शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya : क्लास १ जॉब, ५० टक्के सवलतीत जागा, कुस्तीसाठी स्टेडियम अन् ४ कोटी; रौप्यपदक विजेत्या रवी कुमार दहियावर वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 5:35 PM

Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya : भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहिया याला ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कडव्या झुंजीनंतर रशियाच्या रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला

Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya : भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहिया याला ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कडव्या झुंजीनंतर रशियाच्या रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला. २३ वर्षीय रवी कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळताना त्यानं मिळवलेलं हे यश सुवर्णपदकापेक्षा कमी नक्कीच नाही. त्यामुळेच रवीचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे. रवी कुमार दहियाच्या या कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याचे अभिनंदन केले. हरयाणा सरकारनं तर त्याच्यावर बक्षीसांचा वर्षाव केला. ( Tokyo Olympics: Wrestler Ravi Dahiya takes silver after losing final to Zavur Uguev) 

दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला रवी कुमार दहियानं कडवी टक्कर दिली.  रवी कुमार आणि युगूएव्ह यांनी पहिल्या मिनिटाला बचावात्मक खेळ केला. रवीनं पकड करण्याचे प्रयत्न प्रतिस्पर्धी खेळाडूनं अपयशी ठरवले अन् पहिला गुणही घेतला. रशियन खेळाडूनं दोन वेळा रवीला रिंगबाहेर काढून गुण पदरात पाडून घेतले. पण, रवीनं तिसऱ्या मिनिटाला याची भरपाई केली अन् रशियन खेळाडूला उतानी पाडून २-२ अशी बरोबरी मिळवली. 

रशियन खेळाडूनंही जबरदस्त पकड करताना पुन्हा ४-२ अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत ही आघाडी कायम राखली. ( Ravi trailing 2-4 at end of 1st period). दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडू आक्रमक पवित्र्यात दिसले. रशियन खेळाडूनं पुन्हा एकदा रवीला रिंगबाहेर नेले व आघाडी ५-२ अशी मजबूत केली. रवीला रशियन खेळाडू स्वतःची पकड करूच देत नव्हता. रशियन खेळाडूनं आक्रमकता वाढवताना आघाडी ७-४ अशी आणखी मजबूत केली. रवीनं पकड केली होती परंतु पंचांनी आऊट साईट एरिया देत त्याला गुण नाकारले आणि त्याला हार मानावी लागली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं की,''रवी कुमार दहिया तू एक अविश्वसनीय कुस्तीपटू आहेस. त्याची लढाऊ वृत्ती अन् दृढता वाखाण्यजोगी आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल तुझे अभिनंदन. त्याच्या या कर्तबगारीचा भारताला अभिमान आहे.''  राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, रौप्यपदक विजेत्या रवी कुमार दहियाचा देशाला अभिमान आहे. तू खरा चॅम्पियन आहेस.   या ऐतिहासिक कामगिरीनंतर रवी कुमारवर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. हरयाणा सरकारनं त्याला क्लाक वन नोकरी आणि हरयाणा येथे ५० टक्के सवलतीत जमिनीसह त्याच्या नाहरी गावी कुस्तीसाठी इन्डोअर स्टेडियम बांधण्यास परवानगी दिली आहे. शिवाय रौप्यपदक जिंकल्यामुळे ४ कोटींच्या बक्षीसाचीही घोषणा केली.    

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Wrestlingकुस्तीHaryanaहरयाणाNarendra Modiनरेंद्र मोदी