Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 00:07 IST2025-07-14T00:05:44+5:302025-07-14T00:07:15+5:30

तो विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा पहिला इटालियन खेळाडू ठरला आहे.

Wimbledon 2025 Final: Alcaraz misses hat-trick! Number one Yannick Sinner reaches final for the first time | Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास

Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास

Wimbledon 2025 Final Jannik Sinner New Champion  :  विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनर याने इतिहास रचला आहे. दोन वेळच्या चॅम्पियन कार्लोस अल्कराझला पराभूत करत इटालियन टेनिस स्टारनं पहिल्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे.  याआधी पाचवेळा अल्कराझ आणि सिनर यांच्यात सामना झाला. ज्यात अल्काराझ भारी ठरला होता. पण विम्बल्डनच्या फायनलमध्ये पहिला सेट गमावल्यावर दमदार कमबॅक करत  सिनर  विम्बल्डनचा नवा किंग ठरला. तो विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा पहिला इटालियन खेळाडूही ठरलाय.   

अल्काराझनं पहिला सेट दिमाखात जिंकला, पण...

सिनर विरुद्धचा दमदार रेकॉर्ड अन् विम्बल्डनमधील सलग दोन हंगामातील दबदबा कायम ठेवण्यासाठी कोर्टवर उतरलेल्या अल्काराझनं  पहिला सेट ६-४ असा आपल्या नावे करत जेतेपद कायम राखण्याचे संकेत दिले. पण पहिला सेट गमावल्यावर सिनरनं दमदार कमबॅक करत दुसरा सेट ६-४ असा जिंकला अन् यावेळी ट्रेलर अल्काराझनं दाखवला असला तरी पिक्चरचा हॅपी दी एन्ड आपण करणार या तोऱ्यात सिनरनं खेळाचा वेग वाढवला. पुढच्या दोन सेटमध्ये हीच स्कोअर लाइन कायम राखत त्याने अल्काराझचे सलग तिसऱ्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर रंगलेल्या अंतिम सामन्यातील लढत जिंकत यानिक सिनर याने चौथ्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरले आहे.  विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात १७ व्या वेळी  जगतातील नंबर वन आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूमध्ये फायनलचा थरार रंगल्याचे पाहायला मिळाले.  यात ११ व्या वेळी अग्रमानांकित टेनिस स्टारनं फायनल बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. 

फ्रेंच ओपनमधील पराभवाची परतफेड

२३ वर्षीय इटालियन खेळाडूनं २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत डॅनियल मेदवेदेव याला पराभूत करत पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. याच वर्षी त्याने अमेरिकन ओपन स्पर्धेत टेलर फ्रिट्झला पराभूत करत दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवली. यंदाच्या वर्षीही सिनरन ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील जेतेपदासह वर्षाची दमदार सुरुवात केली होती. २०२५ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनर यांच्यात जेतेपदासाठी लढत झाल्याचे पाहायला मिळाले. या लढतीत कार्लोस अल्काराझनं बाजी मारली होती. या पराभवाची परतफेड करत सिनर विम्बल्डनचा नवा राजा झाला आहे.

ग्रँडस्लॅमच्या नव्या जमान्यात आता या दोघांमध्ये अनेकदा पाहायला मिळेल तगडी फाईट

गेल्या काही वर्षांपासून ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच या तिघांपैकी एक फायनलिस्ट असायचा. आता टेनिस जगतात एका नव्या पर्वाची सुरुवात झालीये. नव्या जमान्यात  ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये यापुढे अनेकदा सिनर विरुद्ध अल्काराझ यांच्यात तगडी फाईट पाहायला मिळेल, असे चित्र निर्माण झाले आहे. 

Web Title: Wimbledon 2025 Final: Alcaraz misses hat-trick! Number one Yannick Sinner reaches final for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.