विदर्भ रणजी सुधारित
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:20+5:302015-02-18T00:13:20+5:30
विजय शंकरची शतकी खेळी

विदर्भ रणजी सुधारित
व जय शंकरची शतकी खेळीरणजी करंडक उपांत्यपूर्व फेरी : तामिळनाडू पहिला डाव ४०३, विदर्भ बिनबाद ९नागपूर : विजय शंकरची (१११) शतकी खेळी व इंदरजित (९७) झळकाविलेल्या अर्धशतकाच्या जोरावर तामिळनाडूने विदर्भाविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाने दिवसअखेर बिनबाद ९ धावा केल्या होत्या. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या लढतीत आजचा खेळ थांबला त्यावेळी ७ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या फैज फझल याला सचिन कटारिया (१) साथ देत होता. त्याआधी, कालच्या ४ बाद २३४ धावसंख्येवरून पुढे खेळताना तामिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची दमदार मजल मारली. शंकरने शतकी खेळी करीत धावसंख्येला आकार दिला. सोमवारी नाबाद असलेला फलंदाज आर. प्रसन्ना (२२) दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम बाद झाला. शतकी खेळी केल्यानंतर शंकरही माघारी परतला. शंकरने ३०५ चेंडूंना सामोरे जाताना १११ धावा फटकाविल्या. त्यात १३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. इंदरजितने त्यानंतर रंगराजनसोबत (२७) सातव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली आणि संघाला साडेतीनशेचा पल्ला ओलांडून दिला. एका टोकाकडून फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या टोकाकडून इंदरजितने संयमी फलंदाजी केली. तामिळनाडूच्या डावात बाद होणार तो अखेरचा फलंदाज ठरला. त्याने २३६ चेंडूंना सामोरे जाताना ९७ धावा फटकाविल्या. त्यात १० चौकारांचा समावेश आहे. विदर्भातर्फे राकेश ध्रुवने १०६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर श्रीकांत वाघ व आर.डी. ठाकूर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलकतामिळनाडू पहिला डाव : अभिनव मुकुंद त्रि. गो. वाघ ११, मुरली विजय झे. फझल गो. ठाकूर ९६, बाबा अपराजित धावबाद (जांगिड) १०, दिनेश कार्तिक झे. फझल गो. ठाकूर ०४, व्ही. शंकर पायचित गो. ध्रुव १११, आर. परमेश्वरन धावबाद (बद्रीनाथ) २२, बी. इंदरजित त्रि. गो. जांगिड ९७, एम. रंगराजन पायचित गो. वाघ २७, ए. अश्विन ख्रिस्ट झे. कटारिया गो. ध्रुव ०७, एल. बालाजी झे. कटारिया गो. ध्रुव ००, पी. परमेश्वरन नाबाद ००. अवांतर (१८). एकूण १६९.५ षटकांत सर्वबाद ४०३. बाद क्रम : १-१७, २-४१, ३-५०, ४-१९०, ५-२४८, ६-२८३, ७-३५६, ८-३८६, ९-४०१, १०-४०३. गोलंदाजी : श्रीकांत वाघ ३४-१७-५३-२, एस. बंडीवार ३८.५-८-९४-०, आर. ठाकूर ३८.३-११-७१-२, फैज फझल १५-४-४७-०, आर. ध्रुव ३५.४-४-१०६-३, आर. जांगिड ७.५-०-२३-१.विदर्भ पहिला डाव :- फैज फझल खेळत आहे ०७, एस. कटारिया खेळत आहे ०१. अवांतर (१). एकूण ५ षटकांत बिनबाद ९. गोलंदाजी : पी. परमेश्वरन २-१-८-०, एल. बालाजी २-२-०-०, ए. अश्विन ख्रिस्ट १-०-१-०.