शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Sushil Kumar : सुशील कुमारला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जाहीर केलं १ लाखांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 10:39 AM

देशाला दोन ऑलिम्पिक पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) याच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

देशाला दोन ऑलिम्पिक पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) याच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नवी दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीत कनिष्ठ गटातील कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली आणि त्यात सुशील कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. त्या घटनेनंतर सुशील कुमार गायब झाला आहे आणि पोलिसांनी आता त्याची माहिती देणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांचे विविध ठिकाणी छापेसत्र सुरू आहे. सुशीलसह या घटनेतील दुसरा आरोपी अजय याच्यावरही ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले गेले आहे.  Video : नको त्या जागी आग लावण्याचा स्टंट पडला महागात, सैरावैरा पळू लागला कुस्तीपटू

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर हा हत्याकांड झाला आणि त्यानंतर सुशील फरार आहे. दिल्ली पोलिसांनी रात्री बक्षीस रक्कम जाहीर केली. सुशीलवर अजामीनपात्र वॉरंट जाहीर झाला आहे. तसेच त्याच्यावर लुकआऊट सर्क्युलरही जारी झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्ली सरकारलाही दिली आहे. छत्रसाल स्टेडियमवर सुशील उप संचालक म्हणून काम पाहत होता आणि तेव्हा तेथे दोन गटांत हाणामारी झाली. यात सागरची हत्या झाली. हरिद्वारमध्ये एका मोठ्या योग गुरुच्या आश्रमात लपलाय सुशील कुमार

दैनिक जागरणनं दिलेल्या वृत्तानुसार सुशील हरिद्वार येथील मोठ्या योग गुरूच्या आश्रमात लपला आहे. दिल्ली पोलिसांना याबाबची माहिती मिळाली आहे. जागरणनं दिलेल्या माहितीनुसार रोहतक येथे राहणारा सुशीलचा जवळचा मित्रा भुरा यानं दिल्ली पोलिसांना ही माहिती दिली. खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही सुशीलची काहिची प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुरा हा सुशीलच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. तो सुशीलचा बिझनेस सांभाळत होता, परंतु काही वर्षांपूर्वी सुशीलनं त्याच्याकडून सर्व जबाबदारी काढून घेत, त्याला दूर केले. त्यानंतर ही जबाबदारी सुशीलनं अजय व भुपेंद्र यांच्याकडे सोपवली. भुपेंद्र हा फरिदाबाद येथे राहणार आहे आणि फरिदाबाद येथे त्याच्यावर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.   

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारCrime Newsगुन्हेगारी