शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
4
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
5
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
6
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
7
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
8
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
9
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
10
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
11
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
12
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
13
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
14
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
15
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
16
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
17
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
18
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
19
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
20
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
Daily Top 2Weekly Top 5

Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 21:18 IST

अमेरिकच्या टेलरनं अप्रतिम खेळ करून दाखवत जोर लावला, पण शेवटी अल्कराझसमोर तो कमी पडला. 

Wimbledon 2025 Carlos Alcaraz Beats Taylor Fritz :  विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील पुरुष एकेरीतील पहिल्या उपांत्य फेरीतील लढतीत  स्पॅनिश कार्लोस अल्काराझ याने टेनिस कोर्टवरील आपला दबदबा कायम राखत सलग तिसऱ्यांदा या ग्रँडस्लॅम स्पर्धेची फायनल गाठली आहे. नदालनंतर सलग तीन वेळा फायनलमध्ये पोहचणारा तो दुसरा स्पॅनिश टेनिसपटू ठरलाय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वयाच्या २२ व्या वर्षी विम्बल्डनमध्ये  विजयी हॅटट्रिकचा डाव साधण्याची संधी

अमेरिकन टेनिसपटू टेलर फ्रिट्झचा ६-४, ५-७, ६-३, ७-६ (६) असा पराभव करून कार्लोस अल्काराझने वयाच्या २२ व्या वर्षी कारकिर्दीतील सहाव्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या दिशेनं वाटचाल केली आहे. मागील दोन वेळच्या विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या कार्लोस अल्काराझनं २४ विजयासह तिसऱ्यांदा फायनलमधील प्रवेश पक्का केला आहे. २०२३ आणि २०२४ च्या विम्बल्डन स्पर्धेत त्याने नोव्हाक जोकोविचला पराभूत करून जेतेपद पटकावले होते. सलग तिसऱ्यांदा तो ही स्पर्धा गाजवणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

अमेरिकन टेनिसपटूला मॅचमध्ये येण्याची संधी होती, पण....

फ्रिट्झला अल्काराझविरुद्ध पाचवा सेट जिंकण्याची दोन संधी होती, त्याने चौथ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये ६-४ अशी आघाडी घेतली होती. पण अल्काराझने जबरदस्त कमबॅक करत सेटसह मॅच जिंकून या स्पर्धेतील आपली बादशाहत टिकवण्यासाठी पुढे वाटचाल केली. अमेरिकच्या टेलरनं अप्रतिम खेळ केला. पण शेवटी अल्काराझसमोर त्याचा निभाव लागला नाही.अल्काराझसोबत फायनलमध्ये कोण दिसणार?

 पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविच आणि यानिक सिनर यांच्यात ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता रविवारी  अल्काराझविरुद्ध जेतेपदासाठी अंतिम सामन्यासाठी कोर्टवर उतरल्याचे पाहायला मिळेल. गत स्पर्धेप्रमाणे पुन्हा जोकोविच-अल्काराझ यांच्यात लढत होणार की, सिनर फायनलमध्ये स्पॅनिश स्टारला टक्कर देणार ते पाहण्याजोगे असेल. 

 

टॅग्स :Wimbledonविम्बल्डन