वेस्ट इंडिजचे क्रिकेटर ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो विकणार कंडोम

By Admin | Updated: October 25, 2016 18:43 IST2016-10-25T18:34:04+5:302016-10-25T18:43:30+5:30

ड्वेन ब्राव्हो आणि क्रिस्ट गेल यांची भारतातल्या एका कंडोम कंपनीच्या ब्रँड अँबेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली

West Indies cricketer Chris Gayle and Dwayne Bravo will sell condoms | वेस्ट इंडिजचे क्रिकेटर ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो विकणार कंडोम

वेस्ट इंडिजचे क्रिकेटर ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो विकणार कंडोम

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - या वर्षी भारतात झालेल्या आयसीसी टी-20च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान ड्वेन ब्राव्होच्या चॅम्पियन या थीम साँगनं क्रिकेट रसिकांना भुरळ घातली होती. आता वेस्ट इंडिजचे स्टार खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस गेल यांची भारतातल्या एका कंडोम कंपनीच्या ब्रँड अँबेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस गेल कंडोम विकताना पाहायला मिळणार आहेत.

मैदानाबाहेर वेस्ट इंडिजचा ऑल राउंडर आणि ‘चॅम्पियन’ फेम ड्वेन ब्राव्हो आणि धडाकेबाज ओपनर ख्रिस गेल यांचं चॅम्पियन थीम साँग कंडोमच्या जाहिरातीच्या स्वरूपात नव्या ढंगात बनवण्यात आलं असून, ते  लोकांच्या पसंतीस उतरलं आहे.

यू ट्युबवर आतापर्यंत हे थीम साँग 33,327 इतक्या लोकांनी पाहिलं आहे. त्यांचा नवा चॅम्पियन व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. ब्राव्हो आणि गेलची प्रमोशनचा एक भाग म्हणून दोघांचा हा व्हिडीओ तयार करण्यात आल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.  

Web Title: West Indies cricketer Chris Gayle and Dwayne Bravo will sell condoms