Video : नको त्या जागी आग लावण्याचा स्टंट पडला महागात, सैरावैरा पळू लागला कुस्तीपटू

Published: May 18, 2021 09:55 AM2021-05-18T09:55:06+5:302021-05-18T10:04:41+5:30

प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. पण, कधी कधी अशी मस्ती अंगलट येते. असाच एक प्रकार इंडियाना येथे घडलेला पाहायला मिळाला.

Southern Sickness Cup स्पर्धेत दोन स्पर्धक एकमेकांना आव्हान देत होते. ही लढत पूर्वनियोजित असल्याचे व्हिडीओ पाहून कळते. त्यात कमरेच्या खालच्या भागाला आग लावण्याचा स्टंटही आधीच ठरला होता. पण, त्यानंतर जसं व्हायला हवं होत, ते घडलेच नाही अन्...

या व्हिडीओत एक कुस्तीपटू रिंगच्या बाहेर झोपलेला दिसत आहे, तर दुसरा कुस्तीपटू त्याच्यानजीक येऊन प्रतिस्पर्धीच्या कमरेखालच्या भागाला आग लावतो.

पण, आग पसरण्यापूर्वी ट्राऊझर काढण्याचा डाव त्या कुस्तीपटूचा फसला अन् त्याच्या शरिराच्या नको त्या भागाला ईजा झाली. हा पूर्वनियोजित स्टंट असल्यानं पाहणारे सर्व मोबाईल कॅमेरात हे सारं कैद करत होते. त्यामुळे समोर जे काही घडतंय ते नियोजितच आहे असे त्यांनाही सुरुवातीला वाटले.

पण, तो कुस्तीपटू वेदनेनं पळू लागल्यानं सारे त्याच्यासोबत धावले आणि अनेकांनी पाण्याच्या बॉटलनं ती आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले.

Read in English