल लीग स्पर्धेत विजयी आगेकूच केली. केंकरे एफसी संघाने मुंबई रश सॉकर अकॅडमी संघाचा ३-१ असा पाडाव केला.मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एमडीएफए) वतीने सुरु असलेल्या या स्पर्धेत क्रॉस मैदानावर स्पाकर््स संघाने धमाकेदार खेळाचे प्रदर्शन केले. जान्हवीने संघाच्या विजयात मोलाचे योगदान देताना शानदार २ गोलची नोंद केली. तीने मुंबईकर संघाचे संरक्षण भेदताना जबरदस्त आक्रमण केले. त्याचबरोबर सई संखे, अबीर अरीसवाला आणि भाग्यश्री दळवी यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाच्या विजयामध्ये हातभार लावला. दुसरीकडे, अंशिता पंतने आपल्या मुंबईकर संघाकडून एकमेव गोल करुन एकाकी झुंज दिली.अन्य सामन्यात कसलेल्या केंकरे संघाने अपेक्षित विजय मिळवताना मुंबई रश सॉकर अकॅडमीला ३-१ असे नमवले. रिनी तलाटिने २ गोल नोंदवताना मुंबई रशला दडपणाखाली आणले. आरती अरोराने तीला चांगली साथ देताना एक गोल केला. मुंबई रशकडून प्रियंका अहिरावने एक गोल करुन संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)