शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

विंडीज

By admin | Updated: December 19, 2014 23:55 IST

फिलँडरचे चार बळी, विंडीज २०१ धावांत गारद

फिलँडरचे चार बळी, विंडीज २०१ धावांत गारद
सेंच्युरियन : वर्नोन फिलँडरच्या (४ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २०१ धावांत गुंडाळला आणि पहिल्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली. दक्षिण आफ्रिकेने पहिला डाव ५ बाद ५५२ धावसंख्येवर घोषित केला. पहिल्या डावात ३५१ धावांची आघाडी मिळविणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने विंडीज संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. फॉलोऑन स्वीकारीत दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या विंडीज संघाने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद ७६ धावा केल्या होत्या. डावाने पराभव टाळण्यासाठी विंडीजला अद्याप २७५ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी ३३ धावा काढून नाबाद असलेल्या लिओन जॉन्सन याला मार्लोन सॅम्युअल्स (१३) साथ देत होता.
फिलँडरने पहिल्या डावात दोन्ही सलामीवीरांसह अनुभवी शिवनारायण चंद्रपॉल व जरमेन ब्लॅकवुड यांना तंबूचा मार्ग दाखविला. क्रेग ब्रेथवेट (३४) व डेव्होन स्मिथ (३५) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना समर्थपणे तोंड देत ७२ धावांची भागीदारी केली. फिलँडरने या दोन्ही सलामीवीरांना लागोपाठच्या षटकांमध्ये बाद केले. (वृत्तसंस्था)