US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 07:46 IST2025-09-08T07:38:38+5:302025-09-08T07:46:07+5:30
US Open 2025 Final Carlos Alcaraz Beats Jannik Sinner : अल्काराझ याने टेनिस क्रमवारीतील यानिक सिनरचं अधिराज्य संपवत नंबर वनवरही कब्जा केला आहे.

US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
US Open 2025 Final Carlos Alcaraz Beats Jannik Sinner : अमेरिकन ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये टेनिस स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस अल्काराझ (Carlos Alcaraz) याने इटालियन यानिक सिनर ( Jannik Sinner) याला ६-२, ३-६, ६-१, ६-४ असे पराभूत करत वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. आर्थर ॲशे स्टेडियमवरील मुख्य कोर्टवरील विजयासह अल्काराझ याने दुसऱ्यांदा ही स्पर्धा गाजवत कारकिर्दीतील सहावे ग्रँडस्लॅम आपल्या नावे केले. याशिवाय त्याने टेनिस क्रमवारीतील यानिक सिनरचं अधिराज्य संपवत नंबर वनवरही कब्जा केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यानिक सिनर याने कमबॅक केले, पण...
MAÑANA. NÚMERO UNO. pic.twitter.com/SrUUYL1ksg
— US Open Tennis (@usopen) September 8, 2025
पहिल्या सेटमध्ये स्पॅनिश कार्लोस अल्काराझनं हवा केली. आक्रमक खेळाचा नजराणा पेश करत त्याने इटालियन यानिक सिनरला बॅकफूटवर ढकलत पहिला सेट ६-२ असा आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये सामना सहज सोडणार नाही, अशा तोऱ्यात यानिक सिनर याने दमदार कमबॅक केले. त्यानेहा सेट ६-३ असा आपल्या नावे केला. पण त्यांतर पुन्हा सर्वोत्तम खेळ करत अल्काराझनं ६-१ आणि ६-४ अशी कामगिरी नोंदवत अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली.
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
एका कॅलेंडर ईयरमध्ये ३ फायनल खेळणारी पहिली जोडी
Finals on another level.. and more to come 👀 pic.twitter.com/kFUQsUHN41
— US Open Tennis (@usopen) September 7, 2025
कार्लोस अल्कराझ आणि यानिक सिनर या जोडीनं कोर्टवर उतरताच इतिहास रचला. २०२५ मध्ये ही जोडी तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅममध्ये आमने सामने आली होती. पुरुष एकेरीत एका कॅलेंडर ईयरमध्ये तीन वेळा फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध भिडणारी ही आतापर्यंतच्या इतिहासातील पहिली जोडी ठरली. याआधी फ्रेंच ओपनमध्ये दोघांनी फायनल खेळली होती. लाल मातीच्या कोर्टवर (क्ले कोर्ट) कार्लोस अल्काराझ याने बाजी मारली होती. त्यानंतर विम्बल्डनच्या हिरवळीत (ग्रास कोर्ट) फायनलमध्ये यानिक सिनरचा दबदबा पाहायला मिळाला होता. वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेतील हार्ड कोर्टवर कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यात अल्काराझनं फायनल बाजी मारत यंदाच्या वर्षातील ग्रँडस्लॅम स्पर्धेत २-१ अशी कामगिरी नोंदवली.