शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

पुढच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक निश्चित होईल; आयओसी सदस्य या नात्याने आयोजनाबाबत आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 12:23 AM

जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी कोरोनावर लस येईपर्यंत ऑलिम्पिक होईल, याविषयी शंका तसेच चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर लस येईपर्यंत आॅलिम्पिक आयोजन होऊ शकेल का, यासंदर्भात मतभिन्नता असताना टोकियो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक पुढच्या वर्षी ठरल्यानुसार २३ जुुलैपासून होतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य असलेले भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख नरिंदर बत्रा यांनी व्यक्त केला आहे.

जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी कोरोनावर लस येईपर्यंत ऑलिम्पिक होईल, याविषयी शंका तसेच चिंता व्यक्त केली. जपानच्या वैद्यकीय संघटनेच्या प्रमुखांनीदेखील कोरोनावर नियंत्रण मिळविल्यानंतरच ऑलिम्पिक शक्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या समन्वय आयोगाचे प्रमुख जॉन कोटस यांनी मात्र कोरोना लस येईस्तोवर आॅलिम्पिक स्थगित करणे अनिवार्य नसल्याचे वक्तव्य केले आहे.

भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या विशेष आॅनलाईन बैठकीला मार्गदर्शन करताना आयओए प्रमुख बत्रा यांनी शनिवारी कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊ नका, असे सांगून टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी निश्चितपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला.ते म्हणाले, ‘मी विश्वसनीय सूत्रांच्या संपर्कात असून माझी नेहमी चर्चा सुरू आहे. आॅलिम्पिकचे आयोजन पुढच्या वर्षी होईल. माझ्या मते, कोरोनावर

सप्टेंबर-आॅक्टोबरपर्यंत लसनिश्चितपणे येईल. आम्ही मात्र पुढील वर्षी आॅलिम्पिक आहे, त्याच पद्धतीने तयारी करणार आहोत. आंतरराष्टÑीय हॉकी महासंघाचे प्रमुख असलेले बत्रा म्हणाले,‘ २०३२ च्या आॅलिम्पिक दाव्यासाठी सर्व जुळवाजुळव सुरू झाली आहे. अंतिम निर्णय २०२५ ला होईल. आयओसीचे एक पथक विविध इच्छुक देशांचा दौरा करत आहे. डिसेबरमध्ये ते पुन्हा सुरू होईल, असे वाटते. (वृत्तसंस्था)२०३२ च्या आॅलिम्पिक यजमानपदावर नजरभारतीय आॅलिम्पिक संघटना २०३२ च्या आॅलिम्पिक यजमानपदाच्या बोली प्रक्रियेत सहभागी होईल, असे बत्रा म्हणाले. भारताने राष्टÑकुलचे यजमानपद दहा वर्षांआधी यशस्वीपणे पार पाडले. त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. आम्ही २०२६ चे यूथ आॅलिम्पिक गेम्स आणि २०२३ च्या आॅलिम्पिक आयोजनाबाबत गंभीर आहोत. या संदर्भात आयओसीला आधीही लिहिले आहे. २०२६ च्या आयोजनासाठी थायलंड, रशिया आणि कोलंबियासोबत स्पर्धा करावी लागेल. २०२३ च्या आॅलिम्पिक आयोजनासाठीदेखील क्वीन्सलॅन्ड (आॅस्ट्रेलिया), शांघाय आणि सेऊल तसेच प्यांगयांग या शहरांसोबत नवी दिल्लीची स्पर्धा असेल, असे बत्रा म्हणाले.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020