शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली अव्वल स्थानावर

By admin | Updated: June 14, 2017 01:19 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीत साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीत साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए.बी.डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकत कोहली अव्वल स्थानावर पोहोचला. या स्पर्धेच्या आधी कोहली डिव्हिलियर्सपेक्षा २२ आणि आॅस्ट्रेलियाच्या वॉर्नरपेक्षा १९ गुणांनी मागे होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारताचा सामना १५ रोजी बांगलादेशशी होणार असून या सामन्यापूर्वी विराटला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत केलेल्या दमदार फलंदाजीचा फायदा विराट कोहलीला झाला आहे. या स्पर्धेत विराटने आतापर्यंत दोन अर्धशतके केली आहेत. या दोन्ही वेळी विराट नाबाद राहिला असून विराट कोहलीच्या नावे ८६२ अंक आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या वॉर्नरच्या नावावर ८६१ गुण आहेत. एबीडीच्या नावावर ८४७ गुण आहेत. टीम रॅकिंगमध्ये द. आफ्रिका पहिल्या स्थानावर कायम आहे. आॅस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानार तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. शिखर ‘टॉप टेन’मध्ये...शिखर धवन हा पुन्हा एकदा अव्वल दहा खेळाडूंमध्ये पोहोचला आहे. तो आता दहाव्या स्थानावर आहे, तर रोहित शर्मा तेराव्या आणि महेंद्र सिंह धोनी चौदाव्या क्रमांकावर पोहोचला. युवराज सिंह ८८ व्या स्थानावर आहे. गोलंदाजी भुवनेश्वर कुमार २३ व्या, उमेश यादव ४१ व्या क्रमांकावर आहे, तर जसप्रीत बुमराह ४३व्या क्रमांकावर पोहोचला. फिरकीपटू आर.अश्विन २० व्या, तर रवींद्र जाडेजा २९ व्या क्रमांकावर आहे.